Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 18 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
मुंबईतील बुचर आयलँडजवळ बोटीला अपघात, 13 जणांचा मृत्यू
Elephanta : बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू...बुचर आयलँडजवळ बोटीला अपघात 13 जणांचा मृत्यू...बोटीतील 101 जणांना वाचवलं...नीलकमल बोटीला अपघात 13 जणांचा मृत्यू...मृतांमध्ये नेव्हीच्या 3 कर्मचा-यांचा समावेश...2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती.- मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत...नेव्हीच्या स्पीड बोटीच्या टेस्टिंगवेळी दुर्घटना...जास्त क्षमतेच्या इंजिनमुळं अपघात...जास्त क्षमतेच्या इंजिनमुळं बोटीवरील नियंत्रण सुटलं
आमदार रणधीर सावरकर भाजपचे विधानसभेतील नवे मुख्य प्रतोद
Randhir Sawarkar : भाजपकडून विधानसभेतील मुख्य प्रतोदांची घोषणा... आमदार रणधीर सावरकर भाजपचे विधानसभेतील नवे मुख्य प्रतोद...मागच्या कार्यकाळात आमदार आशिष शेलार होते भाजपचे मुख्य प्रतोद....शेलारांची मंत्रिपदी नेमणूक झाल्याने सावरकर यांच्यावर जबाबदारी
बातमीचा व्हिडीओ पाहा-
गेट वेहून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली, एकाचा मृत्यू
Elephanta boat Rescue Operation : एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली...गेट वेहून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली...अपघातात एकाचा मृत्यू...बोटीत 80 प्रवासी असल्याची माहिती...आतापर्यंत 21 जणांना बाहेर काढण्यात आलंय... एका बोटीचा दुस-या बोटीला धक्का लागल्यानं बोट उलटल्याची माहिती..अडकललेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू
राहुल गांधींची आज पत्रकार परिषद
Rahul Gandhi : राहुल गांधींची दिल्लीत आज पत्रकार परिषद होणार...दिल्लीत 6.30 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद...राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष
गेट वेहून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली
Mumbai Elephanta : एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली...गेट वेहून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली...बोटीत 30 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती...एका बोटीचा दुस-या बोटीला धक्का लागल्यानं बोट उलटल्याची माहिती
दिल्लीत अमित शाहांची आज पत्रकार परिषद
Amit Shah : दिल्लीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेणार..अमित शाह संध्याकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषद घेणार
भाजपचे आमदार उद्या रेशीमबागेत जाणार
BJP : भाजपचे आमदार उद्या रेशीमबागेत जाणार... हेडगेवार आणि गोळवलकरांना अभिवादन करणार...भाजपातील सर्व नेते संघ मुख्यालयात जाणार... अजित पवार संघ मुख्यालयात जाणार का?'
बातमीचा व्हिडीओ पाहा-
एक देश एक निवडणूक विधेयक JPCकडे
One Nation One Election : एक देश एक निवडणूक विधेयक JPC कडे पाठवण्याचा निर्णय...याबाबत JPC (संयुक्त संसदीय समिती) स्थापन...एक देश एक निवडणूक विधेयक JPCकडे...विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे...JPC विधेयकात प्रियंका गांधी, मनीष तिवारी सदस्य... शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे सदस्य
बातमीचा व्हिडीओ पाहा-
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अबीर फेकला
Gunratan Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अबीर फेकला...तुळजापुरात सदावर्तेंविरोधात मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन
महायुतीत कुठल्याही खात्यावरुन, पदावरुन संघर्ष नाही - शिंदे
Nagpur Eknath Shinde : आमच्यात कुठल्याही खात्यावरून, पदावरून संघर्ष नाही, भांडणं नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर कोणतं खातं मिळतं यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळणार, महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार याची आम्हाला चिंता आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले
सुहास कांदेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल
Suhas Kande On Chhagan Bhujbal : शिवसेनेच्या सुहास कांदेंनी छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. भुजबळांना गद्दारीचं फळ मिळालं...विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचं काम केले नव्हतं.त्यांच्या तक्रारीही मी केल्या होत्या. भुजबळ खरे असतील, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा द्यावा...असं आव्हान कांदेंनी भुजबळांना केलंय
राम शिंदे विधानपरिषदेचे सभापती होणार
Ram Shinde : राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती होणार हे निश्चित झालंय.. विधानपरिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलीये.. भाजपकडून राम शिंदे यांनी अर्ज दाखल केलाय. एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालंय... झी 24 तासनं विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय..
आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Ravichandran Ashwin Retires From International Cricket : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी आणि दिग्गज खेळाडू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. अश्विनने मालिकेदरम्यान एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे टीम इंडियाला आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. आर अश्विननं 106 टेस्टमध्ये 537 विकेट्स घेतल्यात.. टेस्टमध्ये तब्बल 37 वेळा 5 विकेट्स तर 8 वेळा 10 विकेट्स घेण्याची किमयाही त्यानं साधलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
भुजबळांची नाराजी दूर करू - सुनील तटकरे
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची भेट घेणार असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलं...योग्य वेळ आल्यानंतर भेट घेऊ, भुजबळांशी बोलून त्यांची नाराजी दूर करू अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिलीय .. तर छगन भुजबळांनी तटकरेंच्या विधानावर सावध भूमिका घेतलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
छगन भुजबळांनी नवा पक्ष काढण्याची कार्यकर्त्यांची मागणी
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी नवा पक्ष काढावा, अशी मागणी संघर्ष सभेसाठी आलेल्या भुजबळ समर्थकांनी केलीय. भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानं हे कार्यकर्ते आक्रमक झालेत.
'लापता लेडिज'ची ऑस्करवारी हुकली
Lapata Ladies : लापता लेडज हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडलाय.. किरण राव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला भारतात प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं होतं.. त्यामुळे भारताकडून हा चित्रपट ऑस्करसाठी अधिकृत एंट्री म्हणून पाठवला होता. मात्र, हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाद झालाय.. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने बुधवारी याबाबत घोषणा केली. त्यामुळे भारताला ‘लापता लेडीज’साठी ऑस्कर मिळण्याची आशा संपली आहे.. दरम्यान ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी गुनीत मोंगा कपूर निर्मित लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म ‘अनुजा’ शॉर्टलिस्ट झाली आहे. ही शॉर्ट फिल्म वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करते
राज्यात थंडीची लाट
State Temprature : राज्यात थंडीची लाट आहे..धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय..धुळ्याचं तापमान 5 अंशांवर गेलंय.. तर लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी परिसरातील तापमान 6 अंशांवर आहे.. परभणी शहराचा पाराही 6 अंशांजवळ आहे..नाशिक जिल्ह्यातील ओझरचं तामपान 6.3 अंशांवर गेलंय.. तर निफाडचा पाराही 7.4 अंशांवर गेलाय.. बदलापूरचं तापमान 14 अंशांवर आहे.. मुंबई आणि इतर शहरांचा तापमानाचा पाराही घसरलाय..
पुण्यात भुजबळ समर्थक-राष्ट्रवादीत वादाची शक्यता
Pune : पुण्यात भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यताय. भुजबळ समर्थकांनी अजित पवारांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन केल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी नेते आक्रमक झालेत. जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी असल्याचं राष्ट्रवादी नेत्यांचं म्हणणं आहे. ज्या भुजबळांना आतापर्यंत अनेकदा मंत्रिपदाची संधी ही अजित पवारांमुळे मिळाली प्रत्येक वेळी भुजबळांसोबत अजितदादा खंबीरपणे उभे राहिलेत. हे सगळं विसरून दादांविरोधात भुजबळ समर्थक भूमिका मांडत असतील तर जशास तसे उत्तर आम्हीही देऊ शकतो असा इशारा राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला आहे .
संत्र्याच्या दराने गाठली शंभरी
Orange Fruit Price : सध्या बाजारपेठेत सगळीकडे 'संत्राराज' सुरू आहे. 'सी' व्हिटॅमिन युक्त असलेल्या संत्र्याची मागणी किरकोळ बाजारात वाढली असून, घाऊक बाजारात दरदिवशी २६० ते २७० टन संत्र्यांची आवक होते... बाजारात १०० रुपये किलोने संत्र मिळतायत. ३० ते ६० रुपये किलो घाऊक दर असून, किरकोळ मार्केटमध्ये ६० ते १०० रुपयांपर्यंत संत्र्यांची विक्री होते. पुढील काही दिवसांत मागणी आणखी वाढेल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. हिवाळ्यात संत्र्याला जास्त मागणी आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राज्यातील अनेक भागात थंडीची लाट
State Cold : महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीची लाट आहे... मात्र पुढील 10 दिवसात तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये.. त्यामुळे या वर्षी ख्रिसमसचा सण थंडीशिवाय साजरा होण्याची शक्यता आहे.. मात्र 29डिसेंबरपासून थंडीचा कडाका पुन्हा वाढून वर्षाअखेरीस पुन्हा थंडिचा कडाका वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव, चिन्हाची सुनावणी लांबणीवर
NCP Party Name & Symbol : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि 'घड्याळ' चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेलीय. द्विसदस्यीय खंडपीठापुढे हे प्रकरण सूचिबद्ध करण्यात आलं होतं. मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर पुढील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव व 'घड्याळ' चिन्हाचा फैसला आता नवीन वर्षात होणार आहे.