जयेश जागड, झी मीडिया, लातूर : लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात जीवंत अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना जेवणात अळ्या दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा सगळा प्रकार कळल्यानंतर स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला. तसेच यासंबधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार अकोल्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात समोर आलाय.रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या एका रुग्णाच्या जेवणात अळ्या निघाल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णाने जेवणात अळी सापडल्याची तक्रार तिथल्या कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र तक्रार करताच कर्मचाऱ्याने ते जेवन फेकून दिले व रुग्णास दमदाटी करून हाकलून दिले.


याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतलीय. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचा-यावर निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन या विषयावर छेडण्यात येईल असा इशारा दिलाय. तसेच मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. आजूबाजूला असलेल्या झाडातून किंवा डब्याच्या किनाऱ्यावरुन अळ्या पडल्या असल्याची शक्यता रुग्णालयाती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


"शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वॉर्ड क्र. 31 मधील रुग्ण उकरडा मेहरे हे दुपारी 12 बाजता जेवण करायला गेले होते. त्यावेळी रुग्णाच्या जेवणात अळ्या आढळल्या. अळ्या आढळल्याने रुग्णाने संबंधित कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली. त्यावेळी कर्मचाराने रुग्णला धमकावून तिथून हकलवून दिले. रुग्णाने याची तक्रार मनसेकडे केली. या तक्रारीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तिथे जावून संबिधत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे," असे मनसे अकोला जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांनी सांगितले.