Railway and OLA : रेल्वेचं तिकीट बूक केल्यानंतर ओलाचंही बुकिंग करता येणार
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
ट्रेनमधून उतरल्यानंतर थेट घरपोच सेवा, IRCTCचा ओला कॅबसोबत करार
Railway and OLA : रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर.. आता प्रवाशांना ट्रेनमधून उतरल्यानंतर थेट घरपोच सेवा मिळणारंय. त्यासाठी IRCTCने ओला कॅबसोबत करार केलाय. म्हणजेच तुम्हाला रेल्वेचं तिकीट बूक केल्यानंतर ओलाचंही बुकिंग करता येईल..मायक्रो, मिनी, प्राइम सेडान, प्राइम प्ले, ऑटो, शेअर या पद्धतीनं ओलाचं बुकिंग करता येईल. IRCTC अॅप आणि वेबसाइटवर लॉग इन करून आणि 'बुक अ कॅब' या पर्यायावर क्लिक करून प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आठवडाभर आधी बुकिंग केल्यानंतरच प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळू शकेल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सर्व्हेवर शरद पवार आणि अजित पवारांचं एकमत
Sharad Pawar on Survey : राज्याच्या राजकारणात पवार काका-पुतण्यात एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी एका संस्थेनं महाराष्ट्रात लोकसभेच्या जागांचा केलेल्या सर्व्हेवर मात्र एकमत आहे. पाच राज्यांच्या सर्व्हेत काय होतं आणि निकाल काय आले असं दोन्ही काका पुतण्यांनी सांगितलं. सर्व्हे हे संकेत असतात मात्र त्यावरून निष्कर्ष काढता येत नाही असं मत शरद पवारांनी नोंदवलं. तर सर्व्हेला काहीही आधार नसतो.. अजित पवार यांचं वक्तव्य.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
वंचित बहुजनच्या सभेत स्टेज तुटल्याने गोंधळ, दुर्घटनेत कोणी जखमी नाही
Vanchit Stage Collapse : नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेत स्टेज तुटल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. स्टेजच्या मागील लोखंडी फ्रेंम तुटल्यानं मोठा गोंधळ झाला. मात्र या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही, परिस्थिती नियंत्रणात.
पक्षप्रमुखांनी संधी दिली तर लोकसभा लढणार- अंबादास दानवे
Ambadas Danve : आपल्याला संभाजीनगरातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय. पक्षप्रमुखांनी संधी दिली तर दानवेंची लढण्याची तयारी आहे. ज्यांच्यात दम आहे तो जिंकणार.. असं अंबादास दानवे म्हणाले.
शिरुर लोकसभा लढण्यास विलास लांडे इच्छुक
Vilas Lande : अमोल कोल्हेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचे म्हणत तो मी जिंकून आणणारच असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला...त्यानंतर आता शिरूरमधून विलास लांडेंनी शिरुरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलंय...अजित पवारांनी संधी दिली तर खासदारकी लढणार अशी प्रतिक्रिया विलास लांडेंनी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
काम करत नव्हतो मग दादा का बोलले नाहीत?-अमोल कोल्हे
Amol Kolhe On Ajit Pawar : अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी उत्तर दिलंय...अजित पवारांना गोष्टी खटकत होत्या मग ते का बोलले नाहीत...? विधानसभेच्या प्रचारावेळी अजित पवारांनीच पाठ थोपटली होती...निवडणुकीत कुणाच्या बाजूनं उभं राहायचं हे सामान्य जनताच ठरवेल...अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिलीय...मात्र, या आरोप प्रत्यारोपांवरून खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटातच असल्याचं शिक्कामोर्तब झालंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार
Sharad Pawar On Ajit Pawar : आम्ही सत्तास्थापनेसाठी बंड केलं नव्हतं... तर सर्वांनी बसून निर्णय घेतला होता असं विधान करत शरद पवारांनी अजित पवारांवर पलटवार केलाय... मी 60व्या वर्षी भूमिका घेतली, तर काहींनी 38व्या वर्षी भूमिका घेतली असं वक्तव्य अजित पवारांनी काल बारामतीत केलं होतं.. त्यावरच शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अजित पवारांचे अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज
Ajit Pawar On Amol Kolhe : अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याची थेट घोषणाच केलीय... शिरुरमध्ये पर्याय देणार आणि तिथे असलेला उमेदवार निवडून आणणार... असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय.. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं.. मात्र त्यांनी मतदारसंघात दुर्लक्ष केल्याची टीकाही अजित पवारांनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
