Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
मुंबईतील कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसली, अपघातात तिघांचा मृत्यू, 20 जण जखमी
Kurla Accident : मुंबईतील कुर्ल्यामध्ये भरधाव बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिली. मुंबई महानगरपालिकेच्या L वॉर्ड समोर ही दुर्घटना घडली. यात 20 जण गंभीर जखमी झाले असून, 3 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. ब्रेक फेल होऊन बस क्रमांक 332 थेट मार्केटमध्ये घुसली. यात काहींचा जागीच मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीकडे जात असताना, रात्री पाऊणे दहा वाजता ही दुर्घटना घडली. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन
Winter Session : 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
Pune Water Cut : पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद असणार आहे. नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, भामा आसखेड, वारजे, SNDT यासह इतरही ठिकाणी स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल, दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे 12 डिसेंबरला पुणे शहरातील बहुतांश भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
Aditya Thackeray's letter to CM Fadanvis : बेळगावप्रश्नी आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र.. बेळगाव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याची आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी.. बेळगावच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचीही मागणी.. केंद्रशासित प्रदेशाचा केंद्राला प्रस्ताव पाठवण्याबाबत
आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र.बातमीचा व्हिडीओ पाहा -
शंभू सीमा खुली करण्याबाबत याचिका फेटाळली
SC on Farmers Agitation : सुप्रीम कोर्टानं पंजाब-हरियाणा शंभू सीमेबाबतची याचिका फेटाळली.. शंभू सीमा खुली करण्याबाबत याचिका फेटाळली.. जालंधर येथील रहिवासी गौरव लुथरा यांनी ही याचिका दाखल केली होती.. शेतकरी मोर्चामुळे दिल्लीतील शंभू सीमा बंद.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा
Poisoning of school students : धाराशिवमध्ये शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा झालीये.. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात गांधी विद्यामंदिर येथील 25 हून अधिक विद्यार्थ्यांना उलट्याचा त्रास झाल्यानं एकच खळबळ उडालीये.. रक्तवाढीच्या गोळ्या दिल्यानंतर हा त्रास जाणवू लागल्यानं विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.. सध्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.. आरोग्य विभागानं सदर प्रकाराची दखल घेतली असून तपास सुरू आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
लाडकी बहीण योजना सुरुच राहणार - आदिती तटकरे
Vidhansabha Aditi Tatkare : 'पुढील अधिवेशनात लाडक्या बहिणंसीठी 2100 रुपयांची घोषणा होणार असल्याची माहिती अदिती तटकरेंनी दिलीय.. सध्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार असल्याचंरी त्यांनी म्हटलंय. योजने सध्या तरी कोणातीही बदल करण्यात आला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय काही तक्रारी असेल तर त्यांची चौकशी केली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.. आतापर्यंत '2 कोटी 40 लाख महिलांपर्यंत लाभ पोहोचलाय'
बातमी पाहा - 'कोणाची तक्रार आली तर...' 'लाडकी बहीण' स्क्रूटीनीसंदर्भात काय म्हणाल्या अदिती तटकरे?
वक्फ बोर्ड वादात राज ठाकरेंची उडी
Raj Thackeray : वक्फ बोर्डाच्या वादात आता राज ठाकरेंनी उडी घेतलीये...लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, तळेगाव तालुक्यातील 75 टक्के शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाय...याबाबत एक्सवर पोस्ट करत राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका मांडलीये... गेली कित्येक वर्ष वक्फ बोर्ड मनमानी कारभार करतंय... त्याला चाप कसा बसवणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्याचं राज ठाकरेंनी म्हंटलय....
आदित्य ठाकरेंची राहुल नार्वेकरांवर टीका
Aaditya Thackeray On Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधलाय. ज्या अध्यक्षांची आज निवड झाली त्यांनी घटनाबाह्य सरकार चालवण्याकरता मदत केली. तर लवाद म्हणून त्यांनी जो संविधानाचा अपमान केलाय तो होणार नाही ही अपेक्षा आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलीय.
जयंत पाटलांची राहुल नार्वेकरांवर अप्रत्यक्ष टीका
Jayant Patil On Rahul Narvekar : जयंत पाटील यांनी राहुल नार्वेकरांना अप्रत्यक्ष टीका केलीय... तुम्ही अपात्रतेवर असा निर्णय दिला की त्यावर अजूनही सुप्रीम कोर्ट विचार करत असल्याचा टोला लगावलाय..
एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टोलेबाजी
Vidhansabha Eknath Shinde : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिल्याच भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली. काही लोकांनी बहिष्कार टाकला असं म्हणत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंनी टोला लगावलाय
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांची दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड झालीय. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून नार्वेकरांच्या निवडीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकरांच्या कामाचं कौतुक केलंय. आणि नार्वेकरांनी सर्वांना न्याय देण्याचं काम केलंय असं वक्तव्य फडणवीसांनी सभागृहात केलंय
इंदापूरमध्ये कारचा अपघात, 2 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
Indapur Accident : इंदापूरमधील लामजेवाडीजवळ कारचा भीषण अपघात झालाय. कारमध्ये बारामतीतील 4 शिकाऊ वैमानिक पायलट होते.. भिगवणकडे जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय.. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत...
मेट्रो 3 पुढच्या सहा महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत
Metro - 3 : मेट्रो 3 पुढच्या सहा महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणारेय. मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पुढच्यावर्षी जून ते जुलै पर्यंत सुरू होण्याची शक्यताय. या टप्प्यातील रुळांचे काम जवळपास पूर्ण झालंय. बीकेसी ते कफ परेड हा 20.9 किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गावर एमएमआरसीने रुळांच्या उभारणीचं काम जवळपास 88 टक्के पूर्ण केलंय.
नांदेडमध्ये VVPATची मतमोजणी
Nanded VVPAT : नांदेडमध्ये निवडणुकीनंतर केल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅट च्या मतमोजणीत एकही मताचा फरक पडलेला नाही. प्रत्येक निवडणूकीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदार संघासाठी एकूण 5 मतदान केंद्रातील व्ही व्ही पॅट मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील 9 विधानासभा मतदार संघातील 45 मतदान केंद्रावरील व्ही व्ही पॅट आणि लोकसभा पोट निवडणूकीतील 6 मतदार संघातील 30 मतदान केंद्रावर अशा एकूण 75 मतदान केंद्रावरील व्ही व्ही पॅट मधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात आली. यात एकाही मतदान केंद्रावरील मतामध्ये फरक पडलेला नाही.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार?
Opposition Leader : विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लागलंय.. कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारं संख्याबळ कोणत्याही पक्षाकडे नाहीये.. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यावं याचा निर्णय सरकार आणि विधानसभा अध्यक्ष घेणार आहे.. विरोधी पक्षनेते पदासाठी 10 टक्के आमदारांची गरज आहे.. मात्र कोणत्याही विरोधी पक्षाकडे 10 टक्के आमदार नाहीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केलीय. रविवारी मातोश्रीवर घाटकोपरच्या काही मनसैनिकांनी शिवसेना UBTत प्रवेश केला त्यावेळी बोलताना तुम्बी मरमर मेहनत करता पण त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही, कारण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते. पण हे काहीच नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे पक्षावर, राज ठाकरेंवर टीका केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
जळगावात 11 ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू
Jalgaon Cotton : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मागणीची दखल घेतली असून रक्षा खडसे यांच्या मागणीनुसार जळगाव जिल्ह्यात 11 ठिकाणी सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर हमी दराने कापूस खरेदी केला जाणार असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
विधानसभा अध्यक्षांची आज अधिकृत होणार घोषणा
Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदाची आज अधिकृत घोषणा होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केवळ महायुतीच्या राहुल नार्वेकर यांचाच अर्ज दाखल झाला. त्यामुळे राहुल नार्वेकरच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवडले जाणार आहेत. आज विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून नार्वेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
विधानसभेत आज उर्वरित 8 आमदारांचा शपथविधी
Vidhansabha Special Adhiveshan : विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसांच्या या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी 173 आमदारांनी शपथ घेतली तर दुस-या दिवशी 106 आमदारांचा शपथविधी पार पडला.आतापर्यंत एकूण 279 आमदारांनी शपथ घेतलीय. मात्र अद्याप आठ आमदारांची शपथ बाकी आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे शपथविधी होऊ शकलेला नाही. आज या उरलेल्या आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या आठ आमदारांमध्ये उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर,विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके यांची शपथ बाकी आहे. काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालना शपथ घेणार असल्याची माहिती आहे
विधानसभेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
Vidhansabha Special Adhiveshan : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.. राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार आहे.. आज त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे..