कोल्हापूर : कोल्हापूर पब्लिक स्कूलमधील क्रीडा शिक्षक विजय मनुगडेनं शाळेतील 4 अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केलं होतं. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनानं क्रीडा शिक्षक विजय मनुगडे याला निलंबित केलंय. प्रशासकीय कामकाजानुसार या क्रीडा शिक्षकाला नोकरीतून बडतर्फ करण्याचा निर्णय सुद्धा शाळा प्रशासनानं घेतलय. 


शाळेतील इयत्ता 8 आणि 9 वी मधील मुलींना हॉकीचं प्रशिक्षण देण्याच्या बहाण्यानं क्रीडा शिक्षक विजय मनुगडे हा  चार विद्यर्थिनींचं लैगिंक शोषण करत उघड झालं होतं. 


त्यानंतर राजारामपुरी पोलीसांनी विजय मनुगडे याला अटक करुन तपास केला, त्यावेळी मनुगडे या शिक्षकांनं आणखी काही माजी विद्यार्थीनीच लैगिंक शोषण केल्याचं समोर येतंय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनान विजय मनुगडे याला सेवेतून निलंबीत करुन बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केलीय.