वर्ध्यात फार्म हाऊसवर दरोडा
Wardha Robbery : वर्ध्याच्या कारंजामध्ये दरोडेखोरांनी मध्यरात्री एका फार्म हाऊसवर दरोडा टाकलाय...दरोडेखोरांनी एका व्यक्तीवर चाकू हल्ला करून 55 पोती सोयाबीन आणि सोनं असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय. नारा शिवारातील वाघोड्यात ही घटना घडलीय. दरोडेखोरांच्या चाकू हल्ल्यात गोपाळ पालीवाल यांच्या पोटावर गंभीर जखम झालीय. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलंय. या दरोड्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पेटीएममध्ये मोठी नोकर कपात
PayTM Job Cutting : पेटीएमने पुन्हा एकदा नोकरकपातीचा निर्णय घेतलाय. पेटीएमने एकूण कर्मचा-यांपैकी 10 टक्के कर्मचा-यांना नारळ दिलाय.. Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने यावेळी एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय. 2023 हे वर्ष स्टार्टअप कंपन्यांसाठी चांगलं वर्ष ठरलेलं दिसत नाहीए... यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय स्टार्ट अप्सनी पहिल्या तीन महिन्यांमध्ये 28 हजारांहून अधिक कर्मचा-यांना कामावरुन काढून टाकलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मविआ लोकसभेच्या 40+ जागा जिंकेल-राऊत
Sanjay Raut & Vijay Wadettiwar : मविआ लोकसभेच्या 40+ जागा जिंकेल असा दावा संजय राऊतांनी केलाय...भाजप हा दोन कुबड्यांवर चालणारा हवेतला पक्ष, ते काहीही सांगतील...मात्र, मविआ 40 प्लस जागा जिंकेल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय...तर बेईमानी झाली नाही तर सर्वेप्रमाणे निकाल येईल...दुस-याचं घर फोडणं महायुतीला भोगावं लागेल असंवडेट्टीवारांनी म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मनोज जरांगेंचा 20 जानेवारीला 'चलो मुंबई'चा नारा
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं साखळी उपोषण स्थगित करा आणि मुंबईला जाण्याची तयारी करा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय...मराठा आरक्षणासाठी राज्यभरात साखळी उपोषण सुरू आहे...आता 20 जानेवारीला मराठा मुंबईकडे निघणार आहे...त्यामुळे जरांगेंनी आता चलो मुंबईचा नारा देत करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईकडे चला...ट्रक, ट्रॅक्टर, जे असेल ते घेऊन मुंबईकडे चला असं आवाहन जरांगेंनी केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
उपमुख्यमंत्री अजित पवारांची अमोल कोल्हे आणि रोहित पवारांवर टोलेबाजी
Ajit Pawar On Rohit Pawar & Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांवर हल्लाबोल केला... निवडणुका जवळ आल्यामुळे संघर्षयात्रा आणि पदयात्रा सुचतात असा निशाणा अजित पवारांनी लगावलाय. रोहित पवारांच्या संघर्षयात्रेवर अजित पवारांनी पहिल्यांदाच जाहिररित्या टीका केलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटलांची फटकेबाजी
Radhakrishna Vikhe Patil : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या होम पिचवर विखे पाटलांची तुफान फटकेबाजी केलीय...संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे...कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे...फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोपवा अशी फटकेबाजी विखेंनी केलीय...क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात विखे पाटील बोलत होते...यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या माजी तालुकाध्यक्षाला भाजप प्रवेशाची अप्रत्यक्ष ऑफरही दिली...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पुणे जिल्ह्यातील 16 शाळा बंद होणार
Pune School : पुणे जिल्ह्यातील 16 शाळा बंद होणार आहेत...शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये एकाही विद्यार्थ्यांचा प्रवेश न झाल्याने या शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय...बंद होणा-या शाळा दौंड, हवेली, मुळशी, शिरूर, वेल्हे या तालुक्यांसह औंध, बिबवेवाडी, हडपसर, पिंपरी, आकुर्डी येथील शून्य पटांच्या 16 शाळा आहेत...या शाळांची नावं यु-डायस पोर्टलवरून हटविण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्यायत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
वंचित लोकसभा स्वबळावर लढणार?
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणूक लढण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलंय...विरोधक निवडणुकीत एकत्र येतील अशी परिस्थिती वाटत नाही...मात्र, एकत्र येणार नसतील तर आपण 48 जागा ताकदीने लढवू असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय...वंचित बहुजन आघाडी मविआतून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे...मात्र, आंबेडकरांनी केलेल्या विधानामुळे स्वबळावर लढणार असल्याची चिन्ह दिसतायत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई
Kalwa 2 Doctor Suspend : कळव्यातील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. डॉ. दीपा बंजन आणि डॉ. महेश मोरे अशी निलंबित करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावं आहेत. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच
Corona Update : देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे.. गेल्या 24 तासांत 628 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय.. तर केरळमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात गेल्या 24 तासांत 50 नवे रुग्ण आढळले आहेत.. तर केरळमध्ये 128 आणि कर्नाटकमध्ये 73 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय.. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने काळजी घेण्याचं आवाहन केलंय.. नववर्षाचं स्वागत करताना तसंच गर्दीतही जाताना मास्क लावण्याचं आवाहन सरकारने केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
ठाण्यात कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटचे 5 रुग्ण
Thane Corona : ठाण्यामध्ये कोरोनाच्या जेएन वन व्हेरियंटचे पाच रुग्ण सापडलेत. त्यात एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. ठाण्यात सध्या कोरोनाचे 28 रुग्ण आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरुयत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मध्य रेल्वेने बसवली धुके सुरक्षा यंत्रणा
Central Railway : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी... आता हिवाळ्यात दाट धुकं असलं तरी रेल्वे गाड्यांना उशीर होणार नाही.. कारण मध्य रेल्वेने धुक्याची अडचण दूर करण्यासाठी धुके सुरक्षा यंत्रणा बसवलीय.. मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर तसंच सोलापूर विभागांसाठी मिळून एकूण 500 धुके सुरक्षा यंत्रांची खरेदी करण्यात आलीय.. या यंत्रणेमुळे धुक्यामुळे दृश्यमानता कमी असली तर रेल्वे चालकांना सिग्नलबाबत सर्व माहिती मिळणार आहे. धुके सुरक्षा यंत्रणा जीपीएस तंत्रज्ञानावर चालते. त्यामुळे रेल्वे चालकांना आगामी तीन सिग्नल्सबाबत ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे आगाऊ सूचना मिळते.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
जेवण दिले नाही म्हणून पतीकडून पत्नीची हत्या
Pune Crime : पुण्यात जेवण दिलं नाही म्हणून निर्दयी पतीने आपल्या पत्नीची हत्या केलीय.. दारुड्या पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तीला जीवे मारलं... कात्रजमधल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय.. तानाजी कांबळे या निर्दयी पतीला पोलिसांनी अटक केलीय. तानाजी हा व्यवसायाने पेंटर असून रोजंदारीवर काम करतो. नेहमीप्रमाण मद्यपान करुन आलेल्या तानाजीने आपली पत्नी माधुरीला जेवण वाढायला सांगितलं. मात्र जेवण न दिल्याच्या रागातून तानाजीने पत्नीच्या छातीवर जोरजोरात बुक्क्या मारल्या.. यात तीचा मृत्यू झाला..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
नवीन वर्षात राज्यावर पाणीटंचाईचे संकट
Maharashtra Water Shortage : नवीन वर्षात राज्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यताय. राज्यातील धरणांमध्ये केवळ 63% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणांच्या पाणीसाठ्यात 20 टक्क्क्यांनी घट झालीये. यात मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणी शिल्लक आहे. पाणीटंचाईमुळे 389 टँकरनं 961 वाड्यांना तर 366 गावांना पाणीपुरवठा केला जातोय. या आकडेवारीत दिवसागणिक भर पडतेय. वेगानं घटत असलेल्या पाणीसाठ्यामुळे नववर्षात राज्यातील नागरिकांसमोर पाणीकपातीचं संकट उभे ठाकलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Nagpur Balloon Gas Cylinder Blast : नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणा-या सिलेंडरचा स्फोट झालाय...या स्फोटात 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय...तर 2 महिला जखमी झाल्यायत...नागपुरातील बिशप ग्राऊंड लगतच्या रोडवर ही घटना घडलीय...फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने सिलेंडर हवेत उडाला...हा स्फोट भीषण असल्याने 4 वर्षांच्या सिझन शेखचा जागीच मृत्यू झाला...तर फारिया शेख, अनमता शेख या दोघी जखमी झाल्यायत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
प्रभू श्रीराम तुमची प्रॉपर्टी आहे का? - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. प्रभू श्रीराम तुमची प्रॉपर्टी आहे का? असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय. ते मीरा भाईंदरमधल्या गोवर्धन पूजा समारोह सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रात आमचं सरकार येणार आणि आणणारच, असा निर्धारही व्यक्त केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
गुगलमध्ये पुन्हा एकदा नोकरकपातीचं संकट
Google Job Cutting : गुगलच्या कर्मचा-यांवर पुन्हा एकदा नोकर कपातीची टांगती तलवार आहे... कंपनीने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच 12 हजार कर्मचा-यांना नारळ दिला होता.. आता गुगल जाहिरात विभागाची पुनर्रचना करणार आहे.. गुगलच्या जाहिरात विभागामध्ये 30 हजार कर्मचारी काम करतात. मात्र पुनर्रचना करताना कंपनी आपल्याला नारळ देऊ शकते अशी चर्चा कर्मचा-यांमध्ये आहे.. त्यामुळे नोकरी जाण्याची भीती गुगलच्या कर्मचा-यांना वाटतेय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -