Maharashtra Breaking News LIVE Updates: अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता

Diksha Patil Thu, 02 Jan 2025-8:35 pm,

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात नवीन वर्षात काय काय झालं सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE Updates: नवीन वर्षाला सुरुवात झाली असून काल दिवसभरात काय झालं आणि आता काय होणार आहे. याविषयी एका क्लिकवर जाणून घेऊया.

Latest Updates

  • अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता

    कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत 357 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा  योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

  • राजन साळवी (उबाठा) यांच्या कार्यकर्त्यांची बैठक 

    राजापूरला राजन साळवी (उबाठा) यांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    त्यावेळी साळवी यांनी पक्ष बदलाबाबत गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केलेली आहे

    उद्या लांजा येथे देखील बैठक आहे

    यावेळी राजापूर येथे बोलताना राजन साळवी यांनी लांजा येथील कार्यकर्त्यांशी बोलतो आणि आपण भविष्याचा निर्णय योग्यवेळी घेऊया असं म्हटले आहे

    त्यामुळे उद्याच्या लांजाच्या बैठकीला महत्त्व आहे..

  • नागपूर - बाबुळखेडा शिवारात फायरिंग, एकाचा मृत्यू

    नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत बाबुळखेडा शिवारात फायरिंगची घटना 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    कारमधून जाणा-यावर गोळीबार, एकाचा मृत्यू
    हल्लेखोर बाईकवरून आल्याची प्राथमिक माहिती 

    पवन हिरणवार असं मयताचे नाव 

    पोलीस घटनास्थळी दाखल , तपास सुरू

  • संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी घेतली SIT चे प्रमुख बसवराज तेली यांची भेट

    - संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी घेतली SIT चे प्रमुख बसवराज तेली यांची भेट

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - देशमुख यांची हत्या दैठणा ग्रामपंचायत हद्दीत घडल्याने मूर्त संतोष देशमुख यांचे मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्राची मागणी.

    - पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या केलेल्या  पंचनामा कागद पत्राची मागणी.

    - संतोष देशमुख यांचे मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी घटनास्थळावरील पंचनामाची गरज असल्याची माहिती.

  • एमपीएससी परीक्षेच्या तारखा जाहीर 

    पुढे ढकलण्यात आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

    वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

    जा.क्र.०४८/२०२४ 

    महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025

    जा.क्र.०४९/२०२४ 

     महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

    आत्ता 5 जानेवारी  ला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आत्ता  2  फेब्रुवारी 2025 ला होणार. 

    2 फेब्रुवारी ला होणारी.संयुक्त पूर्व परीक्षा गट क. 4 मे 2025

  • बीडमधील तीन आरोपी फरार घोषित

    संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपी फरार घोषित

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पकडून देणाऱ्याला दिले जाणार योग्य बक्षीस

    सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे वाँटेड असल्याचे पोलिसांकडून जाहीर

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्रसिद्धीपत्र जारी

    या आरोपीला पकडून दिल्यास योग्य बक्षीस दिले जाईल व नाव गोपनीय ठेवले जाईल.

  • धाराशिव - मेसाई जवळगा सरपंच निकम हल्ला प्रकरणातील बनाव उघड

    बंदुक मिळवण्यासाठी स्वतःच रचला कट 
    पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरण

    सरपंच यांनी त्यांच्या साथीदारासोबत बंदूक परवाना मिळाविण्यासाठी स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचल्याचे समोर

    पवनचक्की वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप करीत सरपंच यांनी टाकीवर चढून आंदोलन

    मात्र हा सगळा स्टंट असल्याचे उघड झाले. 

    पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन ही दिली माहिती

    सरपंच हल्ला प्रकरणी चार अज्ञात आरोपी विरोधात तुळजापूर पोलिसात करण्यात आला आहे गुन्हा दाखल 

    कदम यांच्या गाडीवर पेट्रोल, अंडे व दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असे चित्र रंगवण्यात आल्य स्पष्ट

  • मंत्रिमंडळ निर्णय -

    - महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय.

    - शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्यासाठी निकष शिथिल.

  • राज्य मंत्रिमंडळात मोठा निर्णय; 963 शेतकऱ्यांना होणार फायदा

    4 हजार 849 एकर जमीन राज्यसरकार शेतकऱ्यांना परत करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राज्य मंत्रिमंडळात मोठा निर्णय. 963 शेतकऱ्यांना होणार फायदा. 

  • सरकारी कर्माचाऱ्यांच्या वेतनावरून मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन 'मुंबै जिल्हा बँके'तून दिलं जाणार. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाची प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. 

