Benefits of Dark Chocolate: आपल्याला पैंकी अनेक लोकांना चॉकलेट (Dark Chocolate) खायला आवडतं. त्यामुळे आपल्याला अनेकदा असाही प्रश्न पडतो की खरंच या चॉकलेटचा आपल्या आरोग्याला काही फायदा आहे की नाही... अनेकदा आपल्याला डेंटिस सांगतात की चॉकलेट खाण्यापासून दूर (How to eat dark chocolate) राहा कारण त्यामुळे दात कीडतात परंतु आपल्याला मात्र तसं चॉकलेट शिवाय पर्यायच नसतो. परंतु त्यातून डार्क चॉकलेटचे फार चांगले फायदे आहेत. तर मग जाणून घेऊया या फायद्याबद्दल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या चॉकलेटपेक्षा तुम्ही तुमच्या आहारात मिल्क चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटचा समावेश करावा. डार्क चॉकलेट (Benefits of Dark Chocolate) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात थिओब्रोमाइन आणि फेनिलेथिलामाइन घटक आढळतात जे मेंदूसाठी आवश्यक असतात. याशिवाय डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि मॅंगनीज देखील असतात. डार्क चॉकलेटमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम देखील आढळतात. डार्क चॉकलेटचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही त्याचा तुमच्या आहारात मर्यादित प्रमाणात समावेश करू शकता.


  • जेव्हा तुम्ही तणावाखाली असाल तेव्हा डार्क चॉकलेट खाण्याचा प्रयत्न करा. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.

  • हृदयरोगींसाठी डार्क चॉकलेटचे सेवन फायदेशीर ठरू शकते. डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

  • वजन कमी करण्यातही डार्क चॉकलेट प्रभावी ठरू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता. मधुमेहाचे (Diabetes) रुग्णही डार्क चॉकलेटचे कमी प्रमाणात सेवन करू शकतात. मधुमेहाच्या लोकांनाही याचा चांगला फायदा आहे. 

  • डार्क चॉकलेट केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट वयाचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. त्यात अँटिऑक्सिडंट्स असतात त्यामुळे त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून संरक्षण करते. यामुळे तुमची त्वचा फार सुंदर होऊ लागते. 

  • डार्क चॉकलेटमध्ये लोह, मॅग्नेशियम, तांबे आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक आढळतात. हे पोषक घटक आपल्याला दिवसभर ऊर्जा देतात. तसेच आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते. तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी डार्क चॉकलेट खाऊ शकता. मात्र याचे सेवन नेहमी मर्यादित प्रमाणात करा. जर तुम्ही आधीच डाएट प्लॅन फॉलो करत असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचे सेवन करा.