अहमदनगर : कोपर्डी बलात्कार प्रकरणात दोषींच्या शिक्षेवरचा युक्तीवाद आज पूर्ण झालाय. २९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी अंतिम निर्णय सुनावला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलीय. थोड्या वेळापूर्वीच दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालाय.


सरकारी वकिलांचा युक्तीवाद


'आरोपी म्हणजे राक्षसाचा पुनर्जन्म आहेत... त्यांच्या आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही... जन्मठेप दिली गेली तरी त्यांच्यात सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे... या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी' असं सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात म्हटलंय. 


सकाळी साडे अकराच्या सुमारास निकम यांनी आरोपींच्या युक्तीवाद सुरू केला. तब्बल दीड तास हा युक्तीवाद चालला... तिन्ही आरोपी एकाच माळेचे मणी असल्याचा दावा उज्ज्वल निकम यांनी केलाय.


'भवाळच्या विरुद्ध अपुरा पुरावा'


त्याआधी आरोपी संतोष भवाळच्या वकीलांनी कोर्टात त्यांचा अशील निर्दोष असून त्याच्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचा दावा केला. संतोष भवाळानं गुन्हा केलेला नाही...तसा कुठालाही पुरावा नाही... जो पुरावा आहे तो दिशाभूल करणारा आहे, असंही भवाळच्या वकीलांनी म्हटलंय


'फाशीची शिक्षा नको'


जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुने या दोन दोषींच्या शिक्षेबाबतचा युक्तीवाद मंगळवारी संपला. जितेंद्र शिंदे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्याला फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली होती. तर नितीन भैलुमे हा २६ वर्षीय तरुण असून तो शिक्षण घेतोय. त्याचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केलीय. आरोपींवर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांमध्ये दोषींना जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.