सांगली : कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीतृ 32 फूट 5 इंच इतकी वाढ झाली असून, सूर्यवंशी प्लॉट, नामदार प्लॉट आणि दत्तनगर या भागात पुराचं पाणी शिरलं आहे. परिसरातील ३० जणांना आतापर्यंत स्थलांतरीत करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीतून सावरत असताना पुन्हा एकदा कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातवरण निर्माण झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं थोडीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचं पाणी स्थिर आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून तिची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फूट 9 इंच इतकी आहे. जिल्ह्यातील 70 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.