Loksabha Election 2024 Live Updates:उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी

Fri, 26 Apr 2024-2:55 pm,

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यापैकी प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास आज सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे पुण्यात शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात...

Loksabha Election 2024 Live Updates: राज्यात आज अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. प्रचारसभा, रॅली, रोड शोंबरोबरच अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यामध्ये आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. या आणि अशा अनेक घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगमधून नजर टाकणार आहोत... चला तर पाहूयात काय काय घडतंय आज राज्यातील राजकारणामध्ये

Latest Updates

  • अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी ३१.०५ टक्के मतदान पार पडले. लोकसभा मतदारसंघनिहाय मतदान- 
    05 बुलडाणा -29.7 %, 06- अकोला -33.25%, 07- अमरावती -31.41 %, 14- यवतमाळ-वाशिम 31.47 %.

  • उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

  • शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, पीक विम्याचे निकष बदलणारेः ठाकरे गटाच्या वचननाम्यात आश्वासन

  • आम्ही महाराष्ट्राचे वैभव परत आणून देऊ; उद्धव ठाकरे

  • उद्धव ठाकरेंनी प्रसिद्द केला जाहीरनामा

    उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाला पराभव दिसायला लागला आहे, त्यामुळे राम राम बोलायला सुरुवात केली आहे. भाजपाच्या मनातील पाशवी इच्छा समोर आली आहे, त्यांना लोकशही मारुन टाकायचीही आहे अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. 

  • लोकसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना ठाकरे गटाकडून वचननामा जाहीर 

     

  • सध्या भाजपची अवस्था विचित्र झालीयेः उद्धव ठाकरेंची टीका

  • सावध रहा, नाहीतर ते फोटो व्हायरल करेन; आमदार सतेज पाटलांचा खासदार संजय मंडलिकांना इशारा

    श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक वारंवार वक्तव्य करत आहेत. त्यामुळे काँग्रेस आमदार माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना थेट इशारा दिला आहे. तुम्ही 2019 साली निवडणुकीला उभे होता. त्यावेळी तुम्ही शाहू महाराजांकडे येऊन त्यांच्या पायाही पडला होता. ते फोटो अजूनही माझ्याकडे आहेत. वारंवार शाहू घराण्यावर बोलाल तर ते फोटो व्हायरल होतील, असा इशारा सतेज पाटलांनी दिला आहे.

  • मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिलाय, त्यामुळं भाजपचा प्रचार करण्यास मोकळा; खडसेंचे मोठे वक्तव्य

    मी रक्षा खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. मात्र मी अद्यापही भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही. दोघे उमेदवारांना शुभेच्छा देतो अधिकाधिक मताधिक्याने दोन्ही नेते निवडून यावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असं एकनाख खडसे यांनी म्हटलं आहे.

  • उपमुख्यमंत्र्यांनीच तोडले वाहतूकीचे नियम;जिल्हधिकारी कार्यालयाच्या चौकातून अजित पवार यांचा ताफा उलट्या दिशेने

    पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आज वाहतूकीचे नियम तोडल्याचे समोर आले. चक्क जिल्हधिकारी कार्यालच्या चौकातून अजित पवार यांचा ताफा उलट्या दिशेने रवाना झाला.

  • आढळराव पाटील डमी उमेदवार; डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला टोला

    आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला लगावत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधला

  • 28 एप्रिलला रत्नागिरीत हाय व्होल्टेज सभा, एकाच दिवशी मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची सभा

    नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेची जाहीर सभा होणार. सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येण्याची शक्यता

  • बैलाचा अपमान करू नका; संजय राऊतांचे नाव घेत फडणवीसांचा टोला

  • आम्ही काय अतिरेकी, नक्षलवादी, दरोडेखोर आहोत काय?, राजू शेट्टींचा सवाल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा कोल्हापूर दौऱ्यावर येतात..तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा काढल्या जातात, असं म्हणत राजू शेट्टींनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही अतिरेकी, नक्षलवादी का, दरोडेखोर आहोत काय असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.

  • अहमदनगरमधील वंचितमध्ये उभी फूट; पदाधिकाऱ्यांना डावलून ओबीसी महासंघाच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने नाराजी

    वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना डावलून ओबीसी महासंघाच्या उमेदवाराला ऐनवेळी वंचितची  उमेदवारी दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नाराज. ओबीसी बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने युती करून दिलीप खेडकर यांना उमेदवारी जाहीर. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन्ही गट आमने-सामने

  • ...म्हणून काळजी वाटते; जयंत पाटलांचा भुजबळांना टोला

    छगन भुजबळ यांची अवहेलना होत असल्याने काळजी वाटत आहे, असा टोला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.

