लातूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरलेला धनगर समाज आता अधिक आक्रमक होणार आहे. येत्या २७ ऑगस्टला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयापुढे वाघ्या मुरळीचा जागर करून पारंपरिक ढोल वाजवून आंदोलन करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनगर समाज समन्वयकांच्या लातूरमधील बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे जाहीर करण्यात आलं आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात ३० ऑगस्टला परभणीत धनगर समाजाचा राज्यव्यापी एल्गार मेळावाही घेण्यात येईल.  या मेळाव्याला राज्यभरातून पाच लाख धनगर समाज येईल असा दावाही यावेळी करण्यात आला.