मेंदू खाणाऱ्या अमिबाने केरळात घेतला मुलीचा जीव, काय आहे Naegleria fowleri

Brain Eating Amoeba Naegleria fowleri: केरळात एका दुर्मिळ संसर्गाने पाच वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. या मुलीवारprimary amoebic meningoencephalitis चा उपचार सुरू होता. हा Naegleria fowleri म्हणजेच 'मेंदू खाणाऱ्या अमिबा' मुळे होणारा दुर्मिळ संसर्ग आहे. या संसर्गाने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. भारतासहित 16 हून अधिक देशांमध्ये हा अमिबा आढळून आला आहे. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, कोमट पाण्याच्या ठिकाणी नेग्लेरिया फॉवलेरी वेगाने पसरतो.

| May 22, 2024, 19:10 PM IST
1/7

प्राइमरी अमेबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (पीएएम) हा मेंदूच्या संसर्गाचा दुर्मिळ प्रकार आहे जो नेग्लेरिया फॉवलेरीमुळे होतो. नेग्लेरिया फॉवलेरी हा एक एकप्रकारचा अमिबा आहे.  याचा विषाणू गोड्या पाण्यात आणि मातीमध्ये आढळतो. हा विषाणू नाकातून शरीरात प्रवेश करून संक्रमित करतो.

2/7

तलाव आणि नद्या, जलतरण तलाव, स्प्लॅश पॅड्स, सर्फ पार्क यांसारख्या ठिकाणी नेग्लेरिया फॉवलेरी अमीबा आढळू शकतो. अस्वच्छ ठिकाणी असा अमिबा सापडण्याची शक्यता जास्त असते.

3/7

सहसा पाण्यात पोहोताना Naegleria fowleri नाकातून शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर तो मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदू कुरतडायला सुरुवात करतो. या अमिबामुळे मेंदूला सूज येते. केरळातल्या कोझिकोड इथल्या एका नदीत आंघोळ करताना मुलीला संसर्ग झाल्याचं बोललं जातंय.

4/7

 एक मे रोजी मृत मुलगी आपल्या तीन ते चार मैत्रिणींसह नदीत पोहोत होती. पण इतर कोणत्याही मुलीमध्ये  Naegleria fowleri ची लक्षणं आढळून आली नाहीत. हा संसर्गजन्य विषाणू नाही.

5/7

Naegleria fowleri त सुरुवातीच्या टप्प्यात डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या ही लक्षणे दिसतात. नंतर रुग्णाच्या मानेमध्ये कडकपणा येऊ शकतो. रुग्णाला दौरा पडू शकतो किंवा भ्रमिष्ठ सारखं वाटू शकतं. काही वेळा रुग्ण कोमातही जाण्याची भीती असते. यूएस सीडीसीच्या मते, पीएएम असलेले बहुतेक रुग्ण लक्षणे दिसू लागल्यानंतर 1 ते 18 दिवसांच्या आत मृ्त्यू पावतात. साधारणपणे 5 दिवसांनंतर रुग्ण कोमात जातो किंवा त्याचा मृत्यू होतो.

6/7

नेग्लेरिया फॉवलेरी संसर्ग झपाट्याने वाढतो. शास्त्रज्ञांना अद्याप या आजारावर कोणतेही प्रभावी उपचार सापडलेले नाहीत. सध्या रुग्णांवर ॲम्फोटेरिसिन बी, अझिथ्रोमाइसिन, फ्लुकोनाझोल, रिफाम्पिन, मिल्टेफोसिन आणि डेक्सामेथासोन यांसारख्या औषधांच्या मिश्रणाने उपचार केले जातात.

7/7

देशात आतापर्यंत PAM ची 20 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोझिकोड प्रकरण हे केरळमधील सातवे प्रकरण आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये अलाप्पुझा इथल्या एका १५ वर्षीय मुलाचा पीएएममुळे मृत्यू झाला होता. केरळमधील पीएएमचे पहिले प्रकरण 2016 मध्ये अलप्पुझा इथं समोर आलं होतं. त्यानंतर मलप्पुरम, कोझिकोड आणि त्रिशूरमध्ये प्रकरणे नोंदवली गेली.