Photo : 'ती' अभिनेत्री सत्तरीची... पण अदा मात्र पंचविशीतल्या तरुणीला लाजवणारी

बॉलिवूड अभिनेत्रींच्या गर्दीत काही नावं कैक वर्षांपासून तग धरून आहेत... 

Oct 22, 2024, 10:35 AM IST

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही असे फोटो शेअर केले, जे पाहताक्षणी चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका. 

1/7

अभिनय

manish malhotra shares breathtaking photos of veteran actress rekha

काही अभिनेत्री या त्यांच्या अभिनयामुळं चर्चेत असतात. तर, काही अभिनेत्री या त्यांच्या रुपामुळं चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेताना दिसतात. अशाच एका अभिनेत्रीचे घायाळ करणारे फोटो सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं एका अशा अभिनेत्रीचे फोटो शेअर केले आहेत जी सध्या वयाची सत्तरी ओलांडूनही कमाल सुंदर दिसते.   

2/7

रेखा

manish malhotra shares breathtaking photos of veteran actress rekha

ही अभिनेत्री म्हणजे रेखा. वाढत्या वयाप्रमाणं दर दिवशी सौंदर्यही आणखी कमाल होत असणाऱ्या रेखा यांच्या घायाळ करणाऱ्या अदा मनिष मल्होत्रानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत.   

3/7

आयफा

manish malhotra shares breathtaking photos of veteran actress rekha

नुकत्याच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्याच्या वेळी रेखा यांनी एका नृत्याचं सादरीकरण केलं होतं. यासाठीच त्यांचा हा लूक मनिष मल्होत्रानं डिझाईन केला होता.   

4/7

लेहंगा

manish malhotra shares breathtaking photos of veteran actress rekha

अतिशय सुंदर अशा बनारसी सिल्क कापडापासून तयार करण्यात आलेला लेहंगा आणि त्यावर साजेसे दागिने घालत रेखांचा हा लूक परिपूर्ण करण्यात आला होता.   

5/7

कल्ली लेहंगा

manish malhotra shares breathtaking photos of veteran actress rekha

मनिषनंच दिलेल्या माहितीनुसार हा बनारसी कल्ली लेहंगा असून, त्यावर जरदोसी एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलं होतं.   

6/7

समर्पणाचं कौतुक

manish malhotra shares breathtaking photos of veteran actress rekha

रेखा यांच्याविषयी सांगताना मनिषनं त्यांच्या कलेप्रती असणाऱ्या समर्पणाचंही कौतुक केलं.   

7/7

स्टाईल सेन्स

manish malhotra shares breathtaking photos of veteran actress rekha

लूक पूर्ण करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आणि त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असल्याचं म्हणत मनिषनं त्यांचा स्टाईल सेन्सही अधोरेखित केला.   

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x