लातूरचा पाणीप्रश्न बिकट, शहराचा पाणीपुरवठा होणार बंद?
लातूर जिल्ह्यात पाणी प्रश्न जटील झाला आहे. शहरात करण्यात येणारा नळाद्वारे पाणी बंद होणार आहे.
लातूर : जिल्ह्यात पाणी प्रश्न जटील झाला आहे. शहरात करण्यात येणारा नळाद्वारे पाणी बंद होणार आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे. परिणामी येत्या १ ऑक्टोबरपासून लातूर शहराचा नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे पुन्हा लातूलकरांना पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. पाणीपुरवठा बंद होणार असल्याने शहराला कसा पाणीपुरवठा होणार, याची चिंता लातूरकरांना पडली आहे.
लातूर शहरात जवळपास पाच लाख लोकसंख्या आहे. या लोकसंख्येला पाण्यासाठी वंचित राहावे लागणार आहे. जिल्हयात पावसाने दडी मारल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गतवर्षी रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, आजही पाऊस न झाल्याने येथील पाणीप्रश्न उग्र झाला आहे. नागरिकांनी पाणी कसे मिळणार, असा प्रश्न उभा राहीला आहे.
शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १ ऑक्टोबरनंतर नळाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. मात्र, हे पाणी कसे मिळणार, किती दिवसाने आणि कसे मिळेल पाणी, तसेच कधीपासून पाणीपुरवठा होणार आदी प्रश्न लोकांमधून उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, गतवर्षी प्रमाणे लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पाण्याची समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.