Pune Leopard Attack: मानव व बिबट्या यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर या भागात बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. अनेकदा बिबट्या घरात घुसून हल्ला करत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पुण्यातही असाच एक थरार घडला आहे. घरात घुसून बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर हल्ला केला आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील खेड गावात मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर काही कुत्रे झोपले होते. त्याचवेळी बिबट्या घरातील व्हारांड्यात घुसला आणि कुत्र्यांवर हल्ला चढवला. या झटापटीत कुत्रे जोरजोरात भुंकू लागली व परिसरात एकच तणाव पसरला. या झटापटीत बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत त्याला फरफटत बाहेर घेऊन गेला. 5 जुलै रोजी रात्री 3 वाजता ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत, घराच्या व्हरांड्यात काही कुत्रे आरामात झोपले होते. त्याचवेळी घराच्या आसपास एक बिबट्या भटकत होता. घटनास्थळाचा कानोसा घेत बिबट्या दबक्या पावलाने घरात शिरला. बिबट्याला घरात शिरताना पाहून कुत्र्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. तर बिबट्याला पाहून त्यांनी इथे-तिथे पळायला सुरुवात केली. मात्र, बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्याने जबड्यात पडकून उचलून जंगलाकडे धाव घेतली. 


व्हिडिओ व्हायरल लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, परिसरात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. बिबट्याने घरात घुसून पाळीव प्राण्यांवर हल्ला करत त्यांची शिकार केली आहे. परिसरात अनेकदा बिबट्याचा वावर होत होता. यामुळं लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांना घराबाहेर पडण्यासही भीती वाटत आहे. 



अहमदनगरमध्येही बिबट्याचा हल्ला


अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात हा प्रकार घडला आहे. एका घराच्या बाहेर एक बिबट्या घुटमळताना दिसत आहे. रात्रीच्या आंधारात तो दबक्या पावलांनी घराकडे येताना दिसत आहे. दरवाजातच बसलेल्या कुत्र्याला पाहताच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. मात्र, सावध असलेल्या कुत्र्याने बिबट्याचा हल्ला परतवून लावला आहे. तसंत, जोर-जोरात भुंकायला सुरुवात केली. कुत्र्याच्या आवाजाने घरातील लोकही जागे व्हायला लागले. हे पाहताच कुत्र्याने घाबरुन धूम ठोकली. वन विभागाने या घटनेचा सीसीटिव्ही फुटेज शेअर केला आहे. 


बिबट्यांचा संचार


 जिल्ह्यात नागरी वस्तीत बिबट्यांचा संचार वाढला आहे. शेतकरी वर्गालाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतात हल्ला करणारा बिबट्या आता घरात घुसू लागला आहे. त्यामुळं रात्रीची शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच, काही ठिकाणी दिवसाही बिबट्यांचा वावर वाढला आहे. माणसांवरही हल्ले वाढल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळं गावकऱ्यांनी गावोगावी पिंजरे लावावेत अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.