Bharat Gogawale meet Sunil Tatkare : भरत गोगावले सुनील तटकरेंच्या भेटीला, भेटीमागचं कारण गुलदस्त्यात

Mon, 09 Oct 2023-8:42 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस उद्या वाहतुकीसाठी बंद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक उद्या दुपारी १२ ते २ बंद राहणार आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या दुपारी12 ते 2 बंद राहील. एक्सप्रेस हायवेवर बोरघाटात ट्रॅफिक संदर्भातली गँट्री म्हणजेच लोखंडी कमान बसवण्यात येणार असल्यानं वाहतूक बंद राहणार आहे.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस उद्या वाहतुकीसाठी बंद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक उद्या दुपारी १२ ते २ बंद राहणार आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या दुपारी12 ते 2 बंद राहील. एक्सप्रेस हायवेवर बोरघाटात ट्रॅफिक संदर्भातली गँट्री म्हणजेच लोखंडी कमान बसवण्यात येणार असल्यानं वाहतूक बंद राहणार आहे.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • भरत गोगावले सुनील तटकरेंच्या भेटीला 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bharat Gogawale meet Sunil Tatkare : .भरत गोगावले सुनील तटकरेंच्या भेटीला गेले आहेत, राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही भेट झालीय. भेटीमागचं कारण गुलदस्त्यात.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मुंबई हायकोर्टाचा एकनाथ खडसेंना दणका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलीय... पुणे भोसरी येथील कथित जमीन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीनं देखील गुन्हा दाखल करून चौकशी सुरू झाली होती... ईडीनं नोंदवलेला गुन्हा रद्द करावा, अशी याचिका खडसेंनी केली होती... मात्र मुंबई हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळली... त्यामुळं खडसेंवरील ईडी कारवाई सुरूच राहणाराय... खडसेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • काँग्रेसप्रणित राज्यांत जातनिहाय जनगणना- राहुल गांधी

     

    Rahul Gandhi : काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलीय... सत्तेवर आल्यास देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीनं घेतलाय, असंही त्यांनी जाहीर केलं. काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत आज जातनिहाय जनगणनेवर व्यापक चर्चा करण्यात आली. काँग्रेसची सत्ता असलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात जातनिहाय जनगणना करण्याचं ठरवलंय, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं.

  • शिवाजी पार्क न मिळाल्यास कोर्टात धाव घेणार- अनिल परब

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thackeray Group on Dasara Melava : सालाबादप्रमाणं यंदाही शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा व्हावा, यासाठी शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतलीय. शिवाजी पार्क न मिळाल्यास कोर्टात धाव घेणार, असा इशारा आमदार अनिल परबांनी दिलाय... परवानगीवरून मुंबई महापालिकेकडून खोडा घालण्याचा प्रयत्न केला जातोय... शिवसेना शिंदे गटाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहेय, अशी टीका परबांनी केली...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • शिंदे गटाची दसरा मेळावा मैदानासाठी धावपळ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shinde Group on Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या मैदानासाठी शिंदे गटाची चांगलीच धावपळ सुरू आहे. शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कसह पाच मैदानांसाठी अर्ज केले आहेत. शिवाजी पार्कसह क्रॉस मैदान, bkc, महालक्ष्मी रेसकोर्स आणि सोमय्या मैदानासाठी या ठिकाणी परवानगी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज यावर चर्चा होऊन नक्की कोणत्या ठिकाणी दसरा मेळावा घेयायचा ते ठरणार आहे. सोमय्या किंवा रेसकोर्स मैदानावर मेळावा होण्याची जास्त शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मराठा आरक्षणाबाबत उद्या बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maratha Reservation : मराठा आरक्षण उपसमितीची उद्या महत्वाची बैठक होणाराय... चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील कार्यालयात दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडणाराय... मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर न्या. संदीप शिंदे आयोगानं मराठवाड्यात मराठा समाजाचे पुरावे गोळा करण्यासाठी नेमकं काय केलं, याचा आढावा यावेळी घेतला जाऊ शकतो. त्याशिवाय मराठा समाजासाठी राबवण्यात येणा-या सुविधा किती जणांपर्यंत पोहोचल्या, आणखी नवीन काही सुविधा मराठा समाजासाठी सुरू करता येतील का, याबाबतही उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.

