मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम अक्षरश: पायदळी तुडवण्यात आले आहेत. पनवेल मिरची गल्लीत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. येथे नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पनवेलमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. आतापर्यंत ५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेलमध्ये कोरोना बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना रुग्णांची वाढ होत असताना मिरची गल्लीत खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम अक्षरश: पायदळी तुडवण्यात आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात कोरोनाचे दोन दिवसांपूर्वी सात नवे रुग्ण आढळून आले होते. तर पनवेल महापालिका क्षेत्रात सहा रुग्ण आढळले होते. खालापूर तालुक्यात एक नवीन रुग्ण सापडला होता. खालापूरमध्ये एकही रुग्ण नव्हता. मात्र, आता खालापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव पाहायला मिळत आहे. तर खोपोलीतील ६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण  झाली आहे.


रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७७वर पोहोचली आहे. पपनवेलमधील दोन जणांना मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पनवेलमध्ये कोरोनाचा आकडा वाढत असताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, आजच्या गर्दीवरुन त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त २७ जण झाले आहेत.