लातूर : लातूर-मुखेड मार्गावर जांब इथे टेम्पो-टँकर यांच्यात भीषण अपघात होऊन ११ जण ठार तर २० जण जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात आलेय. जखमींना जळकोट आणि मुखेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. लग्नाच्या वऱ्हाड घेऊन टेम्पो नांदेड जिल्ह्यातील मुखेडकडे निघाला होता. यावेळी हा अपघात झाला. दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मृतांत लग्न वऱ्हाडी लोकांचा समावेश आहे. हे सर्व औसा तालुक्यातील खरोसा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.



लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरोसा येथील लग्नाचे व-हाड मुखेड कडे विवाह सोहळ्यासाठी येत होते. मुखेड तालुक्यातील जांब जवळ येताच टँकर आणि टेम्पोमध्ये समोरासमोर धडक झाली. टेम्पो व-हाडी मंडळीने खचाखच भरून होता. या भीषण अपघातात जागेवरच ९ जणांचा मृत्यू झाला तर मुखेड रुग्णालयात येताना आणखी दोघांचा मृत्यू झाला. अपघातात आणखी १५ जण गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचार करुण त्यांना पुढील उपचारासाठी नांदे ला हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे.