उल्हासनगर : उल्हासनगरसारख्या गजबजलेल्या शहरात  बिबट्या  घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील भाटिया चौकातील सुरेश असरानी यांच्या बंद असलेल्या बंगल्यात हा बिबट्या सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास  घुसला. बिबट्याचा वावर बाजूला असणाऱ्या 'सोमन क्लासेस'च्या  सीसीटीव्हीत हा व्हिडिओ कैद झाला.


बिबट्याला बघायला नागरिकांनी मोठी गर्दी केली असून पोलीस आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 


वनविभागाला ही  पाचारण करण्यात आले आहे. मात्र, उल्हासनगरसारख्या गजबजलेल्या शहरात बिबट्या घुसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.