  • बीड हत्या प्रकरणात माझा संबंध नाही - धनंजय मुंडे

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात एस आय टी चे पथक थोड्याच वेळात केजमध्ये तपासासाठी दाखल होणार आहेत. पथकाचे प्रमुख बसवराज तेली हे थोड्याच वेळात केजला पोहोचणार आहेत. बसवराज तेली घेणार तपासाचा आढावा. मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची तेली घेणार भेट. धनंजय देशमुख आणि एस आय टी चे इतर अधिकारी यांच्यात केज येथे शासकीय विश्रामगृहात चर्चा सुरू तर धनंजय देशमुभ हे संतोष देशमुख यांच्या हत्येची बसवराज तेली यांना देणार माहिती. तर या सगळ्यावर धनंजय मुंडे म्हणाले की त्यांचा या हत्या प्रकरणात माझा संबंध नाही. माझ्या संदर्भातील निर्णय आमच्या पक्षाचे नेते अजित पवार घेतील. 

  • राज्य मंत्री मंडळ बैठकीस सुरुवात

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीस उपस्थित. त्यासोबत मंत्री गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अतुल सावे, आशिष शेलार, नितेश राणे, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, भरत गोगवले, जयकुमार रावल, शिवेंद्र राजे, गणेश नाईक, दादा भुसे, बाबासाहेब पाटील यांची ही बैठकीस हजेरी

  • पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खडेबोल

    तात्काळ आपल्या खात्याचा पदभार स्वीकारा, अशी कान उघडणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. अशा प्रकारे ज्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही त्यांची देवेंद्र फडणवीसांनी कानउघडनी केली आहे. कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं अनेकांची नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावरून अनेकांनी त्यांच्या पदभार स्वीकारला नाही. 

  • कल्याण अत्याचार प्रकरणात विशाल गवळीला 2 दिवसांची कोठडी

    आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळी दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले. सुनावणी दरम्यान पीडित मुलीच्या आई आणि वडील देखील न्यायालयामध्ये दाखल झाले होते. न्यायालयामध्ये आई आणि वडिलांची साक्ष नोंदवल्याचे म्हटले जाते तर या सगळ्यात विशाल गवळीला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

  • मी नाराज नाही, दोन दिवसांत भूमिका मांडणार; राजन साळवी स्पष्टचं बोलले

    पक्षात येणाऱ्या माणसाचं स्वागत करण हे प्रत्येक पक्षाच काम असतं. पदाधिकारी ठाकरेंना सोडून जाण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे राजन साळवी हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी बोलताना राजन साळवी म्हणाले ते नाराज नाहीत आणि दोन दिवसांत भूमिका मांडणार. दोन दिवसांपूर्वी साळवेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती. याशिवाय नाराज असल्याच्या अफवा फेटाळल्या आहेत. 

  • अमेरिकेच्या लास वेगासमध्ये ट्रंप टॉवरबाहेर टेस्ला सायबर ट्रॅकमध्ये आग

    या अपघातात एकाचा मृत्यू 7 जण जखमी. दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने तपास सुरु आहे. लास वेगासमधल्या ट्रम्प हॉटेल बाहेरच्या स्फोटाचा तपास सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची माहिती, न्यू ऑर्लीन्समधील हल्ल्याशी संबंध आहे का? याची चौकशी सुरू आहे. 

     

  • आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार परदेशातून परतणार असल्याची माहिती 

    राज्यात सुरु असलेल्या बीड प्रकरणावर आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर पवार बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे यांच्याविषयी अजित पवार बोलणं टाळत असल्याने विरोधकांकडून टीका होत आहेत.  बीड प्रकरण आणि मंत्र्यावर होत असलेल्या आरोपांवर दादा बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचे

  • कल्याण प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आज कोर्टात होणार हजर

    उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आरोपी विशाल गवळी हा पोलीस कोठडीत आहे. तर आज त्याची पोलीस कोठडी संपत असून त्याला पुन्हा एकदा आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या वेळी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी विशाल गवळीनं तिची गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात पोलिसाना निष्पन्न झाले आहे. तर पोलिस तपासाकरिता विशालला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला नेण्यात आले होते. पोलीस आज मिळालेले काही पुरावे न्यायालयात सादर करणार असून तपासासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करणार असल्याची कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची माहिती. 

  • संतोष देशमुख हत्येप्रकरणी CID तपासानंतर आता एसआयटी गठीत

    बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली पथकातील 10 पोलीस अधिकारी लावणार हत्येचा छडा.

     

  • बांगलादेशात हिंदुविरोधात कारवाया सुरुच...

    मौलवी बाजारात हिंदू मंदिर उध्वस्त.. कट्टरपंथियांकडून  मंदिरांची तोडफोड 

  • जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा कहर.. 

    काश्मीरमधल्या अनेक भागात पारा तापमान उणे अंश सेल्सिअस खाली. मैदानी भागात शीत लहरींनी नागरिकांचे हाल. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link