मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील गोव्याजवळील पेडणे येथील बोगद्यात दडर कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरील विशेष रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. जवळपास महिनाभर वाहतूक बंद होती. दरम्यानच्या काळात पनवेल, पुणे, मडगाव मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. आता पेडणे बोगद्यातील काम पूर्ण झाल्याने रेल्वेची वाहतूक सेवा पूर्ववत झाली आहे. कोरोना काळात काही विशेष रेल्वे चालविण्यात येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. आता अनलॉक करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचे संकट सुरु असल्याने रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या काही मोजक्याच गाड्या आणि मालवाहतूक करणाऱ्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर सुरु होत्या. मात्र, दरड कोसळ्याने या गाड्या बंद होत्या. आता या गाड्या पूर्ववत धावणार आहे, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.


एर्नाकुलम निजामुद्दीन स्पेशल एक्स्प्रेस मडगाव ते कल्याण, नि  जामुद्दीन एर्नाकुलम दुरांतो स्पेशल, नवी दिल्ली तिरुअनंतपूरम राजधानी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक ते तिरुअनंतपूरम स्पेशल एक्स्प्रेस या गाड्या आपल्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत.


गाड्यांचे वेळापत्रक


 


1) Train No. 02617 Ernakulam Jn. - H. Nizamuddin Special Express dated 15/09/2020  onwards will run on proper route via Madgaon - Roha - Panvel - Kalyan.


 


2) Train No. 02618 H. Nizamuddin - Ernakulam Jn.  Special  Express dated 15/09/2020 onwards will run on  proper route via Kalyan - Panvel - Roha - Madgaon - Mangaluru Jn.


 


3) Train No. 02284 H. Nizamuddin - Ernakulam Jn.  Duranto Special Express dated 19/09/2020 onwards will run on  proper route via Vasai Road - Panvel - Roha - Madgaon - Mangaluru Jn.


 


4) Train No.02283 Ernakulam Jn. - H. Nizamuddin Duranto Special Express dated 22/09/2020 onwards will run on proper route via Mangaluru Jn. - Madgaon - Roha - Panvel - Vasai Road.


 


5) Train No. 02432 / 02431 New Delhi - Thiruvananthapuram Central - New Delhi Rajdhani Special will resume its service from 16/09/2020 onwards.


   


6) Train No. 06345 / 06346 Lokmanya Tilak (T) - Thiruvananthapuram Central - Lokmanya Tilak (T) Special Express will resume its service from 16/09/2020 onwards.