  • ...म्हणून पंकजा शेवटची निवडणूक म्हणाल्या असतील; वडेट्टीवार यांचा टोला

    सरकारविरोधी वातावरणामुळे पंकजा मुंडेंना भिती वाटत असून म्हणूनच त्या ही शेवटची निवडणूक म्हणाल्या असतील, असा टोला विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

  • 'टीका करण्यापेक्षा विकासावर बोला'; मुंडेंच्या टीकेवर पलटवार

  • रमेश बारसकर यांच्यासठी माढ्यात प्रकाश आंबेडकरांच्या 6 सभा होणार

  • केंद्रीय निवडणूक आयोगाची मोदी-राहुल गांधींना नोटीस

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित आचारसंहितेच्या उल्लंघनाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारे द्वेष आणि फूट पाडल्याचा आरोप केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.

  • राहुल गांधी अमेठीतुन निवडणूक लढणार? 1 मेला अर्ज भरणार?

  • नाशिकसाठी राष्ट्रवादीची तातडीची बैठक; भुजबळ मात्र येवल्यात

    नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादीचा असावा म्हणून जिल्हा राष्ट्रवादीने तातडीची बैठक बोलावली आहे. पक्षप्रमुखांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी विचार करत आहेत. नाशिक शहरातील मुंबई महामार्गालगत असलेल्या राष्ट्रवादी भवनमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित आहेत. एका बाजूला बैठक सुरू असताना छगन भुजबळ मात्र येवला मतदारसंघात रवाना झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच समता परिषदेच्या बैठकीमध्ये भुजबळांनी घेतलेली माघार मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली.

  • अजित पवार-राहुल कुल एकाच मंचावर

    महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारानिमित्त दौंड तालुक्यात आज अजित पवार आणि राहुल कुल एकाच मंचावर येणार आहेत. अनेक वर्षांपासून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष असलेल्या तालुक्यात दोन नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. यावेळी अजित पवार हे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

  • शरद पवार गटाच्या शपथपत्रामध्ये काय?

    युवा, महिला, युवती, शेतकरी, कामगार, उपेक्षित घटक, अल्पसंख्याक अश्या अनेक घटकांचा पवार गटाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला असल्याचं वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे. नागरी विकास, उद्योग, पर्यावरण, पर्यटन, परराष्ट्रीय धोरण याचबरोबर अनेक नावीन्यपूर्ण विषय या शपथपत्रमध्ये आहेत, असं वंदना चव्हाण यांनी सांगितलं.

     

  • अनेकांकडून माहिती घेऊन तयार केला जाहीरनामा

    जाहीरनामा बनवणाऱ्या वंदना चव्हाण यांनी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताना, "जाहीरनामा तयार करण्यासाठी मला शरद पवार आणि जयंत पाटील यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. अनेक लोकांकडून माहिती घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे. आम्हाला अनेक सूचना या आल्या होत्या. त्याचा आम्ही जाहीरनामा तयार करताना विचार केला आहे. पुढच्या काळात काही इनपुट आल्यास त्यासंदर्भातही आग्रही असू," असं म्हणाल्या.

  • आम्ही या जाहीरनाम्यासाठी आग्रही असणार: पवार

    आम्ही मर्यादित जागा लढवत आहोत. आम्ही यंदा दहाच जागा लढवत असून आम्ही जो जाहीरनामा केला आहे त्यासाठी आम्ही संसदेत आग्रही असणार आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

  • शरद पवार गटाचा जाहीरनाम्याची घोषणा

    हा आमचा जाहीरनामा नसून शपथपत्र आहे असं शरद पवार गटाचा जाहीरनाम्याची घोषणा करताना जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. हा जाहीरनामा वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला आहे.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जोरदार शक्तीप्रदर्शन

    छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी संभाजीनगरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणा-या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.  

  • शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

  • '..किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या'; जाहीर भाषणात काँग्रेस अध्यक्षांचं भावनिक आवाहन

    लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झालं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. याच प्रचारादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षांनी एक भावनिक विधान केलं आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त..

  • चौथ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग

  • पाडवी भरणार उमेदवारी अर्ज; करणार शक्तीप्रदर्शन

    नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मात्र यावेळी काँग्रेसचा कोणताही मोठा नेता त्यांच्यासोबत उपस्थित राहणार नाही अशी माहिती मिळत आहे. काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते आज सांगलीमधील पक्ष मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

     

  • 3 दिवसात मोदी घेणार 7 सभा

    राज्यात आज वेगवेगळ्या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचा, प्रचाराचा धडाका सुरु राहणार आहे. मात्र त्यात सर्वात उठून दिसणारी बाब म्हणजे पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात होणाऱ्या सभा. मोदींनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. चंद्रपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणीत मोदींनी सभा घेतल्या आहेत. आता पुढील 3 दिवसांत मोदी महाराष्ट्रात 7 सभा घेणार आहेत.

     

  • अनेक उमेदवार भरणार अर्ज

    पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरुर-आंबेगावचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आज रक्षा खडसे, स्मिता वाघ, भुमरे, पाडवीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

  • काँग्रेस विशाल पाटलांवर कारवाई करणार का?

    विशाल पाटलांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा होणार आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. विशाल पाटलांवर कारवाई करण्याबाबत चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे.

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link