कोकणात जाण्याचा बेत करताय, रेल्वेचे आरक्षण फुल्ल!
कोकणात पुढील आठवड्यात जाण्याचा बेत करत असाल तर तो रद्द करा. कारण रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
मुंबई : कोकणात पुढील आठवड्यात जाण्याचा बेत करत असाल तर तो रद्द करा. कारण रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. एसटीच्या गाड्यांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जोडून सुटी आल्याने कोकणात जाणाऱ्या गाड्या फुल्ल आहेत. येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जोडून आलेला रविवार त्यामुळे कोकणात जाणार्या गाड्यांना प्रचंड गर्दी झाली आहे. २४, २५ आणि २६ जानेवारीच्या गाड्यांना प्रचंड प्रतिक्षा यादी वाढली आहे. कोकणातल्या जाणार्या कोकणकन्या, तुतारी, जनशताब्दी, तेजस आणि मंगलोर एक्स्प्रेस या गांड्याना प्रचंड मोठी प्रतिक्षा यादी आहे.
२६ जानेवारीची प्रजासत्ताक दिनाची सुटी शनिवारी आली असून त्यानंतरचा रविवार पाहता गोवा तसेच कोकणात पर्यटनासाठी जाणार्यांची गर्दी झाली आहे. यामुळे कोकणात नियमित जाणार्या गाड्यांना मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे तिकिटांची प्रतिक्षा यादी वाढली असून खासगी ट्रॅव्हल्सना मागणी वाढली आहे.