पुणे : राज्यात काही ठिकाणी पुढील दोन दिवसात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने उद्या आणि परवा पाऊस पडले असा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात पुढील ४८ तासानंतर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात काही ठिकाणी २४ आणि २५ डिसेंबरला हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. २५ डिसेंबरला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे हा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


पूर्वेकडे येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात बदल होण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होईल आणि पुढील दोन ते तीन दिवस तापमान असेच राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेने दिली आहे. याबाबत कुलाबा वेधशाळेच्या उपमहानिर्देशिका शुभांगी भुते यांनी पाऊस पाडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.