Breaking News LIVE Updates: महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला! भाजपाला 150 ते 160 जागा तर शिंदे-अजित पवारांना...

Tue, 22 Oct 2024-10:07 am,

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असून दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर...

Latest Updates

  • आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात पण...

    आजपासून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होत आहे पण अद्याप महायुती मविआचे उमेदवार किंवा जागावाटप झाले नाही. महायुतीत भाजपने 99 जागांवर उमेदवार दिले आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 18 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा अद्याप संपलेली नाही त्यामुळे जागा कोणाला आणि उमेदवार कोण हा प्रश्न इच्छुकांना पडला आहे. वंचित बहुजन आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती कडून ही उमेदवारांची घोषणा झाली आहे. पण सत्तेत असलेले किंवा विरोधात बाजू लढवत ठेवलेलं युती आणि आघाडीचे अर्ज भरण्याचे बिगूल कधी वाजणार हा प्रश्न कायम आहे.

  • महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; भाजपाला 150 ते 160 जागा तर शिंदे-अजित पवारांना...

    महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. 

    भाजपा - 150 ते 160 जागा
    शिवसेना (एकनाश शिंदे) -  70 ते 75 जागा
    राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 50 ते 55 जागा

  • गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यातून पसार

    पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पसार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. निखिल मधुकर कांबळे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये मकोकासह गंभीर गुन्हे दखल आहेत. सोमवारी रात्री त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पोलिसांच्या गाडीतून परत येत असताना रात्री पावणेदहाच्या दरम्यान तो पोलिसांच्या बेडीतून हात काढून गाडीचा दरवाजा उघडून पसार झाला. गुंजन चौकात ही घटना घडली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  • नांदेड जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

    नांदेड जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का आहे. हदगाव तालुक्यातील सावरगाव हद्दीत भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. 3.8 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता आहे. सकाळी 6.52 वाजता भूकंपाचा हा सौम्य धक्का जाणवला. भारतीय भूकंप मापक यंत्रणेवर नोंद करण्यात आल्याचं जिल्हा आपत्ती केंद्राने सांगितलं आहे.

  • रात्री उशीरा अचानक फडणवीस शिंदेंच्या घरी पोहचले अन्...

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर आले होते. त्यांच्यासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे याच्यात महत्वाची बैठक पार पडली. तिघांमध्ये मुंबईसह राज्यातील जागा वाटपासंदर्भात बंद दाराआड बैठक झाली. जवळपास 2 तास ही बैठक झाली.

  • बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंना शरद पवारांचा मोठा धक्का

    भाजपला रामराम ठोकत राजेंद्र मस्के राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मस्के बंडखोरीच्या तयारीत असल्याची बातमी 'झी 24 तास'ने दिली होती. मस्के यांचा हा निर्णय पंकजा मुंडेंना निवडणुकीअगोदर मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक शरद पवारांच्या गळाला लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मस्के यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मोठे शक्ती प्रदर्शन करत मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

  • दिवाळीसाठी एसटीच्या जादा फेऱ्या 

    परिवहन पालघर विभागातील आठ आगारांतून 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत लांब पल्ल्याच्या 38 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर विभागाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग व परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांसाठी तिकीट दरांमध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सुट्टीत आपल्या गावी घरी जाण्याकरिता व सुट्टीतून पुन्हा येण्यासाठी 50 टक्के सवलतीचे अर्ज वितरित करण्यात येतील. गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • शेकाप आज उमेदवारांची यादी जाहीर करणार

    शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे. जयंत पाटील अलिबागमधून उमेदवारांच्या यादीची घोषणा करणार आहेत. शेकप 8 ठिकाणी उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. महविकास आघाडी शेकप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • प्रियांका गांधी उद्या उमेदवारी अर्ज भरणार

    काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वद्रा वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या बुधवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली. प्रियांका अर्ज भरत असताना काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत.

  • मनसेची दुसरी यादी जाहीर होणार?

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज दुसरी यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल कल्याणमध्ये राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. राजू पाटील यांना कल्याण ग्रामीण आणि अविनाश जाधव यांना ठाण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • कुलाब्याच्या माजी आमदाराला फडणवीस आज भेटणार

    भाजपचे कुलाब्याचे माजी आमदार राज पुरोहित हे सोमवारी 'सागर' बंगल्यावर दाखल झाले होते. परंतु फडवणीस यांनी आज सकाळी 11 वाजता भेटण्यासाठी वेळ दिली आहे.

  • संदीप नाईक निवडणूक लढवण्यावर ठाम; तुतारी हाती घेणार?

    नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे बैठक घेऊन संदीप नाईक आज निर्णय जाहीर करणार आहेत. संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • कोकणात अजित पवारांना ठाकरेंचा मोठा धक्का

    कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव हे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता 'मातोश्री' निवासस्थानी पक्षात प्रवेश करणार आहेत. स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी यावेळी 'मातोश्री'वर उपस्थित असणार आहेत.

  • महाविकास आघाडीची आज दुपारी निर्णायक बैठक

    आज दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटला बैठक होणार आहे. जागावाटपामध्ये ज्या जागांमुळे तिढा निर्माण झाला आहे त्यावर तोडगा काढण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न असेल.

  • धुळ्यात शिंदे गटाला धक्का! जिल्हा प्रमुखच जरांगेंकडून लढणार?

    धुळ्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता. शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी मनोज जरागेंची भेट घेतली.
    मोरे यांनी जरांगे यांच्याकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. धुळे शहर विधानसभेची जागा भाजपाला सोडल्याने मानोज मोरे नाराज आहेत.

  • उकाडा, घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण

    संध्याकाळी पडणारा पाऊस आणि दिवसभर ऊन यामुळे जाणवणाऱ्या उकाड्याने मुंबईकर बेजार झाले आहेत. सांताक्रुझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर सोमवारी सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवेत वाढलेला उष्मा आणि आर्द्रता यामुळे उकाडा अधिक तापदायक ठरत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पारा असाच चढा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

  • पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा कहर! सावधनतेचा इशारा

    शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू आणि चिकुनगुन्याचा उद्रेक झाला आहे. शहरात महिनाभरात डेंग्यूचे 492 संशयित रुग्ण तर चिकुनगुन्याचे 261 रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच रुग्णांमध्ये वेगळी आणि तीव्र लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे आरोग्यतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link