     

  • पवारांना हुकूमशहा म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे- संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाकडून पवारांना हुकूमशहा म्हणण्यावरून राऊतांनी निशाणा साधलाय...पवारांना हुकूमशहा म्हणणा-यांना लाज वाटली पाहिजे...दिल्लीतून आलेली स्क्रिप्ट वाचली जातेय, असं म्हणत राऊतांनी अजित पवार गटावर हल्लाबोल चढवलाय...तर बाळासाहेबांना विठ्ठल विठ्ठल बोलणा-यांनीच पक्ष फोडल्याची टीका शिंदे गटावर केलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 5 राज्यातील निवडणुका जाहीर, 3 डिसेंबरला निकाल

     

    Assembly Election Dates for 5 States Announced : देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय.. तेलंगणा, छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यात निवडणूक जाहीर झालीय.. छत्तीसगढमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान होईल.. तर मध्य प्रदेशमध्ये 17 आणि राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होईल.. सर्व पाच राज्यांचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे.. या 5 राज्यांमध्ये मिळून विधानसभेच्या 679 जागा आहेत.. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधीची ही लिटमस टेस्ट मानली जातेय.. 

  • पनवेल, मुलुंड टोलनाक्यावर  मनसैनिक आक्रमक

     

    MNS on Toll Naka : छोट्या गाड्यांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू असा इशारा राज ठाकरेंनी दिला.. आणि त्यानंतर आता मनसैनिक आक्रमक झालेत.. टोलनाक्यावर मनसैनिक टोल न देताच गाड्या सोडून देत आहेत... हलक्या चारचाकी वाहनांकडून कोणताही टोल घेतला जात नाहीए.. पनवेलच्या शेडुंग आणि मुलुंड टोलनाक्यावर आक्रमक मनसैनिकांनी गाड्या फुकट सोडल्यायत.. टोलसाठी उपोषण करणारे मनसे नेते अविनाश जाधव मुलुंड टोलनाक्यावर प्रत्यक्ष उपस्थित आहेत.. तर पनवेल टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा झालेत..

  • शरद पवारांची दसऱ्याला पुण्यात सभा 

     

    Sharad Pawar : दसऱ्या दिवशी पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार. 24 ऑक्टोबर रोजी शरद पवार पुण्यात घेण्यास सभा.राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघर्ष यात्रेची सुरुवात होणार शरद पवारांच्या सभेनं. शरद पवारांच्या सभेने होणार युवा संघर्ष यात्रेची सुरुवात. यात्रेची सांगता नागपूरच्या शरद पवारांच्या सभेनं होणार.

  • महाराष्ट्र भाजप नेते प्रचारात उतरणार

     

    BJP : निवडणूक आयोगाच्या वतीने पाच राज्यातील निवडणुकांचा वेळापत्रक जाहीर होताच भाजप कामाला लागली.महाराष्ट्र भाजप आणि मुंबई भाजपच्या नेत्यांना या सर्व राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी रिंगणात उतरणार. भाजपचे आमदार यांना विशेष करून राजस्थान तेलंगणा मध्य प्रदेशमध्ये जबाबदारी दिली जाणार. या अगोदर देखील भाजपच्या आमदाराने या राज्यात जाऊन वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतला होता.

