मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या यश जोहर यांनी कशी सुरु केली 2000 कोटींची धर्मा प्रोडक्शन कंपनी?

धर्मा प्रोडक्शन विषयी सगळ्यांनाच माहित आहे. चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये या चित्रपटाचं नाव येतं. धर्माच्या बॅनर अंतर्गात आतापर्यंत 64 चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यात आता या प्रोडक्शन हाउसची 50 टक्के भागीदारी ही सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी खरेदी केली आहे. दरम्यान, या धर्मा प्रोडक्शन हाउसची सुरुवात कशी झाली.

| Oct 21, 2024, 20:29 PM IST
1/7

अदार पुनावाला यांनी 1000 कोटींमध्ये ही डील साइन केली आहे आणि यात त्यांनी 50 टक्के भागीदार घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीची किंमत ही 2000 कोटी लावण्यात आली आहे. धर्मा प्रोडक्शान हाऊसची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया.  

2/7

धर्मा प्रोडक्शन कंपनीची सुरुवात किंवा स्थापना ही करण जोहरचे वडील यश जोहर यांनी केली होती. 1976 मध्ये त्यांनी ही कंपनी सुरु केली. आता या कंपनीला 48 वर्ष झाली आहेत. यश जोहर यांच्या निधनानंतर अर्थात 2004 पासून करण जोहर ही कंपनी सांभाळत आहे. 6 सप्टेंबर 1929 मध्ये यश जोहर यांचा जन्म हा ब्रिटिश राजवटीत असलेल्या पंजाबच्या लाहौरमध्ये झाला होता. 

3/7

देशाची फाळणी झाली तेव्हा त्यांचं कुटुंब हे दिल्लीत आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीत आल्यानंतर यश यांच्या वडिलांनी नानकिंग स्वीट्स मिठाई हे दुकान सुरु केलं. यश जौहर यांना आणखी 8 भावंड होते. ते अभ्यासात सगळे हुशार होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना मिठाईच्या दुकानात हिशोब करायला बसवलं. पण यश जोहर यांना हे आवडलं नाही.

4/7

एक दिवस यश जोहर यांच्या आईनं सांगितलं की तुझा जन्म मिठाईच्या दुकानात बसण्यासाठी झाला नाही. त्यानंतर यश जोहर मुंबईत आले आणि त्यांचं स्ट्रगल सुरु झालं. त्यांनी एका न्यूज पेपरमध्ये फोटोग्राफर म्हणून काम केलं. 

5/7

असं म्हटलं जातं की मधुबाला कधीच कोणाला फोटो काढू देत नव्हत्या. पण यश जोहर यांच्या इंग्रजीनं त्या प्रभावित झाल्या आणि त्यांचे पिक्चर्स क्लिक करु दिले. 1952 मध्ये सुनील दत्तच्या प्रोडक्शन हाउस 'अजंला आर्ट्स' यश जोहर यांनी जॉईन केलं. 

6/7

त्यानंतर त्यांनी सह निर्माता म्हणून देवानंद यांच्या प्रोडक्शन हाउस 'नवकेतन फिल्म्स' साठी काम करु लागले. देवानंद यांच्या प्रोडक्श हाउसमधून त्यांनी'गाइड', 'ज्वैल थीफ', 'प्रेम पुजारी' आणि 'हरे रामा हरे कृष्णा' सारखे चित्रपट बनवले.  

7/7

त्यानंतर यश जोहर यांनी 1976 मध्ये स्वत: ची कंपनी सुरु केली. त्यानंतर प्रोडक्शन हाउसमधून त्यांनी पहिला चित्रपट बनवला दोस्ताना. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज खोसला यांनी केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.