पुणे : Land Acquisition Officer Bogus Beneficiary in Pune : बातमी 'झी 24 तास'चा Impact ची. पुणे जिल्ह्यात सरकारचे मोजणी अधिकारी, भूसंपादन अधिकारी यांनी बोगस लाभार्थ्यांशी संगनमत करुन लाटलेली लाखो रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ( Order to recover lakhs of rupees) 'झी 24 तास'ने  काही दिवसांपूर्वीच हा घोटाळा उघडकीस आणला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोगस लाभार्थ्यांना भूसंपादन झालेले नसताना पैसे घेतल्याबद्दल जाब विचारण्यात आला होता. तसेच व्याजासह पैसे जमा करावे लागतील, असे सांगून गुन्हेही दाखल होतील, असा इशारा देण्यात आला होता. तसेच  आंबेगाव येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाने पुन्हा मोजणी केली आणि अखेर फेरपडताळणी करुन दुरुस्त वहिवाट मोजणी अहवाल सादर केला आहे. या अहवालात गटक्रमांकातील 328/10 आणि 328/14 च्या खातेधारकांची जमीन संपादीत झालेली नसल्याचे स्पष्ट झाले.


 प्रत्यक्षात, गट क्रमांक 328 पैकी सहा खातेधारकांचे एकूण 460 चौरस मीटर क्षेत्र राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत करण्यात आले आहे.  रंगनाथ पांडुरंग कानडे यांना 1100 चौरस मीटर क्षेत्रफळ आणि शंकर पांडुरंग कानडे (दोघे रा.कळंब, ता.आंबेगाव) यांना 900 चौरस मीटर क्षेत्रासाठी अनुक्रमे 36,34,270 रुपये आणि 31,38,694 रुपये भरपाई वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र.13, जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.