Terrorist attack on Army Vehicle : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला

Thu, 21 Dec 2023-10:52 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • लष्कराच्या गाडीवर दहशतवाद्यांचा गोळीबार, 4 जवान शहीद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Terrorist attack on Army Vehicle : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ट्रकवर आज गोळीबार केलाय.. या हल्ल्यामध्ये 4 जवान शहीद झालेत. तर 3 जवान जखमी आहेत. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आलेत. घटनास्थळी दहशतवादी आणि लष्कराची चकमक सुरू आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • ऑलिम्पिकपटू साक्षीचा नाराजीतून निवृत्तीचा निर्णय

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sakshi Malik Retire : ऑलिम्पिकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केलीय. त्यामुळे क्रिडाविश्वात खळबळ उडालीय. खरंतर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नव्या अध्यक्षनिवडीच्या निषेधार्थ साक्षी मलिकनं निवृत्ती जाहीर केलीय. निवृत्तीची घोषणा करताना भर पत्रकार परिषदेत साक्षीनं आपले बुट टेबलवर ठेवत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. नवे अध्यक्ष हे लैंगिक छळाचे आरोप करण्यात आलेल्या बृजभूषण सिंह यांचे व्यावसायिक भागीदार असल्याचा आरोप साक्षीनं केला. त्यामुळे आपल्याला निवृत्तीशिवाय पर्याय नसल्याचं सांगत ती रडत रडत पत्रकार परिषदेतून बाहेर पडली. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंनी वर्षभर आंदोलन केलं. त्यांना हटवल्यानंतर निवडणुका घेण्यात आल्या. आणि संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान आपल्याला साक्षीशी काही देणं घेणं नसल्याची प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी दिलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • मनोज जरांगे आणि सरकारची आजची चर्चा निष्फळ

     

    Govt. delegation visits Jarange : जरांगे आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळातील चर्चा निष्फळ.. रक्ताच्या नात्याच्या व्याखेवरून तिढा.. 24 डिसेंबरच्या मुदतीवर जरांगे ठाम... सरकारसमोर जरांगेंचं मन वळवण्याचं आव्हान कायम...
    मराठा आंदोलकांना नोटीस बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केलीये.  मोर्चाबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नसतानाही आधीच नोटीस कशा बजावल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मुंबईत लागू केलेल्या जमावबंदीवरुनही जरांगेंनी सरकारवर निशाणा साधलाय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • अजून थोडा वेळ देण्याची शिष्टमंडळाची मागणी, जरांगे 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Govt. delegation visits Jarange : मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची जरांगेंशी चर्चा...रक्ताच्या नात्याच्या व्याखेवरून तिढा वाढला...पत्नी आणि आईच्या नात्यातल्यांनाही प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी...महाजनांनी दर्शवली असमर्थता. मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या डेडलाईवर ठाम आहेत. 24 डिसेंबरपर्यंत सरकार आरक्षण देईल, असं जरांगेंनी म्हटलंय. आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत, आता सरकारनं शब्द पाळावा, असं जरांगेंनी सांगितलंय. जरांगेंनी 24 तारखेचा हट्ट धरू नये, ही विनंती करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • रक्तातील सग्या-सोयऱ्यांना आरक्षणाचं ठरलं होतं - जरांगे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Govt. delegation visits Jarange : सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला... गिरीश महाजन, सांदीपान भुमरे, उदय सामंत, चिवटे जरांगेंच्या भेटीला.. 24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून देण्याची सरकारच्या शिष्टमंडळची जरांगेंना विनंती. मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्या- जरांगेंची मागणी.. वडिलांशिवाय आत्या, मामाला आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी.. रक्तातील सग्या-सोयऱ्यांना आरक्षणाचं ठरलं होतं असा जरांगेंचा दावा.. तर पत्नी, आई, मामा रक्ताच्या नात्यात येत नाहीत असं गिरीश महाजन यांचं वक्तव्य... पत्नीच्या कुटुंबाला आरक्षण कसं देता येणार? असा सवालही महाजन यांनी केलाय. जे लिहिलं आहे, त्यावर ठाम असल्याची जरांगेंची भूमिका.

     

  • कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळं BMC अलर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    BMC Alert : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मुंबई महापालिका अलर्ट झालीय. महापालिकेनं कोरोना आढावा बैठक घेतलीय. आरोग्य व्यवस्थेला आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याच्या, ऑक्सिजन बेड्स, आयसीयू आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.  मुंबईत सद्यस्थितीला कोरोनाचे १७ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळलाय....