  • प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Praful Patel : प्रफुल्ल पटेलांचा बालेकिल्ला गोंदियात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय. युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. 2 जुलैला राष्ट्रवादी फुटीनंतर हे सर्व कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच होते. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत  नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संजय राऊतांचा अजित पवार गटावर हल्लाबोल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut On Ajit Pawar : निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाकडून पवारांना हुकूमशहा म्हणण्यावरून राऊतांनी निशाणा साधलाय...पवारांना हुकूमशहा म्हणणा-यांना लाज वाटली पाहिजे...दिल्लीतून आलेली स्क्रिप्ट वाचली जातेय, असं म्हणत राऊतांनी अजित पवार गटावर हल्लाबोल चढवलाय...तर बाळासाहेबांना विठ्ठल विठ्ठल बोलणा-यांनीच पक्ष फोडल्याची टीका शिंदे गटावर केलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात पोस्टमन गंभीर जखमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Stray Dogs Attack On Postman : मुंबईत भटक्या कुत्र्यांनी एका पोस्टमनवर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय...मुंबईच्या पवई परिसरात व्हीनस बिल्डिंगजवळ पत्र देण्यासाठी पोहोचलेल्या पोस्टमनवर 5 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला...कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय...पोस्टमन आपलं काम करण्यासाठी जात असतानाच या कुत्र्यांनी घेरलं...आणि एकामागोमाग एक असे पाच कुत्रे पोस्टमनवर तुटून पडले...बिल्डिंग जवळील वॉचमन मदतीला आल्याने मोठा अनर्थ टळलाय...मात्र, या हल्ल्यात पोस्टमन गंभीर जखमी झालाय...त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत...कुत्र्यांनी पोस्टमनवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय...या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं असून, महापालिकेने अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होतेय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विधीमंडळ सचिवांची शिंदे आणि ठाकरेंना नोटीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thackeray Vs Shinde : शिवसेना कोणाची याबाबतचे पुरावे 2 आठवड्यात सादर करण्याची नोटीस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना जारी करण्यात आलीय. शिंदे ठाकरेंना विधीमंडळ सचिवांनी गेल्या मंगळवारी ही नोटीस बजावलीय. आता हे पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांकडे 8 दिवसांची मुदत शिल्लक आहे. दोन्ही गटांना पक्षावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मेडिकलचे 180 विद्यार्थी अडचणीत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Medical Student : मुंबईतल्या दोन मेडिकल महाविद्यालयातील जवळपास 180 विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. याला विद्यार्थीच जबाबदार ठरतायत. सायन, कूपर हॉस्पीटल आणि कॉलेजच्या प्रथम वर्ष वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी लेक्चर बंक करणं, ग्रुपने कॉलेजला दांडी मारणं याप्रकारामुळे अडचणीत आलेत. कॉलेजमध्ये पुरेशी उपस्थिती नसल्याने  या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी नियम मोडल्यामुळे त्यांना परीक्षा देता येणार नाहीय. महाविद्यालय प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शरद पवारांसोबतचे आमदार, खासदार अजितदादांसोबत?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कुणाची हा संघर्ष निवडणूक आयोग तसंच सुप्रीम कोर्टातही सुरु आहे.. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आलीय.. शरद पवार गटाच्या आमदार आणि खासदारांनी अजित पवारांची साथ दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. पाच आमदार आणि काही खासदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवणारी शपथपत्रे दिल्याचा दावा करण्यात आलाय.. अजित पवार गटातल्या एका मोठ्या नेत्यानेच हा दावा केलाय.. अजित पवारांवर विश्वास दाखवणा-या या नेत्यांचा वावर मात्र शरद पवारांसोबत दिसतोय.. पाच आमदारांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले दोन, उत्तर महाराष्ट्रातले दोन आणि मुंबई महानगर प्रदेशातल्या एका आमदाराचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा -  

