मुंबई : सर्जनशील साहित्य निर्मितीसाठी दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. साहित्य विश्वातील योगदानासाठी साहित्यीरकांना या रुपानं त्यांच्या कामाची पोचपावती देण्यात येते. यंदा ही शिष्यवृत्ती प्रा. अविनाश कोल्हे यांना देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहेत प्राध्यापक अविनाश कोल्हे ? 
कथा आणि कादंबरी लेखक अशी कोल्हे यांची ओळख. साहित्यात त्यांचं विशेष योगदान. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात ते राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापकही होते. 


काय आहे शिष्यवृत्तीचं स्वरुप? 
साहित्यीकांना त्यांच्या कामात पाठबळ देत आणखी प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्जनशील साहित्याला वाव देण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्ती 1 लाख रुपयांची आहे. यासाठी वयाचं बंधन नाही. 




शिष्यवृत्तीसाठी वयाचं बंधन नसलं तरी त्याचा कालावधी मात्र एक वर्षाचा आहे. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी संबंधित साहित्यीकांनी त्यांच्या अभ्यासाचे किंवा संशोधनाचे विषय, क्षेत्र, उद्दिष्ट यासोबत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या साऱ्याचा कसा हातभार लागेल इत्यादी माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडे देणं अपेक्षित असतं. 


ही माहिती स्वत:च्या हस्ताक्षरात दोन शिफारस पत्रांसह देणं अपेक्षित असतं. अर्जारांचे अर्ज आल्यानंतर त्यांची पडताळणी करत पात्र व्यक्तीस ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येते.