व्हिडिओ : असा झाडाच्या शेंड्यापर्यंत चढला बिबट्या
कालपासून बिबट्याने झाडावर ठाण माडलंय.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात बिबट्याचा हैदोस थांबाला असला तरी बोदवडा तालुक्यातील कुऱ्हे शेत शिवारातील एका झाडावर ग्रामस्थांना बिबट्याचं दर्शन घडलं. रात्री या बिबट्यानं दोन कुत्र्यांचा फडशा पाडलाय. आजूबाजूला वनक्षेत्र नसताना शिकार आणि पाण्याच्या शोधात हा बिबट्या गावाकडे आला असावा असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. कालपासून बिबट्याने झाडावर ठाण माडलं असून वनाधिकारी आणि कर्मचारी बिबट्याला जेरबंद न करता हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु खरीपाचा हंगाम येत असल्यानं बिबट्याला जेरबंद करुन जंगलात सोडावं अशी मागणी परिसरतील शेतक-यांनी केलीय. यावरुन ग्रामस्थ आणि वनवीभागाच्या अधिका-यांमध्ये वाद सुरु आहे.