  • राज्यात अन्नधान्य टंचाईचं सावट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kharip Food Shortage : राज्यात अन्नधान्य टंचाईचं सावट आहे.. राज्यात 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे.. या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानं खरिपातली पिकं करपून आणि जळून गेली आहेत.  त्यामुळे खरिपातल्या पिकांचं उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज आहे. पावसाअभावी कडधान्य, अन्नधान्यांच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. असं झाल्यास पुढच्या वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 16 हजार कोटींचा गंडा?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thane Payement Gatway : पेमेंट गेटवे सेवा पुरवणा-या एका कंपनीचं बँक खातं सायबर गुन्हेगारांच्या टोळक्याने हॅक केलंय. हे खातं हॅक करून वेगवेगळ्या बँक खात्यातून तब्बल १६ हजार कोटींचे व्यवहार करण्यात आलेत. तर 25 कोटींची फसवणूक करण्यात आलीय. ठाणे पोलिसांनी हा प्रकार उघड केला. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र ठाण्यातल्या श्रीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाल्यावर हा प्रकार उघड झाला. एप्रिल 2023 ला कंपनीचं पेमेंट गेटवे खातं हॅक करण्यात आल्याचं उघड झालंय. या प्रकरणात 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र अजून कोणालाही अटक झालेली नाही. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • एम.डी, एमएस कोटींच्या घरात?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Medical Post Graduation Fee Hike : मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट महाविद्यालयांनी भरमसाठ फी वाढ केलीय. ही फी वाढ वर्षाला जवळपास 2 लाख ते 20 लाखांच्या घरात आहे. मेडीकल पोस्ट ग्रॅज्युएट ऍडमिशनसाठी पर्सेंटाईल शुन्यावर आल्यामुळे विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे ही शुल्कवाढ झालीय. केंद्राने अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे निकष शिथिल केलेत त्यामुळे वजा 40 गुण मिळालेले डॉक्टर्सही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पात्र झालेत. त्यामुळे एरवी रिक्त राहणा-या विषयांसाठीही विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढलेत. आता प्रवेशाच्या नियमित फे-या झाल्या आहेत. संस्था स्तरावर प्रवेश फेरीसाठी नोंदणी सुरू झालीय. बहुतेक खासगी मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजेसची फी प्रतिवर्ष 10 लाखांहून अधिक आहे. आता त्यात 2 लाख ते 20 लाखांची वाढ झालीय.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • NCPपक्ष, चिन्ह कुणाचं यावर आज सुनावणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar Vs Ajit Pawar : पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आज पुन्हा निवडणूक आयोगात रंगणार आहे. राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं यावर ६ ऑक्टोबरपासून निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू झालीये. गेल्या शुक्रवारी अजित पवार गटाचा युक्तिवाद झाला. या दरम्यान दोन्ही गटांनी पक्ष आपलाच असल्याचे दावे केले. तर अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलं जाऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी केलीय. शुक्रवारच्या सुनावणीला स्वतः शरद पवार उपस्थित होते. तर वकिलांनी अजित पवार गटाची बाजू मांडली. आता आज दुपारी ४ वाजता सुरू होणा-या सुनावणीत शरद पवार गट युक्तिवाद करणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पिंपरी-चिंचवडमध्ये 8 ते 10 सिलेंडरचा स्फोट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pimpri Fire : पिंपरी चिंचवडमध्ये 8 ते 10 सिलेंडरचा स्फोट झालाय. 21 टन क्षमतेच्या टँकरमधून प्रोपिलिन गॅस अवैधरित्या भरताना हा स्फोट झाला. ही आग इतकी भीषण होती की रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या 3 स्कूल बस जळून खाक झाल्यात. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. याप्रकरणी अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दहावी आणि बारावी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    SSC & HSC Exam : दहावी आणि बारावी बोर्डाच्या किती परीक्षा द्यायच्या? हे आता विद्यार्थीच ठरवणार आहे...नव्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षेची सक्ती राहणार नाहीये...तसंच विद्यार्थ्यांना वर्षातून दोन परीक्षांचा पर्यायही असणार आहे, असं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय...बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मानसिक दडपण कमी करण्याच्या दृष्टीने हा पर्याय देण्यात आलाय...वर्षातून दोन परीक्षांचा पर्याय दिल्यामुळे विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होईल...एका परीक्षेत कमी गुण मिळाले तर दुसऱ्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची संधी विद्यार्थ्याला मिळू शकते...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अभिनेता शाहरुख खानला Y+ दर्जाची सुरक्षा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shahrukh khan : किंग खान शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.. शाहरुख खानला आता Y+ सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे... पठाण आणि जवान या सिनेमांच्या रिलीजनंतर शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.. त्यामुळे मुंबई पोलिसांनी शाहरुख खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केलीय.. Y+ मुळे शाहरुखच्या सुरक्षेत 24 तास सहा वैयक्तिक सुरक्षा अधिकारी तैनात राहतील... तर शाहरुखचं निवासस्थान मन्नतबाहेर 5 बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात असतील.. शाहरुखला याआधी सुरक्षेसाठी फक्त दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात होते.  शाहरुखआधी फक्त सलमान खानला Y+ सुरक्षा देण्यात आलीय.. तर अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांना X दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link