Loksabha Election 2024 Live updates: दिंडोरीमध्ये अजित पवार गटाला धक्का, गोकुळ झिरवाळ शरद पवार गटात?
Loksabha Election 2024 Live updates : राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक फेरबदल करण्यात येत असून, सातत्यानं काही घडामोडी घडताना दिसत आहेत.
Maharashtra Loksabha Nivadnuk 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून नुकतीच निवडणुकीसाठीच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्ता आली. यामध्ये सात विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरीही पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंच नाव नाही. याशिवाय हेमंत गोडसे, भावना गवळी, राजेंद्र गावित यांचीही नावं टांगणीलाच आहेत.
एकिकडे शिंदे गटाची उमेद वार यादी जाहीर झालेली असतानाच आता उर्वरित नावांना उमेदवारी मिळते का? सत्तासंघर्षामध्ये आता नेमकी कोणती आणि किती समीकरणं बदलतात आणि आजच्या दिवसात राज्यात नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
Latest Updates
Loksabha Election 2024 Live updates: हर्षवर्धन पाटलांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
हर्षवर्धन पाटलांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. या भेटीनंतर ते काय म्हणाले जाणून घ्या.
- आजच्या बैठकीत महायुती बाबत चर्चा झाली
- प्रत्येक पक्षाने आपला महायुती धर्म पाळायला हवा होता
- इंदापूरबाबत मी योग्य ती भूमिका घेईन.
- आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आम्ही आज त्यांचे काम करू पण नंतर त्यांनी आमचे काम करावे
- जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न फडणवीस करतील
- आज आम्ही महायुतीचे काम करायच पण नंतर ते करणार नाही असे नको.
- इंदापूर तालुक्यातील येणाऱ्या सर्व निवडणूकीच पालकत्व फडणवीसांनी घेतलंय.
Loksabha Election 2024 Live Updates: दिंडोरीमध्ये अजित पवार गटाला धक्का
गोकुळ झिरवाळ लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून इच्छुक...
गोकुळ झिरवाळ अजित पवार गटाचे प्रमुख नेते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळाचे चिरंजीव....
शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट घेऊन दिंडोरीतून मागितली उमेदवारी...
गोकुळ झिरवाळ नॉट रिचेबल...
शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता...
Loksabha Election 2024 Live updates : नवनीत राणांनी अमित शाहांची भेट घेऊन आशिर्वाद घेतला
नवनीत राणांनी अमित शाहांची भेट घेऊन आशिर्वाद घेतला आहे. मी जबाबदारी पार पाडणार आहे. आज मी कमळाच्या चिन्हावर मैदानात आहे. जे स्वप्न मोदीजींचे आहे, अब की बार 400 पार ते पूर्ण करायचं आहे असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
Loksabha Election 2024 Live updates : आमदार निलेश लंके आज भूमिका जाहीर करणार
आमदार निलेश लंके यांनी मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यासाठी आयोजित केली बैठक.
बैठकीला पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित...
पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार निलेश लंके करणार आपली भूमिका जाहीर...
Loksabha Election 2024 Live updates : उदयनराजे विरुद्ध शरद पवार अशी थेट लढाई ?
सातारा मतदारसंघामधील राज्यसभेचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीतून चार ते पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर पुन्हा दाखल आपण निवडणूक लढवणारच असं जाहीर केलं आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून स्वत: शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात अशी शक्यताही नाकारता येत नाही. तसे संकेत पवार यांनीच दिले आहेत. असं झालं तर साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शरद पवार अशी थेट लढाई पाहायला मिळू शकते.
Loksabha Election 2024 Live updates : लोकसभा निवडणुकीतून श्रीनिवास पाटील यांचा काढता पाय
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचं समजत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीतून सातारा येथून श्रीनिवास पाटील यांनी काढता पाय घेतला असून, त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळं निवडणूक लढण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे.
