Amit Shah on Uddhav Thackeray : अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sun, 19 Feb 2023-10:36 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • सत्तेसाठी पवारांच्या मांडीवर जाऊन बसले - अमित शाह

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amit Shah on Uddhav Thackeray : सत्तेसाठी पवारांच्या कुशीत जाऊन बसले, आता या गद्दारांना धडा शिकवूया असं म्हणत केंद्रीयमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर(Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधलाय. भाजपला सत्तेचा मोह नाही, जास्त आमदार असतानाही एकनाथ शिंदेंना(Eknath Shinde) मुख्यमंत्री केलं हेही अमित शाहांनी सांगितलं. कोल्हापुरात भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात अमित शहांनी संपूर्ण विजयाचा निर्धार केला. 

    बातमी पाहा - https://bit.ly/3xyhgT5

  • दूध का दूध, पानी का पानी झालेलं नाही, सुप्रीम कोर्टाचा फैसला बाकी- उद्धव ठाकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray targets Shinde-BJP : उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाहांचा 'मोगॅम्बो' असा उल्लेख त्यांनी केला. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, म्हणतात. 'आता कोण कुणाचं काय चाटतोय?' असा उलटसवालही उद्धव ठाकरेंनी केला आहे. अजून दूध का दूध, पानी का पानी झालेलं नाही... सुप्रीम कोर्टाचा फैसला बाकी आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
    धनुष्यबाण चोरलं, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल, आम्ही आमची मशाल घेऊन सामना करू- उद्धव ठाकरे  

    बातमी पाहा - https://bit.ly/3Iyk890

  • उद्या सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे गट याचिका करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Meeting of legal experts on Matoshree : उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) मातोश्री(Matoshree) निवासस्थानी कायदेतज्ज्ञांची बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्व कायदेशीर पर्यायांची चर्चा करत आहेत. उद्या सुप्रीम कोर्टात धनुष्यबाणासाठी ठाकरे गट याचिका करणार आहे. त्याआधी ही बैठक सुरू आहे. या बैठकीला विनायक राऊत, अनिल देसाई, रवींद्र वायकर, अरविंद सावंत आदी नेते उपस्थित आहेत. 

    बातमी पाहा - https://bit.ly/3YJgA9C

     

     

  • संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sandeep Deshpande on Sanjay Raut : संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत किळसवाणी भाषा वापरली. मी समोर असतो तर त्यांच्या कानाखाली लावली असती अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलीय. 

     

  • पुण्यात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी 

     

    Pune Uddhav Thackeray Poster : पुण्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)समर्थनार्थ पोस्टरबाजी (Poster)करण्यात आलीय. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतरही शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं या पोस्टरमधून सांगण्यात आलंय. सगळं चोरलं, मात्र ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार?' असा सवालही या पोस्टर्समधून करण्यात आलाय. पुण्याच्या धनकवडी भागात जागोजागी हे पोस्टर्स लागलेत.

  • Amit Shah Live | Marathi News LIVE Today : 'शेतकऱ्यांसाठी शिवरायांचं कल्याणकारी राज्य', 'शेतकऱ्यांसाठी शिवरायांनी योजना आणल्या','देशात ग्रामआधारित अर्थनीतीचा पाया', 'उपभोगशून्य स्वामी म्हणजे महाराज','राज्याचं धन स्वत:साटी वापरलं नाही', केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य. 

  • Amit Shah Live | Marathi News LIVE Today : 'छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम','बाबासाहेब पुरंदरे यांनाही प्रणाम','बाबासाहेबांनी शिवरायांचं चरित्र मांडलं','बाबासाहेबांचं जीवन शिवरायांसाठी समर्पित' 'शिवसृष्टी हे ईश्वरीय कार्य','कार्य पुढे नेणारे आम्ही कोण?','शिवरायांचं जीवन आजही प्रेरणादायी', 'शिवचरित्र मांडताना देशभर पुरंदरे फिरले','जभरातून त्यांनी चरित्राचे पुरावे जमवले','पुरंदरे गोवा, दादरा नगर हवेली संग्रामातही', केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य.  

     

  • Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'दिसेल ते विकायचं हे सध्या सुरू आहे', 'सरकारच्या गोष्टी विकायचं केवळ सुरू', 'भारत सुंदर आहे, अजून, सुंदर करता येईल', 'देश सुंदर करण्याची इच्छा शक्ती दिसत नाही', 'पाश्चात्यकरण म्हणजे विकास नाही', 'पाश्चात्यकरण ही संस्कृती झाली', 'दुबईत जमीन केवळ अरबांना मिळते', 'मराठीत जास्तीत जास्त बोला',';समोरचा हिंदीत बोलला तरी मराठीत बोला', राज ठाकरे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला.

  • Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'औरंगजेब 27 वर्षे महाराष्ट्रात राहिला','लढणाऱ्यांच्या प्रेरणेला तो शिवाजी म्हणत होता','125 वर्षे आपण हिंदप्रांतावर राज्य केलं', 'शिवाजी अजून मला छळतोय हे औरंगजेबाचं वाक्य', 'आपण त्यांचे वारसदार आहोत हे विसरू नका', 'कोणासमोर मिंधे होऊ नका','पाकिस्तानातील अटोक किल्ल्यावर झेंडे', 'जातीपातीच्या भानगडीत पडू नका','मित्र करताना कधीही जात पाहू नका','जातीचं राजकारण करणाऱ्याचं कल्याण करू नका', 'जातीतून काहीही हाती लागणार नाही', राज ठाकरे यांचं वक्तव्य. 

     

  • Raj Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'माझ्या घरातून मराठी संस्का','आजोबा काका, वडिलांकडून मराठी संस्कार', 'सोशल मीडियावर व्यंगचित्र करायला आवडत नाही' ,'मार्मिकमध्ये मी व्यंगचित्र केली','त्यामुळे सध्या व्यंगचित्र मी करत नाही', 'सध्या व्यंगचित्र माझ्या भाषणातून दिसतं', 'छत्रपती शिवराय नीट समजून घ्या', 'शिववेडेपणाचा आव नको, बोध घ्या', 'इतिहासात लोकांनी काय केलंय ते समजून घ्या', राज ठाकरे यांचं वक्तव्य.  

  • Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'शिवसेना चिन्ह नावासाठी 2000 कोटींचा व्यवहार' 'बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील',  'हा प्राथमिक आकडा आहे, 100 टक्के सत्य आहे', खासदार संजय राऊत यांचा शिंदे गटावर गंभीर आरोप.  

    बातमी पाहा- शिवसेना चिन्ह आणि नावासाठी 2000 हजार कोटींचा व्यवहार? Sanjay Raut यांचा शिंदे गटावर आरोप 

  • Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'गडकिल्ले संवर्धनासाठी राखीव निधी', 'संभाजीराजेंच्या भावनांशी सहमत',  'शिवभक्तांना यापुढे अडवलं जाणार नाही', 'गडकिल्ल्यांसाठी अतिरिक्त निधी', 'शिवभक्तांची यापुढे अडवणूक होणार नाही', 'शिवाजी महाराजांचे सेवक म्हणून कार्यरत', 'संभाजीराजेंच्या सूचनांप्रमाणे नियोजन', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संभाजीराजेंना दिलं आश्वासन. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमी पाहा-  "शिवभक्तांना यापुढे अडवले जाणार नाही" संभाजीराजेंची फडणवीसांनी काढली समजूत
    .

