Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Thu, 12 Oct 2023-8:39 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • भूषण पाटील बनवायचा आठवड्याला 50 किलो ड्रग्ज

     

    Pune Sassoon Drug Case : पुणे ससून ड्रग्स प्रकरणातील आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे आठवड्याला 50 किलो एमडी ड्रग्स बनवत होते अशी माहिती समोर येतेय.. नाशिक मधील कारखान्यात दर महिन्याला २०० किलो एम डी ड्रग्सचा साठा तयार होत होता.. प्रत्येक ५० किलो एम डी ड्रग्स तयार करण्यासाठी एक आठवडा लागत होता.. एक किलो एम डी चा बाजार भाव १ कोटी रुपये आहे.. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे दोघेही मिळून नाशिकमधला कारखाना सांभाळत होते.. अभिषेक बलकवडे हा स्वतः केमिकल इंजिनियर असून एम डी ड्रग्स कसे बनवायचे याचे ज्ञान त्याला होते.. 

  • सर्व आदिवासी आमदार राजीनामे देणार- नरहरी झिरवळ

     

    Narhari Zirwal : धनगर समाजाला आदिवासीत आरक्षण देण्याविरोधात आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत. थेट आमदारकीचाच राजीनामा देण्याचा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिलाय. सर्व आदिवासी आमदार आपापल्या पक्षप्रमुखांकडे राजीनामे देणार असल्याची माहिती झिरवळांनी दिलीय. थेट आमच्या सर्टिफिकेटवरच घाला घालायला निघाल्यामुळे सर्व आदिवासी आमदार एकत्र राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एक मेंढरू सत्तेत गेलं म्हणून धनगर आरक्षण मागत असल्याचा टोला त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावलाय. 

  • Sunil Tatkare Live | Marathi News LIVE Today : 'राऊतांनीच सांगितलं भाजपसोबत जायला ठाकरेंना विचार', 'भाजपसोबत जायचा ठाकरेंचा विचार होता?', 'पंतप्रधान भेटीवेळी ठाकरेंचा भाजपसोबत जायचा विचार', अजित गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मोठा गौप्यस्फोट..

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • समता परिषद बैठकीत मनोज जरांगेंवर निशाणा?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : समता परिषदेच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळांच्या निशाण्यावर मनोज जरांगे पाटील. १०० एकरात शेती साफ करुन मैदान करताय, 7 कोटी रुपये जमा देखील केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून ? असा सवाल छगन भुजबळांनी केलाय. या सभेतून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणार आहेत. हे कदापी मान्य नाही. आपला मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध आहे. आपणही मोठे कार्यक्रम करायला हवेत,  आपण 54 टक्के आहोत म्हणजेच 7 कोटी आपण आहोत. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले म्हणजे ओबीसी श्रीमंत झाला असं नाही अजुनही झोपडपट्टीत ओबीसी समाज राहत आहेअसं विधान छगन भुजबळांनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • दांडियाच्या ठिकाणी रुग्णवाहिका बंधनकारक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dandia Ground : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत.दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार आहे. दांडिया खेळताना लोकं देहभान हरपून नाचतात मात्र अशाचवेळी हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना अनेकदा घडल्यात. अशी घटना घडल्यास दांडियाप्रेमींना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी आता आयोजकांनी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • केटी सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे मागितले पैसे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai University : मुंबई विद्यापीठात राहिलेली केटी सोडवून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.. तशी लेखी तक्रार सुद्धा या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केलीय. पैसे मागणा-या कर्मचाऱ्यावर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनातचा इशारा ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून करण्यात आलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

     

    Raj Thackeray Meets CM Shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत. सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होतेय. टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झालेत. आणि त्याच विषयावर आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. रस्त्यांच्या स्थितीबाबत एकनाथ शिंदेंनीही याचिका केली होती ती मागे का घेतली असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत काय तोडगा निघतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

  • शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर

     

    MLA  Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू झालीय... याबाबतच्या सर्व ३४ याचिका एकत्रित करून सुनावणी घ्या, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे वकील अॅड. कामत यांनी केलीय... ठाकरे गटानं यासंदर्भात ५ मुद्दे अध्यक्षांसमोर मांडले. उलटतपासणी आणि वेळकाढूपणा न करता अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटानं केलं. तर एकत्रित सुनावणी घ्यायला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केलाय... दरम्यान, प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल, असं मत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी व्यक्त केलंय...

  • पंतप्रधान मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर

     

    PM Modi on his visit to Mumbai on Saturday : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर. आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या अधिवेशनाला पंतप्रधान उपस्थित राहणार. ऑलम्पिक समितीचे अधिवेशन मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 14 ते 17 ऑक्टोबरला पार पडणार. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ व्या अधिवेशनाचे स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार. 40 वर्षानंतर दुसऱ्यांदा भारताला यजमानपद भूषवण्याची संधी मिळत आहे 

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'सरकार कुठल्या आधारावर आरक्षण देणार माहीत नाही','जयंतराव पाटील राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष''आमच्या चिन्हावर निवडून आले, भाजपसोबत गेले','भुजबळ राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले', 'राष्ट्रवादीमध्ये फूट नाही', 'भाजपचं सरकार नको ही जनतेमध्ये भावना आहे', 'बावनकुळेंना मागच्या निवडणुकीत तिकीट मिळालं नाही', 'तिकीट मिळत नाही त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणार?' शरद पवार यांचं विधान.

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'भाजपसोबत जाण्याचा काहींचा आग्रह होता','सुळेंना अध्यक्ष करावं हा भुजबळांचा आग्रह होता','भुजबळांनी कबूल केलं की ते खोटं बोलले','सुप्रियांचं ते स्वप्न, मात्र ती घडणारी गोष्ट नाही','भाजप फोडाफोडी करून सत्तेत येते','महाराष्ट्रात फोडाफोडी करून सरकार पाडलं','बहुतांश राज्यात भाजप सत्तेवर नाही',
    '70 टक्के  राज्यांमध्ये भाजप सत्तेवर नाही','अजित पवार मुख्यमंत्री होणार ते फक्त स्वप्न', शरद पवार यांचं वक्तव्य.

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'प्रकाश आंबेडकरांबद्दल ठाकरेंची चर्चा झाली', 'भाजपविरोधात जेवढे एकत्र येतील, त्यांना घ्यावं', 'इंडियाचं राज्य यावं यासाठी आमचे प्रयत्न', 'शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचं सरकार यावं', 'भुजबळांनीही सांगितलं भाजपबरोबर जायचं नव्हतं', शरद पवार यांची माहिती.

  • राज्यात 5 हजार कोटींचा साखर घोटाळा- राजू शेट्टी

     

    Raju Shetti : राज्यात पाच हजार कोटींचा साखर घोटाळा झाल्याचा दावा राजू शेट्टींनी केलाय...राज्यातील साखर कारखाने अतिरिक्त साखर जीएसटी न भरताच विकत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय...कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्याचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांनी हा आरोप केलाय...कारखानदार साखरेची रिकव्हरी कमी दाखवतात, त्यामुळे निर्माण झालेली अतिरिक्त साखर जीएसटी न भरताच स्थानिक बाजारपेठात विकली जाते असा आरोप त्यांनी एका पत्रकातून केलाय...सहा महिन्यांपूर्वी स्टिंग ऑपरेशनमध्ये जीएसटी न भरलेली 10 टन साखर पकडल्याचाही दावा त्यांनी केलाय...याबाबत राज्याचे साखर आयुक्त, मुख्यमंत्री आणि जीएसटी कमिश्नर यांच्याकडे तक्रार शेट्टींनी केलीय..

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'देशात खासगीकरण वाढू लागलंय','सरकारनं शासकीय शाळा दत्तक देण्यास सुरुवात केली','नाशिकमध्ये एका शाळेत गौतमीचा कार्यक्रम', कंत्राटी भरतीवरून शरद पवार यांचा सरकारवर निशाणा.

  • शिवाजी पार्कवर ठाकरेंचा दसरा मेळावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thackeray Group Dasara Melava : शिवाजी पार्कवर यंदाही दस-याच्या मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणारेय. ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आलीय. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिलीय. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाला निघालाय. 24 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणारेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कोल्हापुरात अन्न आणि औषध विभागाची मोठी कारवाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur FDA Raid : कोल्हापूरात अन्न व औषध विभागाने मोठी कारवाई केलीय. स्टेशन रोड इथल्या कोरगावकर कंपाउंड परिसरातील जवाहर प्रोडक्टसवर छापा टाकून खाद्यपदार्थ जप्त केलेत. पदार्थांच्या पाकिटावर तारीख न टाकता विक्री सुरू होती. फरसाण, केळीचे चिप्स, फिंगर चिप्स जप्त करून अशुद्ध तेलाचा मोठा साठाही जप्त केलाय. सुमारे 30 हजारांचा पदार्थ आणि मुद्देमाल केला जप्त केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कंत्राटी भरतीवरुन सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Supriya Sule : कंत्राटी भरतीवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सवाल विचारलाय...सगळ्याच नोक-या कंत्राटी झाल्या तर आरक्षणाचं काय?...कंत्राटी भरतीतून भ्रष्टाचार केला जातोय असा गंभीर आरोप सुळेंनी केलाय...तसंच वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सरकारला दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आता कॉपी करणाऱ्यांची खैर नाही

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Exam : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतलाय...सामूहिक कॉपीसह परीक्षेत गैरप्रकारांना चाप बसविण्यासाठी विद्यार्थ्यांची सरमिसळ पद्धतीने बैठक व्यवस्था केली जाणाराय...राज्यात एकाच वेळी इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात...यात मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार घडतात...त्यामुळे तालुका आणि मोठ्या शहरांत परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या सरमिसळ पद्धतीने बैठक व्यवस्था करून कॉपी टाळण्याचा प्रयत्न आहे...यावेळी दोन किंवा जास्त केंद्र असलेल्या ठिकाणीच ही पद्धत असणार आहे...यामुळे परीक्षेत कॉपी रोखणं शक्य होणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नवाब मलिकांना आणखी 3 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nawab Malik : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. मलिकांना कोर्टानं आणखी तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. वैद्यकीय कारणास्तव जामीन वाढवून द्यावा अशी विनंती मलिकांनी कोर्टाकडे केली होती.. कोर्टांन त्यांची विनंती मान्य केलीये...मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मलिकांना 2 महिन्यांचा जामीन मंजूर झाला होता... त्याला आता दोन आठवडे बाकी होते... मात्र त्याआधीच मलिकांनी जामीन मंजूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलीस भरती

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Police Contract Recruitment : मुंबईत आता 3 हजार कंत्राटी पोलीस भरती केली जाणार आहे...गृहखात्याने हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय...आगामी नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या मदतीला आता तीन हजार कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने गृहखात्याने हा निर्णय घेतलाय. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांतून कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यासाठी किंवा भरती प्रक्रियेपर्यंत ही पोलीस भरती केली जाणार आहे.  विशेष म्हणजे या पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटींचा निधी राखीव करण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raj Thackeray Meet CM Eknath Shinde : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणारेत. टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झालेत. आणि त्याच विषयावर आज ते मुख्यमंत्र्यांना भेटणारेत. दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथं ही भेट होईल. रस्ते चांगले नसतानाही टोल वसुली सुरू आहे तर पैसा जातो कुठे असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय. रस्त्यांच्या स्थितीबाबत एकनाथ शिंदेंनीही याचिका केली होती ती मागे का घेतली असा सवाल त्यांनी केला. तसंच खराब रस्ते, टोल वसुली हे एक रॅकेट आहे असा गंभीर आरोप त्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत काय तोडगा निघतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • इस्रायलमधील भारतीयांच्या सुटकेसाठी 'ऑपरेशन अजय'

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    India Operation Ajay : इस्रायल आणि हमासमधील युद्ध सहाव्या दिवशीही सुरुय. या युद्धजन्य परिस्थितीत नोकरी, शिक्षण आणि इतर कारणांनी इस्रायलमध्ये असलेले भारतीय नागरिक अडकलेत. त्यांच्या सुटकेसाठी भारतानं 'ऑपरेशन अजय' सुरू केलंय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. इस्रायलमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय आहेत. त्यांच्या सुटकेसाठी विशेष चार्टर विमाने आणि इतर व्यवस्था करण्यात येतेय. परदेशात राहणा-या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकारची स्थापना

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Israel Emergency Government : दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकारची स्थापना करण्यात आलीय...इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि नॅशनल युनिटी पक्षाचे नेते बेनी गँट्झ यांच्यात करार झालाय...या आपत्कालीन सरकारमध्ये नेतन्याहू, गँट्झ आणि संरक्षणमंत्री गॅलंट अशा तिघांचं मंत्रिमंडळ असणार आहे...या आपत्कालीन सरकारला विरोधकांनीही पाठिंबा दिलाय...सरकार स्थापन झाल्यानंतर नेतन्याहू कॅबिनेटने जगाच्या नकाशावरून हमासचं नाव मिटवण्याची शपथ घेतलीय...या युद्धात आतापर्यंत जवळपास 3 हजार जणांचा मृत्यू झालाय...ओलीस असलेल्यांच्या सुटकेसाठी इस्रायली फोर्सने अमेरिकेची मदत घेतलीय...तसंच अमेरिकेनं मदतीसाठी कमांडोही पाठवलेय...हे कमांडो गाझामध्ये ओलीत ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी स्पेशल ऑपरेशनसाठी काम करणार आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकारची स्थापना

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Israel Emergency Government : दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकारची स्थापना करण्यात आलीय...इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि नॅशनल युनिटी पक्षाचे नेते बेनी गँट्झ यांच्यात करार झालाय...या आपत्कालीन सरकारमध्ये नेतन्याहू, गँट्झ आणि संरक्षणमंत्री गॅलंट अशा तिघांचं मंत्रिमंडळ असणार आहे...या आपत्कालीन सरकारला विरोधकांनीही पाठिंबा दिलाय...सरकार स्थापन झाल्यानंतर नेतन्याहू कॅबिनेटने जगाच्या नकाशावरून हमासचं नाव मिटवण्याची शपथ घेतलीय...या युद्धात आतापर्यंत जवळपास 3 हजार जणांचा मृत्यू झालाय...ओलीस असलेल्यांच्या सुटकेसाठी इस्रायली फोर्सने अमेरिकेची मदत घेतलीय...तसंच अमेरिकेनं मदतीसाठी कमांडोही पाठवलेय...हे कमांडो गाझामध्ये ओलीत ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी स्पेशल ऑपरेशनसाठी काम करणार आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बिहारमध्ये रेल्वे दुर्घटना, 4 जणांचा मृत्यू, 100 जखमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bihar Train Accident : बिहारच्या बक्सरमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडलीय...नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे 23 डबे रूळावरून घसरलेयत... या रेल्वे दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय...तर 100 प्रवासी जखमी झालेयत...जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत...घसरलेले डबे रेल्वे ट्रॅकवरून हटवण्याचं काम सुरू असून, ही घटना कशी घडली...? याचा तपास केला जातोय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MLA Disqalification : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आजच विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी होणार आहे... राहुल नार्वेकरांकडून वेळापत्रकात बदल करण्यात आलाय...ही सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार होती...मात्र, एकदिवस आधीच ही सुनावणी घेतली जाणार आहे...सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या अशी मागणी ठाकरे गटाने केलीय...यावर आज दुपारी दोन वाजता विधान भवनात सुनावणी होणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सत्तासंघर्षातील कळीच्या मुद्द्यावर घटनापीठात सुनावणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thackeray Vs Shinde : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार झालंय...आज सात न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या बेंचकडे जावं अशी विनंती केली होती...एका अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसने विधानसभा अध्यक्षांचे अपात्रतेबाबतचे अधिकार बाध्य होतात की नाहीत याचा फैसला होणार आहे... ही सुनावणी दीर्घकाळ चालण्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे गटाला फायदा होणार नसला तरी संभाव्य निकाल भविष्यातील राजकारणासाठी उपयुक्त ठरेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय...शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडलं त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असेल...मात्र, यामुळे आमदार अपात्र, शिवसेना पक्ष, चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर जाणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link