Loksabha Election 2024 Live Updates : `चार दिवस सासूचे संपले आता` अजित पवारांचं शरद पवारांना उत्तर

Tue, 16 Apr 2024-11:05 pm,

Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस अतिशय खास असणार आहे. कारण, कोल्हापुरातून खुद्द शाहू छत्रपती महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असून, ते इथं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत घडणाऱ्या अनेक राजकीय घडामोडी येत्या काळात राज्याच्या राजकारणाला नवं वळण देण्यास कारणीभूत ठरू शकतात. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या टीकांवर कसं उत्तर देणार, सत्ताधाऱ्यांकडून कोणते चेहरे प्रभावी काम करत राजकीय रंगत वाढवणार... या सर्व घडामोडींच्या सर्व अपडेट्स तुम्हाला इथं पाहता येतील. 


 

Latest Updates

  • आता कोणाला काय वाटतं पण त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तिकीट देणं की न देणं हे त्यांनी ठरवावे, मला त्यांनी सांगितलं की युतीतर्फे तुम्ही उभे राहा त्यामुळे मी तयार झालो, वातावरण हे चांगलं आहे, असं छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे.

  • Loksabha Election 2024 Live Updates :
    शरद पवारांनी बाहेरील पवार असा केलेला उल्लेख अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. अजित पवारांनी बारामतीमध्ये भाषण करताना शरद पवारांना उत्तर दिलंय. नवा काळ आहे... चार दिवस सासूचे संपले आता सुनेचे चार दिवस आलेत. त्याचबरोबर किती दिवस बाहेरची बाहेरची करणार. 40 वर्ष झाली तरी बाहेरची. किती वर्ष झाल्यावर घरची? असा सवालही अजित पवारांनी केलाय.

  • Loksabha Election 2024 Live Updates :
    निवडणुकीच्या काळानंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात. असं सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केलंय... मूळ पवार यावरून दावे-प्रतिदावे आणि वैयक्तिक टीप्पणी सुरूये. त्यावर बोलताना सुनेत्रा पवार यांनी हे विधान केलंय.  निवडणुकीच्या काळात दावे-प्रतिदावे आणि वैयक्तिक टीप्पणी होत असते असं त्या म्हणाल्या. 

  • धाराशिवमध्ये महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्चना पाटील आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यलयात जाऊन दाखल केला. मुहूर्त साधत साधेपणाने  त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरला. आता येत्या 19 तारखेला शक्ती प्रदर्शन करत आणखी एक अर्ज भरला जाणार आहे.

  • Loksabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या या प्रचार गीतामध्ये "शिवसेनेची मशाल"हा शब्द वापरण्यात आला आहे. त्याला शिवसेनेने म्हणजेच शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे.निवडणूक आयोगाने पक्ष नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांना उबाठाची मशाल बोलायला लाज वाटते का?असा सवाल शिवसेनेच्या शिंदे गटाने केला आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याच्या आरोपाला महाविकास उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे.मी आरोपांना घाबरत नाही पण असे आरोप करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला जातो आहे.हा रडीचा डाव असून हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन असं आव्हान शिंदे यांनी दिलं आहे. कपट कारस्थान करून माझं आयुष्य संपण्याचा प्रयत्न केला जातो आहे.लोकसभा निवडणुक होवू पर्यंत विरोधकांनी थांबावे त्यानंतर मला फासावर चढवायचे तर चढवा अशा शब्दात विरोधकांना उत्तर दिलं आहे.मला मिळणारे पाठबळ पाहून हे सगळे आरोप एका मागून एक केले जातायत असा आरोप देखील शशिकांत शिंदे यांनी केला आहे. 

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : भाजपचे चंद्रपूरचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी राज्याचे दिग्गज मंत्री छगन भुजबळ मैदानात उतरले आहेत. चंद्रपूर या ओबीसीबहुल मतदारसंघात कुणबी समाजाच्या प्राबल्याची चर्चा असताना भुजबळ यांनी मूल येथे आयोजित प्रचारसभेत 400 पार चा नारा दिला. राज्यात ओबीसी समाजावर हल्ले होत असताना याच कुणबी समाजाच्या प्रतिभा धानोरकर यांनी निषेधाचा चकार शब्द काढला नसल्याचा हल्लाबोल भुजबळ यांनी थेट केला.  ओबीसी समाजावर अन्याय-अत्याचार झाल्यावर गप्प बसणारे कसे असतील ओबीसी असा सवाल त्यांनी विचारला

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं पक्षाचं चिन्हं असणाऱ्या मशाल चिन्हाला अनुसरून मशाल गीताचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. संजय राऊत, उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांनी यावेळी पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदते सहभाग घेतला होता. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : माण खटाव विधानसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे नेते शेखर गोरेंनी शरद पवार यांची भेट घेतली. गोरेंनी रात्री उशिरा गोविंद बागेत माढा मतदारसंघाच्या रणनीती बाबत शरद पवारांशी तब्बल एक तास चर्चा केली. शेखर गोरे हे भाजपचे आमदार जयकुमार गोरेंचे सख्खे बंधू आहेत..ते गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात काम करतायत. त्यामुळे शेखर गोरेंची भूमिका महत्वाची ठरणारेय. या भेटीने माढा लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या भेटीने माढा लोकसभा मतदारसंघात चर्चांना उधाण आलंय. 

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : सोलापुरात राम सातपुते यांच्या रॅलीला सुरुवात झाली असून, संभाजी महाराज चौकातून ते सात रस्त्यापर्यंत ही रॅली निघणार आहे. भाजप सह  महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले आहेत. या रॅलीच्या निमित्तानं सोलापुरात भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे. 

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रवाना. निवडणूक कार्यालयाकडे आपला अर्ज सादर करून फडणवीसंच्या स्वागताला जाणार. 

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : आताच्या क्षणाची मोठी बातमी. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना भाजपच्या वतीनं उमेदवारी जाहीर. साताऱ्यातून उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत.  

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची राज्यात सर्वाधिक मागणी असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सभांवर सातत्यानं भर दिला जात असून, पूर्व विदर्भात आतापर्यत देवेंद्र फडणवीस यांच्या 20 पेक्षा जास्त सभा पार पडल्या आहेत. 

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : महाविकास आघाडीने सांगली बाबत खूप मोठी चूक केली आहे,पण 19 तारखेला 3 वाजेपर्यंत आपल्या काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म मिळेल आणि तीन दिवस अजून बाकी असून तीन दिवसात राजकारणात बरेच बदल होतात,
    यामुळे पाहू, अशी भूमिका विशाल पाटील यांनी जाहीर केली आहे. 

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस. 2024 लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याअगोदरच 2019 च्या लोकसभा निवडणूकी पेक्षा अधिक रक्कम आत्तापर्यंत तपासणीदरम्यान निवडणूक आयोगाकडून जप्त करण्यात आली आहे. 1 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत देशभरातून 4658.13 कोटी रुपये आयोगाने जप्त केले आहेत. यामध्ये रोख रक्कम, सोने-चांदी, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. 

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : लातूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना लातूर शहरांचे आमदार अमित देशमुख यांची गाडी मराठा तरूणांनी आडवत घोषणाबाजी करत गाडी पुढं बोंबाबोंब आंदोलन केले आहे. आमदार अमित देशमुख हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी वासनगाव येथे जात असताना गावातील मराठा समाजाने गावच्या वेशीवरच त्यांच्या ताफा अडवला.यावेळी संतप्त मराठा तरुणांनी आमदार अमित देशमुख यांच्या गाडीसमोर ठिय्या मांडत बोंबाबोंब आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे आणि अमित देशमुख यांना मराठा आरक्षणावर जाब विचारला आहे. दरम्यान यावेळी आमदार अमित देशमुख यांनी हा गोंधळ पाहून गाडीतून खाली न उतरता सरळ कोणालाच काही न बोलता तिथून निघून जान पसंत केलं आहे.

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : आज मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या बैठका. मुंबई भाजपच्या विविध आघाड्यांची एक बैठक तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता मुंबई भाजपच्या दादर पक्ष कार्यालयात होणार बैठकांना सुरुवात होईल. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलारांसह मुंबईतील लोकप्रतिनिधी बैठकीला हजर राहणार असून, तिथं लोकसभेच्या अनुषंगाने संघटनेच्या कामांचा आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. 

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : बारामतीत अजित पवार हे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाल्यास खबरदारी म्हणून पर्यायी उमेदवार अजित पवार अर्ज भरणार आहेत...बारामती लोकसभेसाठी महायुतीकडून विशेष खबरदारी घेतली जातेय...बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलीय. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : महाविकास आघाडीचे धाराशिव चे लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार, माजी मंत्री अमित देशमुख हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : एकीकडे विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगावला. प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं. तसंच आघाडीत जागावाटप होत असताना कार्यकर्ते आणि नेत्यांची समजूतही पक्षानं काढायची असते, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.  

  • Loksabha Election 2024 Live Updates : सांगलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीय. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजप सदस्यपदाचा राजीनामा पाठवलाय. जगताप यांनी सांगलीतून विशाल पाटलांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : कोल्हापुरातून मंगळवारी महविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link