COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर : रेणापूर तालुक्यातही एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेला. मुसळधार पावसामुळे काळेवाडी ते टाकळगाव येथील रेणा नदीच्या ओढ्याला पूर आला. यावेळी फरतपुर तांडा येथील बाळासाहेब पवार आणि त्यांचा मुलगा विशाल पवार हे सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर गावाकडे परतत होते. ओढ्यावरील पूल पार करताना पाण्याच्या प्रवाहात दोघे दुचाकीसह वाहून गेले.


यात बाळासाहेब पवार हे वाहून गेले. उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान रेणापूर येथील तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापनला सदर घटनेची माहिती देऊनही ते वेळेवर उपलब्ध होऊ शकले नसल्याचा आरोपही आता ग्रामस्थांनी केलाय.