     

     

  • Sambhaji Raje Live | Marathi News LIVE Today: शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींना अडवल्यानं संभाजीराजे नाराज. संभाजीराजे स्टेजवर जाण्यास नकार. 'आम्ही किती सहन करणार', 'दर्शन घेण्याचा सर्वांना अधिकार', 'शासकीय कार्यक्रमाला आमची ना नाही', 'मात्र कार्यक्रमात दुजाभाव नको', 'VIPसाठी सर्वसामान्यांना का अडवता?', शिवप्रेमींना अडवल्यानं संभाजीराजे आक्रमक. 'शिवभक्तांच्या भावनांशी आम्ही समहत', 'इतिहास जपण्याचं काम सरकार करेल', 'विश्वासात घेऊन नियोजन करू', 'दर्शनाबाबत आम्ही दखल घेतलीय', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीराजेंना दिलं आश्वसन. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमी पाहा- संभाजीराजे संतापले! भर सभेत स्टेजवर जाण्यास दिला नकार; मुख्यमंत्र्यांच्या समोर व्यक्त केली नाराजी

     

  • 440 व्होल्टचा करंट लागला पाहिजे- बावनकुळे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar : 26 तारखेला इतक्या जोरात ईव्हीएमचं बटण दाबा की 440 व्होल्टचा करंट लागला पाहिजे. अजित पवारांनी पुन्हा चिंचवडचं नाव घेतलं नाही पाहीजे असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.. एवढा करंट दिला तर मी मरून जाईन असं (Ajit Pawar) पवार म्हणाले. 

    बातमी पाहा- अरे बापरे मी मरुन जाईल! श्रद्धाजंली अर्पण करावी लागेल अजित पवारांची कोपरखळी

  • वेगानं गाडी चालवल्यास कोर्टात जावं लागणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Car Speed Limit : अतिवेगाने गाडी चालवत असाल तर सावधान. वेगाला मर्यादा घाला नाहीतर मग कोर्टाची पायरी चढावी लागेल. नियम मोडल्यामुळे दंडही भरावा लागेल तसंच कोर्टातही जावं लागेल. संपूर्ण मुंबईत वेगमर्यादा 70 किलोमीटर प्रती तास इतकी असेल. फक्त वांद्रे सी लिंक, वेस्टर्न आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ही वेगमर्यादा 80 किलोमीटर प्रती तास इतकी असेल. आणि तुम्हाला वाटत असेल की वेग मर्यादा मोडल्यास कोणी पाहिलं नाही तर हा समज चुकीचा आहे. कारण सीसीटीव्ही कॅमेरांचीही नजर नियम मोडणाऱ्यांवर असेल.

    बातमी पाहा-  तुम्ही कार, बाइक चालवता? मग 'हा' नियम वाचा, अन्यथा...!

  • आग्रा किल्ल्यात आज शिवजयंती साजरी होणार 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Agra Fort Shivaji Maharaj Jayanti :  ऐतिहासिक आग्रा किल्ल्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवजयंती साजरी होणार आहे. दिवाण-ए-आम सभागृहात शिवजयंती सोहळा रंगणार आहे.. तेव्हा आग्रा किल्ला (Agra Fort) जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी दुमदुमणार आहे. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना याच आग्रा किल्ल्यात कैद केलं होतं. मात्र शिवाजी महाराजांनी मोठ्या हुशारीने आग्रा किल्ल्यातून सूटका करुन घेतली होती. हाच सुटकेचा थरार आज नाट्यरुपात दाखवला जाणार आहे.. संध्याकाळी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) तसंच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उपस्थित राहणार आहेत.

    बातमी पाहा- आग्रा किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती, मुख्यमंत्री लावणार कार्यक्रमाला हजेरी

  • मध्य आणि हर्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Railway Mega Block : मुंबईत मध्य, हार्बर रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल, दुरुस्तीसाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर  (Western Railway) आज कोणताही ब्लॉक नसेल. मध्य रेल्वेच्या (Central Railway) विद्याविहार-ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.या कालावधीत एलटीटीवरून सुटणाऱ्या  पोहचणाऱ्या डाऊन आणि अप मेल एक्स्प्रेस ठाणे आणि विद्याविहारदरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर हार्बरवर (Harbour Railway) पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा सुरू असेल.

    बातमी पाहा- आज रेल्वेचा मेगाब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link