पुणे : 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झालीय. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साहित्यिक रविंद्र शोभने यांचा 70 मतांनी पराभव केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशमुख यांना 427 तर शोभने यांना 357 मते मिळालीत. गुजरातच्या बडोदा इथं 91 वे साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाच्या अध्क्षपदी निवड झाल्यानंतर देशमुख यांच्यावर साहित्य क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षावर होतोय.