Shivaji University Recruitment: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७५ जागा भरण्यात येणार आहेत. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 


तात्पुरते सहाय्यक प्राध्यापक, तात्पुरते सहयोगी प्राध्यापक, तात्पुरते साथीदार आणि समन्वयक (तात्पुरते) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यूजीसी आणि महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले नियम पदभरतीसाठी लागू राहतील. 


असोशिएट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केलेली असावी. मास्टर डिग्री दरम्यान ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले असावेत. शिकविण्याचा किंवा संशोधनाच्या किंवा सहाय्यक प्राध्यापक पदाचा किमान ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 


इतर असोशिएट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयातील पीएचडी डीग्री असणे आवश्यक आहे. यूजीसी/एआयसीटीई मान्यताप्राप्त ६ संशोधन अहवाल प्रसिद्ध झालेले असावेत. 


यासोबतच विद्यापीठाच्या संगीत नाट्यशास्त्र विभागात विनाअनुदानित अभ्रासक्रमांसाठी साथीदारांची पदे भरली जाणार आहेत. ही पदे ११ महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहेत. याअंतर्गत कंठसंगीत साथीदार, तबला साथीदार, हार्मोनियम साथीदार, नाट्यशास्त्र साथीदार, पीएलसी साथीदार, कथ्थक साथीदार, भरतनाट्यम साथीदार आणि टेक्निशियन (संगीत आणि नाट्यशास्त्र) ही पदे भरली जाणार आहेत. 


या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २४ जून २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 


पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा