जालन्यात पाईपलाईन फुटल्याने पाणी संकट
चंदनझिरा भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने या भागाला होणारा पाणीपुरवठा थांबवण्यात आलाय.
जालना : चंदनझिरा भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने या भागाला होणारा पाणीपुरवठा थांबवण्यात आलाय.
पाईपलाईन अचानक फुटली
काल सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान पाणीपुरवठा करणारी ही पाईपलाईन अचानक फुटली. त्यामुळे विजेच्या खांबापेक्षा उंच कारंजे पाईपलाईन मधून उडत होते.
मोठ्याप्रमाणात पाणी वाया
अखेर आज सकाळपासून पाईपलाईनमधून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येऊन पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. मात्र काल सायंकाळच्या दरम्यान पाईपलाईन फुटल्यानं मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेले.