COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात मध्य रात्रीच्या सुमारास गोळीबार करून एका तरुणाला मारण्याचा प्रयत्न झाला आहे. शहरात अशा घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक गावठी कट्टे शहारात सापडत आहेत. आज शहरात नाशिक रोड परिसरात वाहनातून बारा लाख रुपये पळवण्यात आल्याने नाशिक शहरात चाललंय तरी काय असा प्रशन निर्माण झाला आहे.


इगतपुरीमध्ये गर्भवती महिलेसह तिघांवर कोयत्याने हल्ला करण्यात आले आहेत. कुटुंबीयांनी एकमेकांशीच भांडण करत हा हल्ला केल्याची माहिती आहे. गर्भवती जयश्री गतीर हिच्यासह सरिता गीते, आरती गीते, संजय गीते, कृष्णा गीते यांना कोयता, लाकडी दांडे, पाईप आणि डोळ्यात मिरची पावडर टाकून जबर मारहाण झाली आहे.