Loksabha Election 2024 Live updates : आता वरून ब्रह्मदेव आले तरी नवनीत राणा निवडून येऊ शकत नाही - बच्चू कडू
खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू आज प्रहार पक्षाच्या उमेदवाराची घोषणा करणार आहे त्यापूर्वी बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर जहरी टीका करत डिवचले आहे. आमदार रवी राणा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता हल्ल्यात भाजपच्या कार्यकर्त्याला 9 टाके पडले होते त्यामुळे आता वरून ब्रह्मदेव आले तरी नवनीत राणा निवडून येऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे अशी बोचरी टीका करत बच्चू कडू यांना डिवचले आहे.
Loksabha Election 2024 Live updates : दीपक केसरकर सागर बंगल्यावर दाखल
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी चर्चा करण्यासाठी दीपक केसरकर सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. गुरुवारी नारायण राणे यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. शुक्रवारी दुपारी किरण सामंत देखील घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.
Loksabha Election 2024 Live updates : महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद
महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद 3 एप्रिलला होणार आहे. मुंबईतल्या शिवालय येथे ही पत्रकार परिषद. या परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील , नाना पाटोले आणि महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
Loksabha Election 2024 Live updates : वसंत मोरे आज मुंबईत
मनसेला सोडचिठ्ठी देणारे वसंत मोरे शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेणार आहेत. वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी कडून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रका आंबेडकर आणि वसंत मोरे यांची आज दुपारी मुंबईत होणार भेट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. गुरुवारी पिंपरीत वसंत मोरे यांनी पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली होती.
Loksabha Election 2024 Live updates : मुखमंत्र्यांनी म्हटलं तरीही नवनीत राणांचा प्रचार करणार नाही- अभिजित अडसूळ
खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने महायुतीतू नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. यामध्ये बच्चू कडू आणि अडसूळ पिता पुत्र उघडपणे नाराजी वक्त करत आहे. कडू आणि अडसूळ पिता पुत्रांनी रणांविरोधात उघडपणे विरोध करायला सुरुवात केली आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. मी माझा उमेदवारी अर्ज लवकरात लवकर दाखल करणार आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमच्या सोबत आहे. आणि सर्व वरीष्ठ नेत्यांना विचारात घेऊन आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू त्यामुळे मुखमंत्र्यांनी म्हटलं तरीही आम्ही पितापुत्र नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असेही अडसूळ म्हणाले. दरम्यान आमदार रवी राणा यांनी हात जोडून केली केलेली विनंती फेटाळून लावली असून आम्ही हात जोडून विनंती करतो मात्र आम्ही नवनीत राणा यांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही अशी खोचक टीका अभिजित अडसूळ यांनी केली.
Loksabha Election 2024 Live updates : विजय शिवतारे यांचा विरोध मावळला
बारामतीतून विजय शिवतारे यांचा अजित पवारांना असणारा विरोध मावळला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यात समोट घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधात रणशिंग फुंकलेल्या विजय शिवतारे यांचा विरोध मावळला आहे. शुक्रवारी सासवड येथे शिवतारे आपली भूमिका मांडणार आहेत.
Loksabha Election 2024 Live updates : शरद पवार सातारा दौऱ्यावर
शुक्रवारी शरद पवार सातारा दौऱ्यावर जाणार असून, 11 वाजता सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. या दोन्ही मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा होणार असून यानंतर 2 वाजता पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी संवाद साधतील.
Loksabha Election 2024 Live updates : कोण आहेत शिंदे गटाचे 8 उमेदवार?
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर झालीय. यात राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंड, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील या सात विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलीय. तर काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या रामटेकच्या राजू पारवेंनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी, नाशिकचे खासदार हेमंत गोडेस, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, पालघरे खासदार राजेंद्र गावित यांना गॅसवर ठेवण्यात आलंय. तर ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवारही जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुस-या यादीची उत्कंठा अधिकच वाढलीय.
Loksabha Election 2024 Live updates : गोविंदा शिंदे गटात...
अभिनेता गोविंदाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकरांच्या विरोधात गोविंदा मैदानात उतरण्याची शक्यता.