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात भाजप एकटीच लढेल - जितेंद्र आव्हाड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jitendra Awhad : राज्यात भाजप स्वबळावर लढणार असा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय.. आव्हाडांच्या या विधानाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय... नागपूरमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत हे धोरण ठरल्याचा दावा आव्हाडांनी केलाय.. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी असंही ठरवण्यात आल्याचं आव्हाडांनी म्हटलंय.. तर ज्यांच्या आरोप किंवा डाग आहेत त्यांना सोबत न घेण्याचंही ठरल्याचा दावा आव्हाडांनी केलाय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मात्र आव्हाडांचा हा दावा फेटाळून लावलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संसदेची सुरक्षा आता CISFच्या ताब्यात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sansad Security CISF : संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता CISF च्या ताब्यात देण्यात आलीय.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आता संसदेची सुरक्षा करेल... केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... त्यासोबतच संसदेची सुरक्षेसाठी सर्व्हे करणार असल्याचीही माहिती समोर येतेय.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल देशातल्या अनेक महत्त्वाच्या वास्तूंना संरक्षण पुरवतं.. मुंबईसह देशातली अनेक विमानतळं, भाभा अणू संशोधन केंद्र तसंच अणू उर्जा प्रकल्प, शिर्डीचं साई मंदिर, दिल्ली मेट्रो अशा महत्त्वाच्या ठिकाणी CISF सुरक्षा पुरवते...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उद्धव ठाकरेंना राम मंदिराचं निमंत्रण देणार नाहीत - राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : राम मंदिराच्या आंदोलनात योगदान असणा-यांना सरकार निमंत्रण देणार नाही. ज्यांचं काहीही योगदान नाही अशांचा अयोध्येत सोहळा रंगणार असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मराठा समाजाला चिथवू नका - मनोज जरांगे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange Patil : मराठा आंदोलकांना नोटिसा बजावणा-या पोलीस अधिका-यांना निलंबित करा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केलीये.  मोर्चाबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नसतानाही आधीच नोटीसा कशा बजावल्या असा सवाल त्यांनी उपस्थीत केलाय.. मुंबईत लागू केलेल्या जमावबंदीवरुनही त्यांनी सरकावर टीका केलीये....

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला लॉलीपॉप - विजय वडेट्टीवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar On Maratha Reservation : निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला सरकारनं लॉलीपॉप दिल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलीय. फेब्रुवारीत अधिवेशनाची घोषणा केली खरी मात्र तोपर्यंत आचारसंहिता लागेल आणि त्यामुळे आरक्षण प्रश्न मार्गी लागणार नसल्याची टीका वडेट्टीवारांनी केलीय

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सोशल मीडिया 'X'चं सर्व्हर क्रॅश

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    'X' Server Crash : सोशल मीडियावरचं एक्स म्हणजेच पुर्वीचं ट्विटर बंद पडलंय... एक्सचा सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे त्याची सेवा बंद झालीय... भारतात आठ शहरांमध्ये एक्सची सेवा ठप्प झालीय.. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैदराबादसारख्या शहरांमध्ये एक्सची सेवा विस्कळीत झाल्याचं समजतंय.. भारतासह अनेक देशांमध्ये युझर्सना एक्स वापरण्यासाठी समस्या येतायत..  एक्सची टाईमलाईन दिसत नसल्याची तक्रार अनेकांनी केलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मराठा आंदोलनात ट्रॅक्टर वापरण्यास विरोध

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nanded Tractor : मराठा आंदोलनादरम्यान ट्रॅक्टरचा वापर करण्यास नांदेड पोलिसांनी बंदी घातलीये.. नांदेडच्या कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना यासंदर्भात नोटीस बजावलीये.. ट्रॅक्टरचा वापर आंदोलनात, सभेत न करता केवळ शेतीच्या कामासाठी करा असं नोटीसमधून सांगण्यात आलंय.. ट्रॅक्टरचा वापर जर आंदोलनादरम्यान केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय.. 24 डिसेंबरला मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे... या मोर्चात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर होण्याची शक्यता आहे.. ट्रॅक्टरच्या वापरामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलिसांनी या नोटीसा बजावल्यात.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 'पोपट दे, घटस्फोट घे'

