महाआघाडीत शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते तटकरे काय म्हणालेत?
कोकण पदवीधर मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली
रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. महाआघाडीत शिवसेना येणार का याची चर्चा सुरु असताना सुनील तटकरे यांनी शिवसेनेशी या संदर्भात कुठलीच बोलणी सुरु नसल्याचं सष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव येवू दे असं म्हटलं आहे, या संदर्भातील प्रस्तावाची आम्ही सुद्धा वाट पाहतोय अशी सूचक विधान तटकरे यांनी केलं.
शिवसेना हा विभिन्न विचारी पक्ष आहे त्यामुळे शिवसेनेबरोबर महाआघाडी बाबत चर्चा सुरु असेल असं मला वाटत नाही, चर्चा सुरु असल्यास ती वरिष्ठ पातळीवर सुरु असेल असं हि सांगत तटकरे यांनी महाआघाडीत शिवसेनेचा सहभागा बाबात संभ्रम निर्माण करणारी विधान केली.महाआघाडीत शिवसेनेच्या सहभागा बाबत तटकरे काय म्हणालेत.
भाजप सरकारला टोला
शिवप्रतिष्ठान हिदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी नाशिकच्या कार्यक्रमात संतत्ती निर्मितीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून सरकारला तटकरे यांनी टोला हाणला. भिडेंनी हा आंबा सरकारला पाठवावा, म्हणजे वर्षभरात विकास पैदा झाल्यासारखे होईल, गेल्या चार वर्षात विकास घडला नाही, तो निदान या निमित्ताने घडू शकेल, अशी उपहासात्मक टीका सुनील तटकरे यांनी केली.