संगमनेर : सत्तर फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलंय. संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील मांडवदरा परिसरातील विहिरीत हा बिबट्या गुरूवारी रात्री पडला होता. 


बिबट्यांची झुंज  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन बिबट्यांच्या झालेल्या झुंजीत एक बिबट्या विहिरीत पडला. कुंडलिक दुधवडे पंप सुरू करण्यासाठी गेले असता विहिरीतून डरकाळी फोडण्यासारखा आवाज आला. त्यानंतर याची तात्काळ माहिती त्यांनी वनविभागाला दिली.


तोपर्यंत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर पिंजाऱ्याच्या सहाय्याने मोठी कसरत करत बिबट्याला बाहेर काढले.