पुणे : Sindhutai Sapkal Funeral : नाथांची माय अशी ओळख असलेल्या समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी १२ वाजता ठोसर पागेत दफनविधी करण्यात आले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात अखेरची सलामी देण्यात आली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. (Last Salute to Sindhutai Sapkal, crowd for funeral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सिंधुताई महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्याने त्यांचं पार्थिव दफन करण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव अत्यंदर्शनासाठी सन्मती बाल निकेतन संस्था इथे ठेवण्यात आले होते. 


ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने अनेकांना दुःख झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सन्मती बाल निकेतन संस्था याठिकाणी अंत्यदर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.


‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे काल रात्री पुण्यामध्ये निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची महिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली.