Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 07 Jan 2025-10:27 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • वंदेमातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हावं- रामगिरी महाराज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ramgiri Maharaj : संभाजीनगरमध्ये महंत रामगिरी महाराजांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय.. वंदेमातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हावं. असं विधान त्यांनी केलं होतं.. एका चित्रपटाच्या टीजर लाँच कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.. आपण चित्रपटाच्या आधी राष्ट्रगीतासाठी उभे राहतो.. मात्र हे गीत रविंद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहलं होतं.असं ते म्हणाले.. अशा गीताला आपलं राष्ट्रगीत मानने योग्य नाही यात बदल व्हायला हवा असं ते म्हणाले. मात्र या वक्तव्यावर त्यांनी नंतर युटर्न घेतला.. दरम्यान मी राष्ट्रगीताचा अपमान केला नाही असं रामगिरी महाराजांचे म्हणणं आहे मी फक्त सत्य सांगितलं आणि सत्य सांगायला घाबरण्याची गरज नाही असं सांगत त्यांनी राष्ट्रगीताबाबत केलेल्या विधानचे समर्थनही केलं 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर- सूत्र

     

    Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौ-यावर...पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक घेणार...भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता...सूत्रांची झी २४ तासला माहिती... दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होण्याची शक्यता... दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीनं 11 उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीचं जाहीर केलीये..

  • वन नेशन वन इलेक्शनबाबत संसदीय संयुक्त समितीची उद्या बैठक

     

    One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शनबाबत संसदीय संयुक्त समितीची उद्या बैठक...राजधानी दिल्लीत उद्या समितीची पहिली बैठक होणार...विधेयकाच्या विरोधावर काँग्रेस पक्ष ठाम...राज्यातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, अनिल देसाईंचा समितीत समावेश
     

  • 'देशमुख खून प्रकरण, तपासाचा फोकस हलतोय', सुषमा अंधारेंचा आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sushma Andhare on Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाचा फोकस हलतोय असा आरोप, शिवसेना UBTच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. या प्रकरणातील मारेकरी आणि त्यांचा मास्टरमाईंड यांना फाशी झालीच पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी धरले आहेत असा सवाल सुषमा अंधारेंनी केला. तसंच संशयाच्या फे-यात सापडलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन अजित पवार नैतिकता पाळणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर कोणीतरी पोलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न करतोय का आणि सुरेश धस सभांमधून बोलत आहेत त्यांचे त्यांनी पुरावे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • सुरेश धस अभ्यास करून बोलणारे नेते- बजरंग सोनवणे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bajrang Sonawane on Walmik Karad : खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीत केला.. त्याबाबत बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिलीय सुरेश धस हे अभ्यास करून बोलणारे नेते आहेत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलतात शासनाने आणि पोलीस यंत्रणेने याचा तपास करायला पाहिजे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • विशाळगड पर्यटकासाठी खुला होणार, 5 महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुला होणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vishalgad Fort : कोल्हापुरातील विशाळगडावर जाण्यास अखेर पर्यटकांना परवानगी... पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी...31 जानेवारी पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पर्यटकांना विशाळगडावर जाता येणार...पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना...विशाळगडावरील हिंसाचाराच्या तब्बल पाच महिन्यानंतर विलशाळगड पर्यटकांसाठी होणार खुला

     

  • आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Asaram Bapu Bail : बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्या आसाराम बापूला सुप्रीमकोर्टानं दिलासा दिलाय.. 85वर्षीय आसाराम बापूला सुप्रीम कोर्टानं 31 मार्चपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केलाय.. प्रकृतीच्या कारणास्तव कोर्टानं हा जामीन मंजूर केलाय.. मात्र या काळात आसाराम बापूला अनुयायांना भेटता येणार नाही, असेही निर्देश कोर्टानं दिलेत.. सध्या आसाराम बापूवर जोधपूरच्या आरोग्य मेडीकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. हृदय विकार असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • दिल्ली विधानसभेची तारीख ठरली, 5 फेब्रुवारीला मतदान 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Delhi Elections 2025 Date Announcement : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्यात. 5 फेब्रुवारीला मतदान होणारे तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणारेय. एकाच टप्प्यात निवडणूक होणारे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखाची घोषणा केलीय. नवीन वर्षात दिल्ली विधानसभेच्या पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • बीडमध्ये 74 जणांचे पिस्तूल परवाने रद्द 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed : बीडमध्ये 74 जणांचे पिस्तूल परवाने रद्द करण्यात आलेत.. पोलिसांनंतर आता जिल्हा प्रशासन सुद्धा अॅक्शन मोडवर आलंय.. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 1 हजार 281 शस्त्र परवाने दिलेले आहेत.. परवाने देण्यात आलेल्यांपैकी 232 जणांवर 1 ते 16 गुन्हे आहेत. त्यापैकी गुन्हे दाखल असलेल्या 74 जणांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत.. तर अंजली दमानिया यांनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या कैलास फडचा देखील पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Fastag : 1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टटॅग अनिवार्य... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • महापालिका निवडणुकीत MNS-BJP युती?

     

    MNS : महापालिका निवडणूकीत मनसे टाळीसाठी हात पुढे करणार?...आगामी महापालिका निवडणूकीकरता मनसे-भाजप युती चाचपणीच्या चर्चा...लोकसभा आणि विधानसभेत शिंदेंच्या नकारघंटेनं मनसेची युती होऊ शकली नाही- सूत्रांची माहिती...मात्र; आता महापालिका निवडणूकीत युतीची चर्चा आणि युतीतील इतर बाबीवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडून एका टीमची नेमणूक केली जाणार...मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची टीम सध्याची राजकिय स्थितीचा आढावा घेणार; त्यावरुन युतीबाबत अंतीम निर्णय होणार...विधानसभा आणि लोकसभेतही मनसे शिंदेसोबत युती करण्यास तयार असतांना आणि भाजपचाही ग्रीन सिग्नल असतांना शिंदेमुळे मनसेच्या युतीचा रस्ता ब्लॉक झाला होता...मात्र; विधानसभेत मनसे आणि शिंदेंचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहील्यानं जागांवर काही दोघांचे नुकसान झाले... अनेक ठिकाणी याता ठाकरेंना फायदा झाला...त्यामुळे; आतामहापालिका निवडणूकीत मनसे पुन्हा एकदा युती करण्याच्या बाबत सकारात्मक आहे...हिंदुत्वाचा मुद्दा; मोदींचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसेनं युती करायची ठरवल्यास ही युती भाजपबरोबर होण्याची शक्यता जास्त...उद्धव ठाकरेंसोबत युतीचे दोर आधीच कापले गेलेत...दोन्ही पक्षांना एकमेकांवर विश्वास नाही अशी स्थिती असल्यानं आता भाजपच मनसेसमोरील युतीचा पर्याय असल्याची चर्चा 

  • सांगलीत बस आणि ट्रकचा अपघात, 19 विद्यार्थी जखमी

     

    Sangli Accdient : सांगलीत बस आणि ट्रकचा अपघात झालाय.. या अपघातात 19 विद्यार्थी जखमी झालेत त्यांच्यावर  शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. हे सर्व विद्यार्थी कवठेमहांकाळ निवासी शाळेचे विद्यार्थी असून मिरज येथे पार पडत असलेल्या क्रीडा स्पर्धां आटपून एसटी बस मधून पुन्हा कवठेमहांकाळकडे निघाले असता नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील तानंग फाटा येथे वळण घेताना 14 चाकी ट्रक आणि बसचा अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही,मात्र अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • वाल्मिक कराडची 4 ते 5 दारुची दुकानं - अंजली दमानिया

     

    Anjali Damania : वाल्मिक कराडची 4 ते 5 दारू दुकाने आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलीय. या संदर्भात एक पत्र मिळालं आहे आणि त्यातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडं दिलीय, अशी माहिती दमानिया यांनी दिलीय. वाल्मिक कराडची  केज, वडवनी, बीड आणि परळीत 4 ते 5 दारूची दुकाने आहेत. प्रत्येक दुकानाचा बाजार भाव 5 कोटी आहे. सातबारा 15 दिवसानंतर होतो... पण सगळे कायदे कसे धाब्यावर बसवले याचं हे उदाहरण आहे, असं ट्वीट दमानिया यांनी केलीय.

  • आता सर्व वाहनांना HSRP नंबरप्लेट बंधनकारक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Washim : वाहनांवरील नंबरप्लेटमध्ये छेडछाड, बनावट नंबरप्लेट प्रकारांना आळा घालण्यासाठी आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक  करण्यात आले आहे. ज्या वाहनांना   एचएसआरपी नंबर प्लेट नसेल त्यांना ३१ मार्च नंतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, तसं पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने काढले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट नसल्यास वाहनांचे मालकी हक्क हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्ययावत करणे आदी कामकाज थांबविण्यात येईल. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • सरकारनं नैतिकतेनं निर्णय घ्यावा - सुप्रिया सुळे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Supirya Sule : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिलीय. सरकारने संवेदनशीलपणे याचा विचार करावा. अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा नैतिकता पाहुन कांग्रेस पक्षाने अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता तेव्या आता सरकारने ठरवावं त्यांनी काय करायचं ते अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पालघरमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

     

    Palghar Health Issue : पालघर जिल्ह्यातील आरोग्यवस्था कूचकामी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय..  त्यातच आता प्रसूती झालेल्या एका महिलेला आपल्या बाळांवर उपचार करण्यासाठी पालघर मधून थेट जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.. पालघर ग्रामीण रुग्णालयात निकिता डगला यांची प्रसुती झाली. त्यांना दोन जुळी मुलं झाली.. मात्र मुलांचं  वजन कमी होतं. त्यामुळे त्यांना पालघरमधून जव्हार इथं शिशू देखभाल कक्षात जाण्यास सांगण्यात आलंय. त्यामुळे नुकतीच प्रसुती झालेल्या महिलेला 80 किलोमीटरचा प्रवास करून जव्हार इथं जावं लागलंय..  पालघर जिल्हाच्या निर्मितीला 10 वर्ष पूर्ण झालीय.. मात्र अजूनही नागरिकांना आरोग्याच्या पुरेशा सुविधा देण्यास सरकार आणि प्रशासनाला यश आलं नाहीये. त्यामुळे पालघरची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.. 

  • पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gurdian Minister : पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिलीये.. पालकमंत्रिपदासाठी ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य दिलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.. पालकमंत्री म्हणून पूर्वीचे जिल्हेच कायम ठेवावेत, असा आग्रह ज्येष्ठ मंत्र्यांनी धरला होता, तो मान्यही झाला आहे. काही ठिकाणी ज्येष्ठत्व तर काही ठिकाणी गेल्या सरकारमधल्या पालकमंत्रिपदाचा अनुभव याचाही विचार केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.. मात्र बीडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय अद्यापही झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रायगडमध्ये 73% बलात्कार अल्पवयीन मुलींवर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raigad : रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्‍याचारांच्‍या घटनांमध्‍ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षात बलात्काराच्या १०७ घटना समोर आल्या. धक्‍कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे यातील ७४ प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. म्हणजेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या बलात्‍कारांच्‍या गुन्‍हयात ७३ टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराशी निगडीत असल्‍याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील काही वर्षांपर्यंत रायगड जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे वर्षाला ५० गुन्हे दाखल होत होते. गेल्या तीन वर्षात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जिल्ह्यात वार्षिक १०० हून अधिक गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. यातही पॉक्‍सोअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 13 लाख रुपयांचं अवैध सागवान लाकूड जप्त 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gondia Wood Seized : सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकऱ्याला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिका-यांनी  सागवान लाकडाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली.  शेंडा परिसरातल्या जंगलातून हे सागवान लाकूड अवैधरित्या नेलं जात होतं. वन अधिका-यांनी फुटाळा गावाजवळ वाहनाला थांबवत तपासणी केली तेव्हा मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड आढळलं. लाकूड कुठून आणलं,  याची कागदपत्रे विचारली असताना चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे हा लाकूड चोरीचा असल्याचं निष्पन्न झालं. वन विभागाने 3 आरोपींसह लाकूड, वाहन जप्त केले. यात आणखी काही आरोपी असून ते फरार आहेत त्यांचा शोध वनविभाग घेतंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगेंवर बीडमध्ये 8 गुन्हे दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : मंत्री धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य करणं मनोज जरांगेंना महागात पडलंय. जरांगेंविरोधात बीड जिल्ह्यात 8 अदखलपात्र गुन्हे दाखल झालेत. परभणीतील आक्रोश मोर्चात जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झालेत. 24 तासात 8 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. अंबाजोगाई, परळी ग्रामीण, सिरसाळा, केज, धारूर आणि गेवराई येथील पोलिस ठाण्यात जरांगे यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आलेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • HMPVशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज - मेघना बोर्डिकर

