मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन आणखी दोन विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना असणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य आणि कोकण रेल्वेने रत्नागिरीसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून या विशेष गाडीचे आरक्षण प्रवाशांना करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी मार्गावर या या दोन नवीन दोन विशेष गाड्या धावणार आहेत. उद्या ८ सप्टेंबर रोजी ही विशेष गाडी सीएसएमटीहून रात्री १२.३० मिनिटांनी सुटणार आहे, रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. तर या गाडीचा परतीचा प्रवास उद्याच सायंकाळी ७ वाजता सुरू होणार होईल. ही गाडी सीएसएमटी स्थानकात दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता पोहोचणार आहे.


या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकादरम्यान थांबा देण्यात आला आहे. मध्य आणि कोकण रेल्वेकडून याबाबतची माहिती एका पसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.


Press Release


Train no. 01231 / 01232 Mumbai CSMT - Ratnagiri - Mumbai CSMT Special:


Train no. 01231 Mumbai CSMT - Ratnagiri Special will leave from Mumbai CSMT at 00:30 hrs on 08th September 2019, Sunday. The Train will reach Ratnagiri at 10:00 hrs on the same day. 


Train no. 01232 Ratnagiri - Mumbai CSMT Special will leave from Ratnagiri at 19:00 hrs on 08th September 2019, Sunday. Train will reach Mumbai CSMT at 05:00 hrs on the next day. 


Train will halt at Dadar, Thane, Panvel, Roha, Mangaon, Veer, Khed, Chiplun, Savarda, Aravali Road and Sangameshwar Road stations. 


Composition : Total 23 Coaches = 2 Tier AC - 01 Coach, 3 Tier AC - 02 Coaches, Sleeper - 13 Coaches, General - 05 Coaches, SLR - 02. 


Bookings for the above trains will open on 07/09/2019 at all Passenger Reservation System(PRS), Internet and IRCTC website.