मुंबई : Simple Kitchen Tips to keep bugs away from rice - पावसाच्या (Rain) दिवसात अनेक खाद्य पदार्थ खराब होत असतात. यात तांदूळ (Rice) हेही येतात. पावसाळ्यात तांदळामध्ये कीड होते. मात्र, या काही या सोप्या टिप्स वापरल्याने तांदूळ (Rice) सुरक्षित आणि चांगले राहतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किड्यांना तांदळापासून दूर ठेवण्यासाठी साध्या स्वयंपाकघरातील टिप्स तुम्हाला वापरता येतील. पावसाच्या हंगामात गारवा असतो. वातावरणातील ओलाव्याने अन्नपदार्थ अनेकदा लवकर खराब होतात. या दरम्यान, तांदळात लहान किडे पडतात. ते पाहून तुमचे मन भात खाण्यास राजी होत नाही. म्हणूनच, पावसाळ्यात घरात तांदळाचा साठा खराब होण्यापासून वाचवण्यासाठी, काही घरगुती, आवश्यक उपाय करता येतील.



तांदळाला कीट लागू नये म्हणून स्वयंपाकघरात असलेल्या लवंगची मदत घेऊ शकता. म्हणजेच, तुम्हाला तांदळाच्या डब्यात किंवा पोत्यात 10-15 लवंगा ठेवाव्या लागतील. याचे दोन फायदे होतील. पहिली गोष्ट म्हणजे जर तांदळामध्ये किड लागणार नाही. तर लहान किडे पळून जातील आणि कीटक नसल्यास ते त्यात आणखी वाढणार नाहीत.



भारतात शतकानुशतके चालू असलेल्या घरगुती उपचारांनुसार, पुदीनाची काही पाने तांदळाच्या डब्यात घाला. त्याचा तीव्र वासे तांदळात किडे होणार नाही.


तांदळात (Rice)  किडे होऊ नये म्हणून तुम्ही लसूण वापरू शकता. या उपायाअंतर्गत डब्यात लसणाच्या काही पाकळ्या ठेवा. जेव्हा त्या सुकल्यानंतर त्या काढून टाका आणि नवीन पाकळ्या ठेवा. फक्त ते बदलत राहा आणि तुमचा तांदूळ सुरक्षित राहील.



तांदळाचे (Rice) किड्यांपासून संरक्षण करण्याचा हा सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. तमालपत्र  तांदळाच्या हवाबंद डब्यात ठेवा. त्याचा आपल्याला जबरदस्त परिणाम दिसून येईल.



तांदूळ सर्व हंगामात थंड, कोरड्या जागी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, इतकी खबरदारी घेऊनही, माइट्स म्हणजेच कीटक त्यापर्यंत पोहोचतात. त्यातून सुटका मिळवण्यासाठी काही लोक तांदूळ फेकून देतात. पुन्हा पुन्हा साफ करण्याच्या त्रासापासून मुक्त सुटका करु शकतात. मात्र, या सोप्या टिपांचा अवलंब करून तुम्ही तांदूळ खराब होण्यापासून वाचवू शकता आणि आर्थिक नुकसानही टाळू शकता.


(टीप- या लेखात दिलेली माहिती आजी-आजोबांकडून मिळाली आणि सामान्य विश्वासांवर आधारित आहे. 'झी24तास' याची पुष्टी करत नाही.)