ShivSena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्यापासून अंतिम सुनावणी
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
आमदार अपात्रतेप्रकरणी सलग 3 दिवस चालणार सुनावणी
ShivSena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्यापासून अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. उद्यापासून सलग 3 दिवस सुनावणी चालेल. उद्या सकाळी साडे आठ वाजता ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत बाजू मांडतील. अंतिम सुनावणीत युक्तिवाद करण्यासाठी ठाकरे गटाला दीड दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवार, बुधवारचा दीड दिवस शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी बाजू मांडणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सरकार जरांगेंपुढे झुकतं कशाला, भुजबळांचा सरकारला घरचा आहेर
Bhujbal on Jarange : भिवंडीच्या ओबीसी मेळाव्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत तिखट शब्दात जरांगेंवर टीका केलीय. आमची लायकी काढणारा जरांगे म्हणजे माकड असून बेवडा पिऊन पिऊन किडलेल्या किडन्या सांभाळ अशी जहरी टीका भुजबळांनी केलीय. तसंच जरांगेंची दादागिरी अजिबात सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे जरांगे-भुजबळ संघर्ष आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. सरकार जरांगेंपुढे झुकतं कशाला, भुजबळांचा सरकारला घरचा आहेर.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
स्फोटात 9 जणांचा मृत्यू, फडणवीसांकडून घटनास्थळी पाहणी
Nagpur Solar Blast : नागपूरच्या बाजारगावातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय...या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय...मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश. तर आणखी आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आलीय...सकाळी 9 च्या सुमारास कंपनीत स्फोट झालाय...मात्र, या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे...ही कंपनी स्फोटकं बनवण्याचं काम करते...दरम्यान नागपुरातील स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीये.. देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या स्फोटामागच्या कारणांचा शोध घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
'म्हातारा झालेलो नाही, लय भारी लोकांना सरळ करण्याची ताकद', शरद पवारांचा विरोधकांवर निशाणा
Sharad Pawar : मी म्हातारा झालेलो नसून लय भारी लोकांना सरळ करण्याची ताकत माझ्यामध्ये असल्याचं म्हणत शरद पवारांनी विरोधकांवर निशाणा साधलाय...खेड येथे आयोजित बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते...यावेळी आयोजकांनी भाषणामध्ये शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर...शरद पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये आयोजकांना आपण म्हातारे झालेलो नसल्याचं म्हणतं विरोधकांना सुनावलंय...शरद पवारांच्या वाढदिवासनिमित्त खेडमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
ठाण्यातील प्रिया सिंह हल्लाप्रकरणी SIT स्थापन
Priya Singh Attack Case : ठाण्यातील प्रिया सिंह हल्ल्याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आलीय...घटनेची पूर्ण चौकशी एसआयटी मार्फत होणार आहे...एसआयटीमध्ये पोलीस उपायुक्तांचा समावेश करण्यात आलाय...कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्यानं फॉरेन्सिक रिपोर्टही तयार केला जाणार आहे...हा हल्ला प्रेमप्रकरणातून झालाय...ठाण्यातील MSRDC अधिका-याचा मुलगा अश्वजीत गायकवाडचे प्रियाशी प्रेमसंबंध होते...मात्र, अश्वजीत विवाहित असल्याची माहिती प्रियाला मिळाली. यावरून घोडबंदर भागात त्यांच्यात टोकाचा वाद झाला. त्यानंतर अश्वजीत आणि त्याचे दोन मित्र रोमिल पाटील आणि सागर शेळके यांनी प्रियाला मारहाण केली...यात प्रिया सिंह गंभीर जखमी झालीय...तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : '24 डिसेंबरची वेळ अंतिम','वेळेत कोणताही बदल होणार नाही','24 डिसेंबरला आरक्षण मिळणार',''नोंदी सापडलेल्यांना तत्काळ प्रमाणपत्र द्या','नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांनाही आरक्षण द्या','रक्ताच्या नातेवाईकांनाही दाखले द्या','शिंदे समिती 24 डिसेंबरला अहवाल सादर करणार','24 डिसेंबरनंतरही शिंदे समितीनं काम सुरू ठेवावं', मनोज जरांगेंची मागणी.
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'धनगर, वंजारींच्या आरक्षणाचा धक्का लागत नाही','आपण ओबीसी असल्याचं आपल्यालाच माहिती नव्हतं','ST, SCच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही','मतांसाठी खोटं बोललं जातंय','त्यांच्या मतांसाठी आमच्या पोरांचे मुडदे पाडणार का?','आमच्या गोरगरीब पोरांचं वाटोळं करू नका','मतांसाठी 2 समाजात तेढ पसरवण्याचं काम','आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी','आम्हाला पापाचं खायचं नाही','कायदा पारीत करण्यासाठी 24 डिसेंबरची वेळ','आरक्षणाच्या चर्चेत कायदातज्ज्ञ सहभागी','नोंदीचा आधार घेऊन सरकारनं वेळ घेतला', मनोज जरांगे यांचं वक्तव्य.
