महाराष्ट्रातील एकमेव जंगल जे रात्रीच्या अंधारात चमकते; आयुष्यात एकदा तरी इथं नाईट ट्रेकिंगचा अनुभव नक्की घ्या

आकाशातले तारे पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. काजव्यांचे हे मायावी विश्व पाहण्यासाठी भीमांशंकरला नक्की भेट द्या. 

| May 16, 2024, 23:42 PM IST

Bhimashankar Jungle Night Lighting :  निसर्गासारखा किमयागार नाही.. निसर्गाची ही किमया अनुभवायची असेल रात्रीच्या वेळेस भीमाशंकरच्या जंगलात नाईट ट्रेकिंगला नक्की जा. लक्ष लक्ष काजवे झाडा पानांवर लुकलुकतात. लुकलुकणाऱ्या काजव्यांमुळे संपूर्ण जंगलच प्रकाशमान होतं. एका लयीतलं काजव्यांचं हे लुकलुकणं पाहण्यातून जो स्वर्गीय आनंद मिळतो त्याचं वर्णन करता येत नाही.

1/7

भीमाशंकर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आहे यामुळे येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. मात्र, तीर्थक्षेत्रासह भीमशंकरचे जंगल हे काजव्यांमुळे देखील लोकप्रिय आहे. 

2/7

 मुंबईपासून साडेचार तासांच्या अंतरावर म्हणजेच 213 किलोमीटरवर भीमाशंकर आहे.   

3/7

ट्रेकिंगबरोबरच निर्सगदर्शन, पक्षी निरिक्षण आणि वनजीवन पाहण्यासाठी पर्यटक भीमाशंकरला आवर्जून भेट देतात. 

4/7

रात्रीच्या अंधारात चमकणारे जंगल पाहण्यासाठी अनेक हौशी पर्यटक  नाईट ट्रेकिंगचा  बेत आखतात. तर, काहीजण तंबू ठोकून जंगलातच मुक्कामाला राहतात.

5/7

टिमटिमणाऱ्या काजव्यामुळे भीमाशंकरचे जंगल हे रात्रीच्या अंधारात चमकते. काजवे चमकताना पाहून आकाशातील तारांगणच जमीनीवर अवतरल्याचा भास होतो.

6/7

टिमटिमणाऱ्या काजव्यामुळे भीमाशंकरचे जंगल हे रात्रीच्या अंधारात चमकते. काजवे चमकताना पाहून आकाशातील तारांगणच जमीनीवर अवतरल्याचा भास होतो.

7/7

निसर्गाच्या सान्निध्यात भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे. भीमाशंकर अभयारण्य हे काजवा महोत्सवासाठी लोकप्रिय आहे.