Maharashtra Breaking News Live Updates : छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नम्रपणे नकार

Fri, 03 Jan 2025-8:16 pm,

Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत कुठं नेमकं काय घडतंय? पाहा सविस्तर वृत्त...

Maharashtra Breaking News Live Updates : बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी तपासाला वेग आला आहे. तिथं राज्यात इतरही अनेक घडामोडींना वेग आला असून, दिवसभरातील लक्षवेधी घटना कोणही... पाहा एका क्लिकवर. 


Latest Updates

  • छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नम्रपणे नकार दिला आहे.  शिवरायांचा आदर ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नकार दिला आहे.  मान्यवरांनी आग्रह केल्यानंतर ही फडणवीस यांनी विनंती पूर्वक दिला नकार. 

     

  • राजगुरूनगर शहरात घडलेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार व खुनातील आरोपीला फाशी व्हावी, पीडित कुटुंबाला शासकीय मदत मिळावी या मागणीसाठी आज स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या वतीने खेड तालुक्यातील शिरोली टोल नाक्यावर पुणे नाशिक महामार्ग अडविण्यात आला. आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन केल्याने महामार्गाच्या दोन्हीं बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेबाबत पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी शासनाने घेतलेले निर्णय पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजावून सांगितल्या नंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले

  • बच्चू कडु यांनी दिला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे सुपूर्द केला आहे.

  • राजन साळवी यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत, झी 24 तासची बातमी खरी ठरली 

    योग्यवेळी योग्य निर्णय घेईन असं म्हणत राजन साळवी यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत. पराभवाला  वरिष्ठ कारणीभूत असल्याच सांगत याचा शोध घेतला गेला पाहिजे, असं देखील राजन साळवी यावेळी म्हणाले. माझ्या पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी असून मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, असं परखड मत राजन साळवी यांनी मांडल आहे. माझ्या पराभवाला कारणीभूत कोण हे शोधणे गरजेचे असल्याचंही राजन साळवी यावेळी म्हणाले. राजन साळवी यांच्याबाबतीत झी 24 तासने दिलेली बातमी ठरली खरी आहे. 

  • ट्रान्स हार्बर ची वाहतूक विस्कळीत 

    तुर्भे आणि कोपरखैराने स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या...

    वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू..

  • भुजबळ यांच्या शायरीवर फडणवीस यांची शायरी..

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    नायगावच्या विकासाबाबत गावच्या सरपंचने केलेल्या मागण्याबाबत त्या पूर्ण केल्या जातील. तसेच दुर्दैवाने नायगाव येथील महत्वाचे स्थान दुर्लक्षित राहिले होते, पण भुजबळ साहेबांनी त्याच्याकडे लक्ष दिले.

    भुजबळ यांच्या शायरीवर फडणवीस यांचं शायरीतून उत्तर 

    मै ऐकेल चला था जनेबी मंजिल्..

    मै चलता गया और करावा बनता गया.

  • अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण

    मंत्री रामदास आठवले यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. आरोपी विशाल गवळी राहत असलेली इमारत धोकादायक, केडीएमसीने नोटीस दिल्याची माहिती मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. 

    इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी केडीएमसी आयुक्तांकडे मागणी केली असून पीडित कुटुंबियांच्या पाठीशी आमचा पक्ष उभा राहणार असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 

  • शरद पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावर

    महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चाकणमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार येणार आहेत.या कार्यक्रमासाठी छगन भुजबळही येणार आहेत. त्यामुळे मंचावरून होणा-या या दोन नेत्यांच्या भाषणाकडे लक्ष असेल.

    शरद पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावर
    पुण्यातील कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार
    सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पवार-भुजबळ एकत्र
    दिलीप वळसे पाटील यांनाही कार्यक्रमाचं आमंत्रण 
     

  • सावित्रीबाई फुलेंनी बदल करुन दाखवला - देवेंद्र फडणवीस

    सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री नायगावमध्ये स्मारकाच्या ठिकाणी पोहचले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक गोष्टींवर चर्चा केली. 'सावित्रीबाई फुलेंनी बदल करुन दाखवला. त्यांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली होती. फुलेंनी विषमता ही दूर केली. नायगावमध्ये येण्याची संधी मिळाली. या मातीनं एक वेगळी ऊर्जा दिली', असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

  • दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडवीसांचे भेट घेतली होती.. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार वरूण सरदेसाई यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती.  तर ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी वाल्मिक करडा शरण आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचं यांचं कौतुक केलं होतं. 

  • वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे. खंडणीप्रकरणी विष्णू चाटेही अटकेत आहे. वाल्मिक कराड आणि पवनचक्की कंपनीच्या अधिका-यांचं फोनवरून संभाषण झालं होतं, अशी मोठी कबुली चाटेनं दिली आहे. सीआयडीनं न्यायालयात अहवाल सादर केला. त्यात हा खुलासा केला आहे. कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरूनच धमकी दिल्याची तक्रार कंपनीच्या अधिका-यांनी दिली होती. याच बाबत चाटेनं दोघांचं बोलणं झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे कराडचा पाय आता आणखी खोलात गेलाय. 

  • 'सामना'तून फडणवीसांचं कौतुक 

    दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडवीसांचे भेट घेतली होती. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार वरूण सरदेसाई यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती. तर ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी वाल्मिक करडा शरण आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचं यांचं कौतुक केलं होतं.

  • शरद पवार, छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याकडं सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिलीय. तर भुजबळांसोबत कौटुंबीक संबंध असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. दोन्ही नेते एकत्र असतील तर यात राजकारण नको, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना UBT पक्ष अ‍ॅक्शन मोडवर

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज महत्त्वाची बैठक

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    उद्धव ठाकरेंनी दुपारी 1 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावलीय...

     मुंबईतील पूर्वउपनगर आणि पश्चिम उपनगरातील 1 ते 7 विभागातील विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख बैठकीला उपस्थित राहणारेत. बैठक

    मुंबईत एकूण 12 विभाग आहेत. त्यातील 1 ते 7 विभागातील विभागप्रमुखांची बैठक होणारेय. तर उर्वरित 7 ते 12 विभागप्रमुखांची बैठक 2 दिवसांत पार पडणारेय. 

  • काही मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारला नाही - सुप्रिया सुळे 
    राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. 

  • CETच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. CBSE चा मानसशास्त्राचा पेपर आणि LLB च्या अभ्यास क्रमासाठीची CETची परीक्षा एकाच  दिवशी जाहीर केली आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांचा  गोंधळ न होण्यासाठी  CET च्या परीक्षेच्या तारखेत लवकरच बदल करणार आहेत. 

  • वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा, सकल मराठा समाजाची मागणी

    मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जातोय. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात 7 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर शहरात एक बैठक पार पडली त्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. हा चक्काजाम सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आली.

  • बीडमधील तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या मागण्या वाढल्या

    बीडच्या खंडणी गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडकडून केज सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. आपल्याला 'स्लिप एपनिया' नावाचा आजार असल्याचा दावा त्याने केला आहे.  रुग्णाला अशावेळी ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते, ही मशीन द्यावी आणि मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची त्याने न्यायालयाकडे विनंती केली आहे. मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची वाल्मिक कराडची मागणी आहे..आधी जेवायला खिचडी द्यावी अशा पद्धतीची मागणी त्यांना केली होती,  त्यामुळे वाल्मिक कराडच्या इच्छांची यादी वाढतच चालल्याचं चित्र दिसत आहे. 

  • संतोष देशमुखांच्या भावाचं पोलीस अधीक्षकांना पत्र

    मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात पोलीस ठाण्यातच अरेरावी करण्यात आल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. बाहेरील लोक थेट कराडच्या पोलीस कोठडीपर्यंत जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसंच वाल्मीक कराडला मिळत असलेल्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप  केला आहे. काही पोलीस अधिकारी बाहेरच्या लोकांना मदत करत असून एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी या पत्रातून केली आहे. 

  • नवी मुंबई  - सानपाडा डिमार्ट जवळ गोळीबार

    दोन जणांकडून फायरिंग.. फायरिंग करून बाईकवरून दोघे फरार

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पाच ते सहा राऊंड फायरिंग करून दोन इसम फरार, एक जण जखमी

    सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल

  • महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या 95 टक्के एफडीआय अवघ्या 6 महिन्यात...

    पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे. 
    मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो...
    माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो.

    2020-21 : 1,19,734 कोटी
    2021-22 : 1,14,964 कोटी
    2022-23 : 1,18,422 कोटी
    2023-24 : 1,25,101 कोटी
    2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात) : 1,13,236 कोटी

  • पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची शिवसेनेतून हकालपट्टी

    शिवसेनेच्या ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

  • नाशिक - निफाड परिसरात पारा पुन्हा घसरला

    आजचे तापमान 8.2 अंश सेल्सिअस 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शेजारील येवल्यात देखील थंडीची लाट 

    अति थंडीमुळे दुध उत्पादनात घट होण्याची भीती

    द्राक्षमनी तडकण्याची भीती मुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत 

    गहू, हरभरा पिकाला मात्र थंडीचा फायदा

  • गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे

    राज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी आणि गौण खनिजांच्या नियमनात अधिक कार्यक्षमतेसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील विभागाने आता गौण खनिजासंबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    याआधी हे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे असायचे, परंतु वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि नियमन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ही नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link