     

    Parbhani Meghana Bordikar On HMPV :  HMPVशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज आहे अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलीये.. भारतात या विषाणूचे 5रुग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊनये.. काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय...

  • तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Tuljapur : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता विधिवत पूजा करून घटस्थापनेने या उत्सवाला प्रारंभ होणार आहे. पुढील सात दिवस म्हणजे 14 जानेवारी पर्यंत आई तुळजाभवानीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरम्यान आज पहाटे सात दिवसाची मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान झाली. मानाच्या पुजाऱ्यांनी विधिवत पूजा करून देवीच्या मूर्तीची मंदिराला प्रदक्षिणा घालत तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ गोळीबार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Firing :  मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाबाहेर गोळीबार झालाय.. मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी एका अंगाडिया व्यापा-यावर गोळीबार केला.. अंगडीया मौल्यवान दागिने घेऊन जाताना CSMTच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं सैफ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गोळीबार करणारे पी डिमेलो मार्गावरुन माझगावच्या दिशेनं पळाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीये.. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीनं या आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी MRAपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • मुंबई एअरपोर्टवर 4 कोटींचा गांजा जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Airport Ganja Seized : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ४ कोटी रुपयांच्या गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश केला.या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. बँकॉकहून मुंबईत येणाऱ्या विमानात प्रवाशाकडे अमली पदार्थ असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने विमानाच्या बाहेर सापळा रचला होता. या विमानातून उतरणाऱ्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करत त्याच्या सामानाची तपासणी केली. प्लास्टिकच्या हवाबंद बॅगेत गांजा लपवल्याचं आढळलं. हा गांजा कुणासाठी आणला या संदर्भात त्याची चौकशी केली असता त्याने मुंबईतील एका व्यक्तीचं नाव सांगितलं. त्यापार्श्वभूमीवर दोघांना अटक करण्यात आली.   

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नक्षलवादी हल्ल्यानंतर NIA अ‍ॅक्शन मोडवर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    NIA On Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आलीय. छत्तीसगडमध्ये काल नक्षलवादी हल्ल्यात 9 जवान शहीद झाले होते. विजापूरच्या अम्बेलीमध्ये मोठा स्फोट घडवून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणा चौकशी करणारेय. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झालीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उत्तर भारत भूकंपानं हादरलाय

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Earthquake : उत्तर भारत भूकंपानं हादरलाय.. पश्चिम बंगालसह बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत.. या भूकंपाचं केंद्र हे नेपाळमधील गोकर्ण भागात होतं.. या भूकंपाची तिव्रता 5.3 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आलीये. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी, जलपायगुडीमध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link