नवी दिल्ली : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचं राज्यातलं संख्याबळ पाहता राज्यातून त्यांचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. कुमार केतकर यांना पत्रकारितेचा प्रदिर्घ अनुभव आहे. केतकर यांनी महाराष्ट्र टाईम्स, इकोनॉमिक टाईम्समध्ये काम केलं आहे. तसंच लोकसत्ता आणि दिव्य मराठी या वृत्तपत्रांचे ते संपादकही होते.


भाजपची तीन नावं निश्चित


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावं निश्चित झाली आहेत. प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही.मुरलीधरन या तिघांना भाजपनं संधी दिली आहे. राज्यसभेवर महाराष्ट्रातून भाजपच्या कोट्यातून तीन खासदार जाणार आहेत.


कोण आहेत मुरलीधरन


- मुरलीधरन सध्या केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत.


- २०१० आणि २०१३ मध्ये केरळ प्रदेशाध्यक्ष बनले.


- मुरलीधरन यांनी डाव्यांचा गड केरळमध्ये पावणे सहा लाख सदस्यावरून २० लाख भाजप सदस्य बनवले.


- २००९ मध्ये ६.४ टक्के मतदारांनी भाजपला मत दिले तर २०१४ मध्ये १०.८ टक्के मतदारांनी भाजपला मत दिले.


- ५९ वर्षीय मुरलीधरन यांनी यापूर्वी पक्षातील विविध पदावर काम केले


- १२ डिसेंबर १९५८ रोजी थलासरी येथे जन्म झाला.


- इंग्लिश लिटरेचर मध्ये पदवी घेतली आहे


- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले


- १९७५ ते १९७७ दरम्यान आणीबाणीत कारावास भोगला


- १९७८ मध्ये एबीव्हीपी तालुका अध्यक्ष


- १९८० मध्ये एबीव्हीपी राज्य सरचिटणीस बनले


- डाव्यांचा गड असलेल्या कुन्नूर येथे मुरलीधरन यांनी लिपिक म्हणून काम केले


- १९८३ मध्ये नोकरी सोडून पूर्ण वेळ संघाचे काम सुरू केले


- मुंबईत १९९४ ते १९९६ दरम्यान एबीव्हीपीचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून काम केले.


- १९९८ च्या लोकसभा निवडणूकीत दिल्लीतील भाजप निवडणूक नियंत्रण कक्षाचे काम पाहिले


- वाजपेयी सरकार असताना नेहरू युवा केंद्राचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली


- मुंबईतच मुरलीधरण यांना राष्ट्रीयस्तरावर ओळख मिळाली


- खादी आणि ग्राम उद्योग आयोगा संदर्भात रिसर्च प्रोजेक्ट केले.