Ratnagiri Uddhav Thackeray : रत्नागिरीत उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Sun, 28 Apr 2024-11:10 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • कोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही, सत्ताबदलानंतर मोदींच्या घरगड्यांना दाखवू - उद्धव ठाकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ratnagiri Uddhav Thackeray : रत्नागिरीमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. समोरच्याला टोप घातल्यावर डोकं खाजवायला मिळत नाही आणि आज आपण कोणत्या पक्षात आहोत हेच त्याला कळत नाही अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता नारायण राणेंचा समाचार घेतला. तसंच स्वतःच्या उंचीनुसार तरी प्रकल्प कोकणात आणलात का, असा सवाल विचारत त्यांनी राणेंना डिवचलं.
    उद्धव ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतलाय....कोरोनापेक्षाही भाजपची हुकूमशाही भयंकर असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय...आमचं सरकार आल्यावर ED, CBI, IT या मोदींच्या घरगड्यांना दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला. या सभेसाठी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेसुद्धा उपस्थित होते.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • शिंदेवाडीच्या 2 कुटुंबातील वादावादीत एक तरुण गंभीर जखमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Rada : पुण्यातील शिरूरमध्ये बैलगाडा घाटात जोरदार हाणामारी.. शिंदेवाडी येथील 2 कुटुंबातील वादावादीतून मारहाण.. मलठणच्या शिंदेवाडी यात्रेतील बैलगाडा शर्यतीतील घटना.. हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी. 

     

  • 2004मध्ये मुख्यमंत्री पद आलं होतं, नशिबात असतं तर मुख्यमंत्री झालो असतो- अजित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar's Regret : 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद आलं होतं. माझ्या नशिबात असतं तर मी मुख्यमंत्री झालो असतो, अशी खंत अजित पवारांनी बारामतीच्या शिर्सुफळ इथल्या सभेत व्यक्त केली. मुख्यमंत्री पद आलं होतं... मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला, असा आरोपही अजित पवारांनी केला.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • रमेश मोरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raigad Ramesh More : रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा फटका बसलाय. माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मोरे यांनी शेकापला सोडचिठ्ठी दिलीय. रमेश मोरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मोरेंनी शरद पवार यांच्या सभेचं नियोजन केलं होतं. मोरे यांच्या पत्नी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. लोकसभा निवडणुकीत शेकापसह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी साहिल खानला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Actor Sahil Khan Arrested : अभिनेता साहिल खान याला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांकडून अटक. मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन ही कारवाई केलीये. त्यांनंतर त्याला मुंबईत आणण्यात आलंय.. द लायन बुक नावाच्या एका अॅपमध्ये साहिल खान भागिदार असल्याची माहिती समोर येतीये.. आता साहिल खानच्या चौकशीतून महादेव बेटिंग अॅप प्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • '20 मेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा', छगन भुजबळांचा महायुतीच्या नेत्यांना टोला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी जागावाटप जाहीर करण्यावरुन महायुतीच्या नेत्यांना टोला लगावलाय.. 20 मेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा..असा टोला भुजबळांनी लगावलाय. आतातरी लवकर निर्णय होईल..अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केलीय.. 

     बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'मतदान करताना भावनिक होऊ नका', अजित पवारांचं मतदारांना आवाहन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    Ajit Pawar : मतदान करताना भावनिक होऊ नका, असं आवाहन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेला केलंय. बारामतीच्या शिर्सुफळमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी 40 वर्षापूर्वी आलेल्या सुनेला मतदान करणार की मुलीला ? असा सवाल केला. सुनेला मान असतो, भावनिक होऊ नका, असंही अजित पवार म्हणाले. 

  • ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी- सूत्र

     

    Naresh Mhaske : ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीये... ठाण्यातून नरेश म्हस्केंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. ठाणे लोकभा मतदारसंघातून प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक हे लढण्यास इच्छुक असताना नरेश म्हस्केंचं नाव समोर येत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.. लवकरच उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगीलतंय.. दरम्यान यावेळी काही नावांमध्ये बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.. 

  • गुजरात, राजस्थानात ड्रग्जचे कारखाने

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Drugs Factory Raid at Gujarat Rajsthan : गुजरात, राजस्थानात ड्रग्जच्या कारखान्यांवर छापेमारी करण्यात आली आहे..ड्रग्जच्या 3 कारखान्यांवर संयुक्त छापे टाकण्यात आले  आहेत...कारवाईत 300 कोटी रुपयांचं मेफेड्रोन ड्रग्ज जप्त...गुजरात ATS आणि NCBची कारवाई..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • अर्चना पाटील, ओमराजे निंबाळकरांना नोटीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Omraje Nimbalka : महाविकास आघाडी उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुती राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील या दोघांना निवडणुक आयोगाच्या पुन्हा नोटीसा...निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी बजावल्या नोटीसा..सभा रॅलीत झालेल्या व निवडणुक आयोगाकडे दाखल केलेल्या खर्चात ताफावत/ खर्च कमी दाखवला असल्याने कारणे दाखवा नोटीस...48 तासात उत्तर न दिल्यास खर्च शॅडो पथकाने दाखवलेला खर्च निवडणूक खर्चात दाखवला जाणार...ओमराजे निंबाळकर यांनी 19 लाख 60 हजार खर्च दाखवला तर शॅडो पथकाने 33 लाख 92 हजार खर्च झाल्याचा अहवाल...अर्चना पाटील यांनी 4 लाख 55 हजार खर्च दाखवला आहे तर शॅडो पथकाने हा खर्च 22 लाख 73 हजार असल्याचे म्हणटले आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'महाजन कुटुंबाला राजकारणातून हद्दपार केलं', संजय राऊतांची भाजपवर टीका

     

    Sanjay Raut : उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देत भाजपनं महाजन कुटुंबाला राजकारणातून हद्दपार केल्याची टीका संजय राऊतांनी केलीये.. उज्ज्वल निकम यांनी जळगावातून उमेदवारी घ्यायला हवी होती असंही राऊत म्हणालेत...

  • रत्नागिरी महायुतीसाठी आज मनसेची सभा

     

    MNS : रत्नागिरीत आज संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरेंची सभा होतेय, त्याचवेळी मनसेही महायुतीसाठी सभा घेणार आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सभेची वेळ एकच असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. उद्धव ठाकरेंच्या सभेच्या वेळीच मनसेचे पहिल्या फळीतील नेते नारायण राणेंसाठी सभा घेणार आहेत, रत्नागिरी शहरात एकाच वेळी होणा-या या दोन सभांमुळे चर्चांना उधाण आलंय.

  • अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sahil Khan : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन ही कारवाई केलीये. त्याला आता मुंबईत आणले जाणार आहे. त्यामुळे आता साहिल खानच्या चौकशीवेळी महादेव बेटिंग अॅप्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.. दरम्यान
    साहिल खान याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयाने त्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावलीये.. द लायन बुक नावाच्या एका अॅपमध्ये साहिल खान भागिदार असल्याची माहिती समोर येतीये.. 

     

  • तुळजाभवानीच्या चरणी  68.81 कोटींचं दान अर्पण 

     

    Tuljabhavani : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी यंदा भक्तांनी भरभरून दान दिलंय... यंदाच्या आर्थिक वर्षात भक्तानी तुळजाभवानी मातेच्या चरणी यंदा विक्रमी 68.81 कोटीचे दान अर्पण केलंय. भक्तांनी आई तुळजाभवानीच्या चरणी 16 किलो सोने आणि 270 किलो चांदी अर्पण केलीये.. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12 कोटी रुपये अधिकच दान भक्तांनी देवीला दिलंय.. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने आणि चांदीच्या देणगीत घट झालीये.. नवरात्रोत्सव, पौर्णिमा आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा लाखो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलंय.. 

  • सांगलीत प्रकाश शेंडगेंच्या कारला घातला चपलांचा हार

     

    Prakash Shendge : ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या कारला चपलांचा हार घालण्यात आलाय.. सांगली-मिरज रोडवरील ग्रेट मराठा हॉटलेसमोर पार्क असलेल्या शेंडगेंच्या कारला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आला.. निवडणुकीतून माघार घ्या आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका अशा आशयाचं पत्रही कारवर चिकटवण्यात आलंय.. त्यासोबतच कारवर शाईफेकही करण्यात आलीय.. नुकताच शेंडगेंनी मराठा कार्यकर्त्यांकडून दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता.. 

  • मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai University Exam Postponed : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आल्यात. 6,7 आणि 13 मे रोजी होणा-या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. आता 6 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा या 18 मे, 7 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा या 25 मे आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा या 8 जून रोजी घेण्यात येणार आहेत. परीक्षांच्या तारखांमध्ये बदल झाला असला तरी परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्रांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागानं दिलीय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • अजित पवारांचा आज बारामती दौरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीत आज त्यांचे विविध ठिकाणी तीन कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 10: 30 वाजता शिर्सूफळ इथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. दूपारी 1 वाजता नटराज नाट्य कलामंदिर, बारामती इथे एक कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. तर संध्याकाळी 6 वाजता सांगवी इथे कार्यकर्ता मेळाव्याला अजित पवार उपस्थित राहणार आहेत. ..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • रत्नागिरीमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा

     

    Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौ-यावर आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरेंची रत्नागिरीत सभा होतेय. या सभेला तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.. 
     

  • मुंबईतील भांडुपमध्ये 3 कोटी रुपये जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    3 crore seized in Bhandup : मुंबईतील भांडुपमध्ये 3 कोटी रुपये सापडलेत...नाकाबंदी दरम्यान निवडणुक अधिका-यांनी केलेल्या करावाईत एका गाडीत ही रक्कम आढळून आलीये.. सोनापूर सिग्नलवर पोलीस आणि निवडणूक अधिका-यांी ही गाडी पकडली.. या गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समजते. ही गाडी तात्काळ भांडूप पोलीस ठाण्यात नेण्यात आली. त्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारीही पोलीस ठाण्यात दाखल झाले. आयकर खात्याचे कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर तपासाला सुरुवात केली आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link