भंडारा : जिल्ह्यातल्या तुमसर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलीस उपनिरिक्षकांच्या विनयभंगाप्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक केली. १८ सप्टेंबरला विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती गुन्हे सिद्ध झाले आहेत. शनिवारी सकाळी त्यांना अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मसर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार चरन वाघमारे यांना अटक केल्यानंतर तणाव निर्माण झाला असून पोलीस स्टेशनबाहेर कडक बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  तुमसर पोलीसस्टेशनमधील महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा विनयभंग प्रकरणी त्यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन  कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना भंडारा पोलीस स्थेशनमध्ये अटक कऱण्यात आली आहे. या अटकेनंतर तणावाची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलेला. तणावाची परिस्थिती दिसताच बंदोबस्त वाढवला. भाजप खासदारही पोलीस स्थानकात आले. याप्रकरणानंतर आता चरण वाघमारे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. 



दरम्यान, गुन्हा नोंद झाल्याचे समजताच आमदार चरण वाघमारे तुमसर पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि मला अटक करा, अशी मागणी करत रात्रीच्या तीन वाजेपर्यंत पोलिस स्टेशनचा घेराव करून राहिले. त्यानंतर पाच दिवसांत चौकशी केल्यावर काय तो निर्णय घेऊ, असे पोलिसांनी सांगितल्यावर चरण वाघमारे आपल्या समर्थकांसह परत घालविले. सकाळी पोलिसांनी वाघमारे यांना त्यांच्या राहत्या घरून अटक केली.


भंडारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणल्यानंतर त्यांच्या अटकेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि खुद्द खासदार भंडारा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. वाघमारे यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये नेण्यात आले आहे. त्यांच्या अटकेनंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.