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Parrot : पुण्यात घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आलंय.. पुण्यातील एका पतीनं पत्नीला घटस्फोट देण्यासाठी एक  विचित्र अट घातलीये.. घटस्फोट हवा असेल तर गिफ्ट म्हणून दिलेला आफ्रिकन पोपट परत दे तरच घटस्फोट देईल असं या पतीनं कौटुंबिक न्यायालयात सांगीतलंय..  2019मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं.. मात्र त्यांच्यात मतभेद होत असल्यानं दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.. प्रकरण कौटुंबिक कोर्टात गेल्यांनतर घटस्फोट देण्यासाठी पतीनं ही विचित्र अट घातली.. सुरुवातीला पत्नी पोपट देण्यास तयार नव्हती... शेवटी तीनं पोपट परत करणयाचं मान्य केल्यानंतर घटस्फोटाचं प्रकरण मंजूर झालं..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अजित पवार गटाची उद्या महत्त्वाची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar Camp Meet : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट कामाला लागलाय. उद्या सकाळी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बैठका घेण्यात येणारेत. अजित पवार, सुनील तटकरेंच्या उपस्थितीत या बैठका होणारेत. या बैठकीला प्रदेश नेते, पदाधिकारी,  उपस्थित राहणारेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणारेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुणे गारठलं, पाषाणमध्ये सर्वात कमी 10° अंश तापमान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Cold : पुणे शहर गारठलंय.. पुण्यात यंदाच्या हिवाळ्यातील निचांकी किमान तापमानाची नोंद काल झाली.. शिवाजीनगरमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं.. तर सर्वांत कमी तापमान पाषाणमध्ये 10° अंश सेल्सिअस होतं.. हवेतला गारठा वाढल्यामुळे रात्री थंडीतही वाढ झालीय.. पुढच्या दोन दिवसात पुणे शहरासह जिल्ह्यातही गारठा वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.. किमान तापमानाचा पारा 11 अंश सेल्सियसपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.. उत्तर भारतातून येणा-या थंड वा-याच्या प्रभावामुळे पुणे शहरात गारठा वाढतोय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आयपीसी, सीआरपीसी कायद्यात मोठे बदल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    IPC & CRPC Law : भारतीय दंड विधान म्हणजेच आयपीसी आणि सीआरपीसी कायद्यात मोठे बदल करण्यात आले आहेत.. लोकसभेत यासंदर्भातली तीन विधेयकं आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आली.. नवीन कायद्यानुसार तक्रार मिळाल्यानंतर तीन दिवसांत गुन्हा दाखल करावा लागेल... तेव्हा आता तारीख पे तारीख असा प्रकार होणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी म्हटलंय...  खूनाचे कलम आता 302 नाही तर 101 होईल.. मॉब लिचिंगसाठी फाशीची तरतूद करण्यात आली आहे.. राजद्रोह कायद्याची जागा आता देशद्रोह कायदा घेणार आहे.. शिक्षेऐवजी आता न्याय देण्याला प्राधान्य असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी म्हटलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईत 18 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Jamavbandi : मुंबईमध्ये महिनाभर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केलेत. त्यानुसार कालपासून 18 जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असतील. जाहीर सभा घेण्यावरही या काळात बंदी घालण्यात आलीय. जमावबंदीच्या कालावधीत शहरात लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके फोडण्यावरही बंदी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Corona : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. गेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. केरळनंतर राज्यात सतर्कता बाळगण्यात येत असली तरी काल 14 रुग्णांचं निदान झालंय. मुंबईत 13 तर ठाण्यात एक रुग्ण आढळलाय. याचं प्रमुख कारण म्हणजे जेएन 1 हा नव्यानं आलेला व्हेरियंट असल्याचं बोललं जातंय. यासंबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यायत. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, समांतर अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर करावा असा सल्ला डॉक्टर देतायत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कोरोनाचा उपप्रकार JN.1चा राज्यात शिरकाव

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Corona : कोरोना व्हायरसचा नवीन उपप्रकार जेएन 1 चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलाय. हा रुग्ण 41 वर्षांचा पुरुष आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागानं केल्यायत. याचबरोबर कोरोना टेस्ट वाढविण्याचे निर्देशही देण्यात आलेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचाही आढावा घेण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मराठा आरक्षणासाठी बैठकांचे सत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे गोदापट्टयातील 123 गावातील मराठा समाजाची बैठक बोलावलीये..  सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे..  तसेच आज जरांगे पाटलांच्या मराठा संवाद दौ-याचा दुसरा दिवस असून बदनापूर येथे दुपारी 4 वाजता त्यांची जाहिर सभा होणार आहे... या सभेत जरांगे काय  बोलणार याकडे सा-यांच लक्ष लागंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link