आतापासूनच शिमगा! एका निर्णयामुळं कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार
Konkan Railway Mega Block : येत्या काही दिवसात कोकणातील महत्त्वाचा उत्सव म्हणजे शिंमगा. या सणासाठी चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. त्याच कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या एका निर्णयामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. रेल्वेचा मेगाब्लॉक कधी आणि किती वेळ असणार ते जाणून घ्या...
Konkan Railway Mega Block News in Marathi : शिमगा आणि गणपती उत्सव म्हटलं की कोकणवासी गावाकडे जातात त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये ही तुफान गर्दी होते. त्यामुळे प्रतिक्षायादीही मोठी आहे. त्यातच कोकण रेल्वेने राजापूर रोड ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरील पाच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर होळीसणासाठी गावी जाण्याचा विचार करत असाल तर आधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की तपासा...
मुंबई-मडगावसह या विभागातून धावणाऱ्या पाच गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कोकण रेल्वेचा हा मेगाब्लॉक 15 मार्च रोजी म्हणजेच शुक्रवारी घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान मडगाव जंक्शन ते सावंतवाडी रोड या गाडीचा 15 मार्च रोजीचा पूर्वनियोजित प्रवास सायं. 7.30 वाजता म्हणजेच 80 मिनिटे उशिराने सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसचा 15 मार्च रोजीचा पूर्वनियोजित प्रवास 2 तास 05 मिनिटे उशिराने सुरु होणार आहे.
त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन ते सीएसएमटी या मांडोवा एक्स्प्रेसच्या 15 मार्च रोजी सुरु होणारा प्रवास करमाळी आणि सावंतवाडी रोडदरम्यान 20 मिनिटे थांबवणार आहेत. तर मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन या जनशताब्दी एक्स्प्रेसचा 15 मार्च रोजी रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान 20 मिनिटे स्थगित करण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी-मडगाव जंक्शन ही तेजस एक्स्प्रेस रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान 20 मिनिटे थांबवली जाणार आहे.
होळीसाठी कोकण रेल्वेच्या विशेष ट्रेन
19 मार्च 2024 पासून कोकण रेल्वेची अहमदाबाद ते मडगाव या मार्गावर विशेष ट्रेन सुरू होणार आहे. होळीसाठी पश्चिम रेल्वे मार्ग आणि कोकण रेल्वे मार्गावर पहिली होळी स्पेशल ट्रेन सोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 आणि 26 मार्च 2024 रोजी फक्त अहमदाबाद ते मडगाव (09412) ही होळी स्पेशल ट्रेन आठवड्यातून एकदा धावेल. अहमदाबादवरुन ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजून 30 मिनिटांनी सुटेल येथून निघते. तर 20 आणि 27 मार्च 2024 रोजी परतीच्या प्रवाशांसाठी एक विशेष ट्रेन (09411) मडगाव येथून निघेल. मडगावहून तीच ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अहमदाबादला पोहोचेल.
या ट्रेनचा थांबा
वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमाळी ट्रेन थांबणार आहे.