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'युक्ती आणि बुद्धीनं लढा जिंकायचा','मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं','मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे','विरोधाला विरोध करून न्याय मिळणार नाही','मराठ्यांकडे 54 लाख कुणबी असल्याच्या नोंदी','54 लाख नोंदी सापडल्या मग ओबीसीत का येऊ नका म्हणता?''1967 सालीच ओबीसींना आरक्षण मिळालंय','नोंदी असूनही मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही','ओबीसी आरक्षणात सर्वात आधी मराठ्यांचा हक्क', मनोज जरांगे यांचं वक्तव्य.
19 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
India Aghadi Meeting : इंडिया आघाडीच्या 19 डिसेंबरच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत...दिल्लीतील हॉटेल अशोका येथे इंडिया आघाडीची बैठक होणारे...उद्धव ठाकरे 18 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता नागपूरहून दिल्लीला रवाना होणारेत..आणि 19 डिसेंबरला दुपारी 3 वाजता इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर राहणार आहेत....
'मोर्चात धारावीबाहेरुन माणसं मागवली होती', मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
Eknath Shinde : ठाकरेंच्या या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केलाय. मोर्चात धारावीबाहेरुन माणसं मागवली होती..विकासविरोधी लोकांनी मोर्चा काढला होता असा टोला शिंदेंनी लगावलाय.. तर माणसं चंद्रावर येऊद्या नाहीतर चंद्रावरून, मुख्यमंत्र्यांना कळतं का?'...
मुख्यमंत्री कुणाची दलाली करतायत? असा सवाल राऊतांनी विचारलाय...नागपुरात सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Nagpur Blast : नागपूरच्या बाजारगावातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालाय...या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय...तर आणखी आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आलीय...सकाळी 9 च्या सुमारास कंपनीत स्फोट झालाय...मात्र, या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे...कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'जरांगेंच्या नादी कोण लागणार', छगन भुजबळांची प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal on Manoj Jarange : जरांगेंच्या नादी कोण लागणार अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलीय...आम्ही ओबीसींच्या आरक्षणावर कुणाला आक्रमण करू देणार नाही...त्यासाठी आमचा लढा आहे...ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे यासाठी जरांगेंचे लाड सुरू असल्याची टीका भुजबळांनी केलीय...
'24 डिसेंबरनंतर 1 तासही वाढवणार नाही', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'मराठा आरक्षणासाठी आता शेवटचा लढा','24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या','24 डिसेंबरनंतर 1 तासही वाढवणार नाही', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. 'लढूनच मराठा आरक्षण मिळवणार','54 लाख कुणबी नोंदी सापडल्या','सरकारनं चांगलं काम केलं तर चांगलंच म्हणार', मनोज जरांगेंचं वक्तव्य.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक
Mumbai Railway Megablock : मध्य रेल्वेच्या पनवेल आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना आज दिलासा मिळणारे...या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलंय...तर, ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणारे...छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि कल्याण या मार्गावर जलद आणि नीम जलद लोकल डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत...कल्याण ते ठाणे अप जलद आणि नीम जलद गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
संसद घुसखोरीच्या घटनेची पंतप्रधान मोदींकडून दखल
PM Narendra Modi : संसद घुसखोरीच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल. संसदेत झालेली घुसखोरीची घटना चिंताजनक. घुसखोरी प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. एका वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत ही प्रतिक्रिया दिली.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Central Railway Traffic Disrupted : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये. ओव्हरहेड वायर तुटल्यानं कर्जत-खोपोली स्थानकादरम्यान वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
कमलनाथ यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
Kamalnath : विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झालेत... निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय... काँग्रेसनं जितू पटवारी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केलीये.. तर, उमंद सिंगार यांना विरोधी पक्षनेते केलंय..
भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला
COVID-19 Update : जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसंबंधी इशारा दिलाय. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN1पासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा WHOनं दिलाय..धक्कादायक म्हणजे केरळच्या त्रिवेंद्रममध्ये JN1 हा नवा व्हेरिएंट सापडलाय.. त्यामुळे सर्व राज्यांना अलर्ट देण्यात आलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
जालन्यात आज मराठा समाजाची बैठक
Jalna Maratha Reservation : जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आज सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक होतेय...मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात ही बैठक होणारे...राज्यातील साखळी आणि बेमुदत उपोषण कर्ते तसंच मराठा आंदोलक आणि इतरही या बैठकीला उपस्थित राहणारेत..अंतरवाली सराटीमध्ये ज्या ठिकाणी सभा झाली होती त्याच ठीकाणी आज ही बैठक होतेय...सकाळी 9 वाजता बैठकीला सुरुवात होईल...24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर काय याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे...आंदोलनाची पुढील दिशा काय असेल ते सुद्धा या बैठकीत ठरणारे...दरम्यान काल राज्य सरकारचं शिष्टमंडळ गिरीष महाजन आणि संदिपान भुमरे यांनी जरांगेंशी चर्चा केली...मात्र जरांगे हे डेडलाईनवर ठाम आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा-